Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

व्यापार - उद्योग

तीन वर्षात ५० टक्के कंपन्यांच्या गाडय़ांच्या ताफ्यात वाढ अपेक्षित
भारतासाठी ‘सीव्हीओ बॅरोमीटर’ दाखल

व्यापार प्रतिनिधी: कॉर्पोरेट फ्लीट इंडस्ट्रीसाठी स्वतंत्र आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असलेल्या, तसेच बीएनपी परिबाचे पाठबळ असलेल्या कॉर्पोरेट व्हेइकल ऑब्झर्वेटरी (सीव्हीओ) ने ‘सीव्हीओ इंडिया रिपोर्ट २००९’ या संशोधन अहवालाची दुसरी आवृत्ती जाहीर केली आहे.भारतातील कॉर्पोरेट व्हेइकल क्षेत्राविषयी संशोधन करत असलेल्या टीएनएसने या आंतरराष्ट्रीय संशोधन कंपनीने ३००० जणांची मते या संबंधाने विचारात घेतली आहेत. भारतातील गाडय़ांची वैशिष्टय़े आणि भवितव्य; अर्थसाहाय्य करण्याच्या पद्धती; पर्यावरणासंबंधी मुद्दे आणि सध्याच्या आर्थिक मंदीचा परिणाम अशा चार विभागांमध्ये हा अभ्यास विभागला होता.

‘सिल्व्हर एम्पोरियम’ चांदीची भांडी आणि दागिन्यांची सर्वात मोठी शोरूम
व्यापार प्रतिनिधी: विश्वास, सातत्य, विश्वसनीय गुणवत्ता आणि कुशल गामगिरी यांची तीन दशकांहून जास्त जुनी परंपरा असलेल्या सिल्व्हर एम्पोरियमची स्थापना १९८१ मध्ये त्याचे संस्थापक कांतीभाई मेहता यांनी केली. कंपनी चांदीच्या दागिन्यांमध्ये मढविलेली सेमी प्रेशियस रत्ने, चांदीची भांडी आणि कलाकृती यांच्या निर्मिती, विक्री आणि संपूर्ण जगभर निर्यात करण्याचा व्यवसाय करते.कंपनीचे मुंबईमध्ये, ३००० चौ. फुटांचे विस्तिर्ण पसरलेले आणि वैभवशाली सजावटीचे मुख्य विक्रीकेंद्र आहे. कंपनीच्या महत्त्वाकांक्षी विक्री विस्तार योजनेमध्ये भारत हा केवळ एक टप्पा आहे. शोरूममध्ये अत्यंत उच्च दर्जाच्या वैभवशाली कलाकुसरीच्या वस्तू, चांदीची भांडी, फर्निचर, घडय़ाळे आणि चांदीच्या दागिन्यांचा संग्रह यांचे अत्याधुनिक प्रदर्शन असेल आणि भारतातील अशा प्रकारचे ते एकमात्र दुकान असेल.सिल्व्हर एम्पोरियम- मुंबईतील या सर्वात मोठय़ा शोरूमचे उद्घाटन खासदार मिलिंद देवरा यांच्या हस्ते शुक्रवार, ३१ जुलै २००९ रोजी सायंकाळी ५ वा. योजण्यात आले आहे.आमदार राज पुरोहित, ठाण्याते अतिरिक्त पोलीस आयुक्त तुकाराम चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त उत्तम खैरमोडे, राम नारायण सराफ, मारवाडी संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत दालमिया, नगरसेविका दीक्षिता शाह आणि जनक संघवी हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे असतील.

वैश्य सहकारी बँकेच्या निव्वळ नफ्यात १०३ टक्के वाढ
व्यापार प्रतिनिधी: मुंबईस्थित वैश्य सहकारी बँक लिमिटेडने आर्थिक वर्ष २००८-०९ मध्ये एकंदर व्यवसायात १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. अलीकडेच दामोदर हॉल, परेल येथे बँकेच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे बँकेच्या २००९-१० वर्षातील कामगिरीचा अहवाल मांडताना अध्यक्ष दिलीप पाथरे यांनी ही माहिती दिली. वैश्य सहकारी बँकेने २००८-०९ वर्षात, घसारा व प्रश्नप्तिकर यांचा भरणा केल्यानंतर रु. १५.१० लाखांचा निव्वळ नफा कमावला आहे. जो मागील वर्षातील नफ्याच्या तुलनेत १०३ टक्क्यांनी वाढला आहे. या उमद्य कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर सात वर्षाच्या खंडानंतर बँकेकडून प्रथमच सभासदांसाठी लाभांशांची घोषणा करण्यात येत आहे, असेही पाथरे यांनी नमूद केले. सहकार विभागाकडून पार पडलेल्या वैधानिक लेखा परीक्षणानंतर बँकेने ‘अ’ ऑडिट श्रेणी प्रश्नप्त केली आहे. लवकरच बँकेची पाचवी शाखा डोंबिवली येथे सुरू होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्रोमा व शेफ संजीव कपूर यांचा ‘वन्डरशेफ’ संयुक्त उपक्रम
व्यापार प्रतिनिधी: टाटा उद्योगसमूहातील मल्टी- ब्रॅण्ड कन्झ्युमर डय़ुरेबल्स व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या मोठय़ा स्टोअर्सची शंृखला असलेल्या क्रोमाने शेफ संजीव कपूर यांच्या वन्डरशेफसोबत भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. भारतीय गृहिणींना निरोगी, चविष्ट व सहज-सोप्या स्वयंपाकासाठी प्रश्नेत्साहित केले जावे या उद्देशाने शेफ संजीव कपूर यांनी वन्डरशेफची सुरुवात केली. वन्डरशेफमध्ये सामील खास कुकवेअर, किचन टूल्स व अ‍ॅक्सेसरीज् ज्या स्वत: सेफ संजीव कपूर यांनी जगभरातून निवडल्या आहेत. आता हे वन्डरशेफ क्रोमा आऊटलेटस्द्वारे भारतीय बाजारपेठेत दाखल केले जात आहे. आधुनिक स्त्रीला डोळ्यासमोर ठेवून खास तयार करण्यात आलेल्या वन्डरशेफमध्ये व्यावसायिक स्त्रियांचा एक क्लब असेल व त्या स्वत: किचन शोज्द्वारे या उत्पादनांचे प्रमोशन करतील. हे किचन शोज् घरांमध्ये व ही उत्पादने उपलब्ध असलेल्या निवडक क्रोमा आऊटलेटस्मध्ये आयोजित केले जातील.

‘एमएसएमई डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट’ची कार्यशाळा
व्यापार प्रतिनिधी: भारत सरकारच्या लघुउद्योग मंत्रालयाने महाराष्ट्रात छोटय़ा व मध्यम उद्योजकांना प्रश्नेत्साहित करण्याच्या उद्देशाने आपली एक प्रमुख उपक्रम म्हणजे फळे व भाज्यांच्या जतनासाठी ‘टेक्नॉलॉजी रिसोर्स प्रश्नेग्राम’चे आयोजन केले आहे. हा उपक्रम येत्या २९ जुलै ते ११ ऑगस्ट २००९ या दरम्यान ‘एमएसएमई डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट’ने आपल्या कुर्ला-अंधेरी रोड, साकिनाकास्थित संकुलात होणार आहे. फळे व भाज्या दीर्घकाळ जतन करण्याची तांत्रिक व व्यावसायिक माहिती मार्गदर्शन या ठिकाणी प्रश्नत्यक्षिकासह केले जाणार आहे. सिरप, लोणची, मसाले, सीझनिंग्ज, मँगो पल्प, फ्रूट ज्युस, केचअप्स, सॉसेस, जॅम, व्हिनेगर, जिंजर-गार्लिक पेस्ट्स आदी उत्पादनांच्या प्रक्रियेचे प्रश्नत्यक्षिक या निमित्ताने केले जाईल. तरुण नवउद्योजकांना या क्षेत्रात स्वयंउद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्यही केले जाणार आहे.

टायटन एक्स्चेंज ऑफरमध्ये नवीन घडय़ाळावर २० टक्क्यांची सूट
व्यापार प्रतिनिधी: भारतातील आघाडीची घडय़ाळ उत्पादक कंपनी टायटन इंडस्ट्रीज लिमिटेडने त्यांची बहुप्रतीक्षित योजना, टायटन एक्स्चेंज ऑफर पुन्हा सादर केली आहे. वैविध्यपूर्ण उत्पादनांची मनाजोगी खरेदी ग्राहकांना करता यावी या उद्देशाने टायटन दरवर्षी ही आकर्षक योजना सादर करते. या योजनेमध्ये ग्राहकांना त्यांचे कोणत्याही कंपनीचे, कोणत्याही स्थितीतील जुने घडय़ाळ देऊन टायटनचे नवीन घडय़ाळ खरेदी करता येईल आणि त्यासाठी त्यांना २० टक्क्यांची भरघोस सूटही मिळेल. ही टायटनची योजना २३ जुलै ते २३ ऑगस्ट या काळात केरळ वगळता देशभरातील टायटनच्या सर्व दालनांमध्ये सुरू राहणार आहे.

एमडीआरटी व्यवस्थापकीय परिषदेवर प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व
व्यापार प्रतिनिधी: मुंबईतील आघाडीचे आयुर्विमा आणि कर सल्लागार राधाकृष्ण शेट्टी यांची आयुर्विमा क्षेत्रातील मानाचे जागतिक व्यासपीठ असलेल्या ‘मिलियन डॉलर राऊंड टेबल (एमडीआरटी)’च्या व्यवस्थापकी परिषदेवर क्षेत्रीय उपाध्यक्ष म्हणून २००९-१० सालासाठी नियुक्ती घोषित करण्यात आली आहे. एमडीआरटीच्या ८२ वर्षाच्या इतिहासात १५ सदस्यांच्या व्यवस्थापकीय परिषदेवर शेट्टी यांच्या रूपाने प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व केले जाणार आहे. शेट्टी यांच्या व्यावसायिक कर्तबगारीच्या पाश्र्वभूमीवर त्यांची १२ वर्षे ‘राऊंड टेबल मेंबर’ त्यात तीनवेळा ‘कोर्ट ऑफ द टेबल’ आणि पाच वेळा ‘टॉप ऑफ द टेबल’ सन्मानाने गौरव झाला आहे.