Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

वसमत रस्त्याचे दोन बळी
मालमोटारीखाली चिरडून शिक्षकाचा मृत्यू
परभणी, २४ जुलै/वार्ताहर
शहरातील वसमत रस्त्यावरून दुचाकीवर जाणाऱ्या शिक्षकाचा भरधाव वेगाने जाणाऱ्या मालमोटारीखाली चिरडून आज सकाळी मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी त्यामुळे तब्बल दीड तास या रस्त्यावरील वाहतूक बंद पाडली. आमदार संजय जाधव यांच्यासह शिवसैनिकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. गणेशनगरमधील महात्मा फुले विद्यालयाचे शिक्षक बाळासाहेब केरबाजी कांबळे (वय ४५) आज सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलीला पशुविज्ञान महाविद्यालयातून आणण्यासाठी मोटरसायकलने (क्रमांक एमएच २२ जे ३१७४)ं जात होते.

मरण स्वस्त होत आहे
आसाराम लोमटे
परभणी, २४ जुलै

शहरातला वसमत रस्ता दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. कृषी विद्यापीठासह अनेक महाविद्यालये, उद्याने, व्यापारी संकुले आणि शाळा या रस्त्यावर असल्याने हा रस्ता कायम वाहता असतो. गेल्या दोन वर्षात चाळीस मृत्यू या रस्त्यावर घडले आहेत. बांधकाम खात्याची अनास्था, रस्त्यापर्यंत झालेली अतिक्रमण, प्रसंगी वाहनधारकांची बेफिकिरी या सर्व बाबींमुळे या रस्त्यावरून प्रवास करणे एक दिव्य झाले आहे.

शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न
चाकूर, २४ जुलै/वार्ताहर

नळेगाव येथील जयजवान जयकिसान सहकारी साखर कारखान्यातील मळी चोरीच्या गुन्ह्य़ात अध्यक्षांसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी भोसले यांनी आज दुपारी १२ वाजता कारखाना कार्यस्थळावर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिक व पोलिस यांनी त्यांना अडविले. या मागणीसाठी श्री. भोसले यांनी उपोषण केले होते. त्या वेळी विशेष लेखाधिकारी बाळासाहेब फासे यांनी येत्या पंधरा दिवसांत कारवाई करू म्हणून लेखी आश्वासन दिले होते.

संग्रहालयात प्रश्नणी आणि पर्यटकही असुरक्षित
दत्ता सांगळे, औरंगाबाद, २४ जुलै

मराठवाडय़ातील पहिले प्रश्नणिसंग्रहालय असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्रश्नणी आणि त्यांना पाहण्यासाठी येणारे नागरिकही सुरक्षित नसल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे. संरक्षण भिंतीचा अभाव, नियमित डागडुजीसाठी पैसे नाहीत, प्रश्नण्यांना हिंडण्या-फिरण्यासाठी पुरेशी जागा नाही तसेच पर्यटकांसाठीही हवी तेवढी जागा नाही. त्यामुळे येथे जसे प्रश्नणी तसेच पर्यटकही असुरक्षित आहेत. आज सुदैवानेच काही अनिष्ट घडले नाही. अन्यथा पालिका प्रशासनाच्या या हलगर्जीपणाची मोठी किमत औरंगाबादकरांना चुकवावी लागली असती.

पढियंता!
विशिष्ट लेखक, विशिष्ट कलाकृती, विशिष्ट वाङ्मयप्रकार, कालखंड, वाङ्मयीन संस्कृती, कलास्वाद अशा निरनिराळ्या प्रश्नंतातून द. भि. कुलकर्णी यांनी आपल्या समीक्षेचा, अश्वमेधाचा घोडा मोठय़ा ऐटबाजपणे फिरून हा साकल्याचा प्रदेश जिंकून घेतला आहे. अमृतमहोत्सवानिमित्त आपल्या प्रिय, म्हणजेच पढियंता समीक्षकाचा त्यांच्याच एका एकलव्य विद्यार्थ्यांने केलेला हा गुणगौरव.

गिर्यारोहकांची सामाजिक बांधीलकी
डोंगरात फिरताना, संवेदनशील भटकताना ग्रामीण जीवन, उपेक्षित दुर्गवैभव अशा गोष्टींची सल हमखास जाणवतो. काही तरी करायला पाहिजे असे वाटत राहते पण नेमके काय आणि कसे करावे किंवा जे काही थोडेफार करीत आहोत ते कसे टिकवावे याबद्दल तो संभ्रमित असतो. डोंगरवेडय़ाच्या अशाच काही प्रश्नांना उत्तर नुकतेच झालेल्या एका आगळ्या परिसंवादातून मिळाले. सामाजिक बांधिलकी ही कामे करताना काय करावे यासंदर्भात या क्षेत्रातील गेली २०-२५ वर्षे कार्यरत असणाऱ्या धनंजय मदन, शेखर बर्वे, पद्माकर गायकवाड, चंद्रशेखर वझे आदी मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांची गेवराईला भेट
दोन मुलांचा मृत्यू
गेवराई, २४ जुलै/वार्ताहर
मेंदूज्वराच्या लशीमुळे तालुक्यात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला, तर अनेकांना ‘रीअ‍ॅक्शन’ आली. हा प्रकार कशामुळे झाला, याची चौकशी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे दिल्ली येथील अधिकारी डॉ. बलवीर यांनी आज मृत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांची भेट घेतली .लस टोचल्यानंतर तालुक्यातील मालेगाव येथील धनंजय बने व अर्धमसला येथील भाग्यश्री भिंगारे त्रास होऊन मृत्युमुखी पडले. अनेकांना त्रास झाला. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी डॉ. बलवीर आज येथे आले. जिल्हा उपरुग्णालयात जाऊन त्यांनी चौकशी केली. जिल्हा शल्यचिकित्सक बी. डी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बी. जी. चव्हाण, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही. एस. लाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए. ए. मनमुले व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय राऊत उपस्थित होते.

कनिष्ठ लेखाधिकारीपदासाठी आज परीक्षा; गैरप्रकार टाळण्यासाठी दक्षता
हिंगोली, २४ जुलै/वार्ताहर
जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लेखाधिकारी व परिचर पदासाठी २० परीक्षा केंद्रांवर उद्या (शनिवारी) लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षा पारदर्शक व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत यासाठी आज कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. परीक्षा केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू केले आहे. कनिष्ठ लेखाधिकारीपदासाठी चार उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले तर परिचर २८ पदांसाठी ६ हजार २६८ उमेदवार पात्र ठरले आहेत. दि. ११ जुलैला भरती प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या दोन पर्यवेक्षकांना निलंबित केले होते. उद्याच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी जिल्हा परिषदच्या सभागृहात कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा परिषदेचे िमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश माज्रीकर व अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड, शिवाजी गिरी यांनी मार्गदर्शन केले. परीक्षेत गैरप्रकार खपून घेतले जाणार नाहीत, असा इशारा श्री. माज्रीकर यांनी दिला.

दांपत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; महिलेचे निधन
अंबाजोगाई, २४ जुलै/वार्ताहर

दुर्धर रोगाची बाधा झाल्याचे समजल्यावर तालुक्यातील मगरवाडी येथील दांपत्याने काल सायंकाळी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचार चालू असताना आज सकाळी सहा वाजता महिलेचे (वय ३५) निधन झाले. तिचा पती (वय ३८) मृत्यूशी झुंज देत आहे.मगरवाड येथील या दांपत्याने काल स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात जाऊन रक्ततपासणी करून घेतली. त्यांना दुर्धर रोगाची लागण झाल्याचे त्यातून निष्पन्न झाल्यामुळे ते दोघेही घाबरून गेले. त्यांनी मोंढा भागातून एका औषधाच्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केले. त्यानंतर दोघेही गावात परत आले.सायंकाळी पती-पत्नीने दोन्ही मुलांची भेट घेतली. त्यांना खाऊसाठी पैसे दिले आणि स्वत:च्या मालकीच्या शेतात जाऊन विषारी औषध प्रश्नशन केले. हा प्रकार सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पुतण्यास लक्षात आला. त्याने दोघांनाही स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले.

परळीत चोरांचा धुमाकूळ
दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज चेरला
परळी वैजनाथ, २४ जुलै/वार्ताहर
शहरात मध्यरात्री चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घालत मध्यवर्ती भागातील सुमारे दहा ते बारा दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. संतप्त व्यापाऱ्यांनी आज सकाळीच बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. आरोपींना चार दिवसांत अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.‘डुबे किराणा स्टोअर्स’, ‘धुमाळ कलेक्शन’, ‘व्यंकटेश फोटो स्टुडिओ’, ‘माने किराणा स्टोअर्स’, ‘परिवार प्रश्नेव्हिजन्स’, ‘नव्हाडे ज्वेलर्स’, ‘अभिषेक ज्वेलर्स’ या दुकानांमध्ये मध्यरात्री चोरी झाली. सकाळी दुकान उघडल्यावर व्यापाऱ्यांचे हे लक्षात आले.दरम्यान चोऱ्या झाल्याचे समजताच श्री. धनंजय मुंडे, नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, बाजार समितीचे सभापती बंकटराव कांदे आदींनी बाजारपेठेत जाऊन दुकानांची पाहणी केली. आरोपींना तत्काळ अटक करा, असा आग्रह व्यापाऱ्यांनी धरला आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठ बंद ठेऊन सर्व व्यापाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी चार दिवसांत चोरटे पकडले जातील अशी ग्वाही दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ उघडली.

चार दरोडेखोरांना पोलीस कोठडी
चाकूर, २४ जुलै/वार्ताहर
पोलिसांनी काल अटक केलेल्या टोळीतील चार दरोडेखोरांना बुधवापर्यंत (दि. २९) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज दिला. घरणी येथील पथकर नाका लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या राजू ऊर्फ जगदीश तोमर (आग्रा), बॉबी सुभेसिंग वर्मा (उत्तर प्रदेश), पिंटू ऊर्फ पंकज शर्मा (मुरादाबाद, उत्तर प्रदेश), मुकेश दर्शनसिंग सिकरवाल ठक्कर (मध्य प्रदेश) यांना पोलिसांनी काल अटक केली. त्यांच्याकडून हत्यारे जप्त करण्यात आली होती. यातील मुन्नासिंग सुभेदार परमार (आग्रा) पळून गेला. पोलिसांनी या सर्वाची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांकडून मागविली आहे. फरारी मुन्नासिंगला शोधण्यासाठी नांदेड येथे पथक पाठविले होते; परंतु तो सापडला नाही.

दोन दुकानांतून ७२ हजारांचा ऐवज चोरला
हिंगोली, २४ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील कन्हेरगाव नाका येथील नागनाथ ज्वेलर्स व सद्गुरू ट्रेडिंग कंपनी या दोन दुकानांतून एकूण रोख १२ हजार रुपये व सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरांनी पळविले. दोन्ही दुकानमालकांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कान्हेरगाव नाका येथे आज पहाटे चारच्या सुमारास चोरांनी नागनाथ ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानातील रोख रक्कम दोन हजार व सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले. सद्गुरू ट्रेिडग कंपनी या दुकानातून रोख रक्कम १० हजार रुपये चोरांनी लांबविले. या घटनेतील चोरटय़ांचा तपास लावण्यासाठी घटनास्थळी श्वानपथक बोलाविले होते, मात्र श्वानपथकाला चोरटय़ांचा मार्ग दाखविण्यात यश आले नाही.

मुख्याध्यापकाचा महिलेवर अतिप्रसंग
उदगीर, २४ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील वाढवणा येथील आश्रमशाळेतील एका मुख्याध्यापकाने सहकारी शिक्षकाच्या पत्नीवर आज दुपारी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. वाढवणा येथील आश्रमशाळेचा मुख्याध्यापक धनराज सिद्दपा बावगे (वय ४५) याने सहशिक्षकाच्या पत्नीवर आज दुपारी दीड वाजता अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत ही महिला जखमी झाल्याचे समजते. फिर्याद घेण्यास वाढवण पोलिसांनी टाळाटाळ केली होती. रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते.

खुनाच्या आपोपावरून दोघांवर गुन्हा दाखल
गंगाखेड, २४ जुलै/वार्ताहर
धारखेड शिवारात बुधवारी शिरच्छेद केलेला मृतदेह आढळला. मृताची ओळख पटली आहे. त्याचे नाव विनायक सखाराम लंगोटे (दुसलगाव) आहे. पोलिसांनी आरोपी दामोदर दत्तराव चोरघडे (धारखेळ) व पार्वती ऊर्फ कुसूम लंगोटे यांना अटक केली आहे. आरोपी चोरघडे विनायकच्या धाकटय़ा भावाचा सासरा व पार्वती त्याची भावजय आहे. पोलिसांनी सांगितले की, वादावादीतून चोरघडे याने विनायकचा कोयत्याने शिरच्छेद केला.तसेच मृतदेह बैलगाडीने गोदावरी पुलानजीक फेकून दिला. विनायक व त्याच्या लहान भावाची पत्नी पार्वती गेल्या दोन वर्षापासून शेतात एकत्र राहत होते. शनिवारी हे दोघे दामोदर दत्तराव चोरघडे (धारखेड) यांच्याकडे शेतात पाईप आणण्यासाठी गेले. ती घरी गेली व विनायक दामोदर यांच्याबरोबर शेतातच राहिला. शेतात दोघांनी दारू प्यायली. त्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. रागाने दामोदरने कोयत्याने विनायकच्या डोक्यावर वार केला. याचे मुंडकेच छाटले, असे पोलिसांनी सांगितले.

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ४ ऑगस्टपासून बेमुदत संप
नांदेड, २४ जुलै/वार्ताहर
सहावा वेतन आयोग व अन्य मागण्यांसाठी वरिष्ठ महाविद्यालयीन प्रश्नध्यापकांचा संप झाल्यानंतर आता महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यभरातील कर्मचारी ४ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आले.राज्य सरकारच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या विभागांमध्ये संपाचा मोसम सुरू आहे. ‘मार्ड’च्या संपानंतर सरकारी सेवेतील डॉक्टर्स, मग अनुदानित महाविद्यालयांचे प्रश्नध्यापक, त्या पाठोपाठ वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. इतर अधिकारी- कर्मचारी संघटनाही संपाच्या तयारीत असताना महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा देत, राज्य सरकारवरील दबाव वाढविला.

मोटारीसाठी विवाहितेचा छळ
औरंगाबाद, २४ जुलै/प्रतिनिधी

चारचाकी खरेदी करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करण्याबरोबरच जिवे मारण्याची धमकी देऊन फसवणुकीने तलाकनाम्यावर सह्य़ा घेतल्याप्रकरणी शब्बीर पटेल आणि त्यांच्या कुटुंबातील चौघांविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. हिना कैसर फारुख पटेल या विवाहितेने दिलेल्या तक्रारीत फारूख शब्बीर पटेल, शब्बीर पटेल, शकील पटेल आणि आसीफ पटेल हे आरोपी असल्याचे म्हटले आहे. ७ जून ते २१ जुलै या कालावधीत हा छळ झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हिना यांनी मोटार खरेदीसाठी माहेराहून दीड लाख रुपये आणावेत या मागणीसाठी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. वेळोवेळी त्यांना जिवे मारण्याचीही धमकी देण्यात येत होता. त्यानंतर आरोपींनी मालमत्ता खरेदी करण्याचे कारण पुढे करून हिना यांचा तलाकनाम्यावर सह्य़ा घेतल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हिना यांनी उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

‘राष्ट्रीय कृषिविमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा’
बीड, २४ जुलै/वार्ताहर
राष्ट्रीय कृषिविमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून पीक पेरा केलेल्यास सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी मोहन कट्टे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विमा योजनेबाबत श्री. कट्टे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या वेळी नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक एस. एस. परुळकर, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक शरद घायाळ, कृषी अधिकारी बी. एम मिसाळ, जिल्हा कृषी अधीक्षक रमेश भताने उपस्थित होते.कुट्टे म्हणाले, प्रत्येक गावाला दत्तक बँक आहे. त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी कृषी विम्याचा हप्ता भरावा. दत्तक बँक नसेल तेथे जिल्हा बँकेत हप्ता भरण्याची सोय करण्यात आली आहे. पीक विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. यासाठी विमा हप्ता भरताना सातबाराचा उतारा तसेच तलाठय़ाने दिलेले पीक पेरा प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे अशी माहिती कृषी विभागातर्फे सांगण्यात आली.दहा हजार रुपयांपर्यंतच्या संरक्षित रकमेचे बंधन वगळून आता कितीही संरक्षित रकमेचा विमा काढता येऊ शकतो. या योजनेमध्ये पूर्वीपेक्षा जास्त पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे, असे या वेळी सांगण्यात आले.

‘पीकविमा प्रकरणी दिशाभूल थांबवावी’
लातूर, २४ जुलै/वार्ताहर

पीकविमा प्रकरणी निलंग्याचे आमदार संभाजी पाटील व औसाचे आमदार दिनकर माने यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आंदोलने सुरू केली आहेत. ती त्यांनी थांबवावी अन्यथा उच्च न्यायालयात त्यांच्या विरोधात याचिका दाखल करू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके व संतोष नागरगोजे यांनी दिला आहे.या दोघा आमदारांनी आमच्या तालुक्याची खोटी आणेवारी देऊन शासनाने विरोधी पक्ष म्हणून अन्याय केला आहे, अशी आवई उठवली आहे. आणेवारीचा व पीकविम्याचा कसलाही संबंध नाही. सर्व पक्षांनी शेतकरी हिताची भूमिका घेतली पाहिजे. पीकविमा मंजूर करण्याची सदोष पद्धती बदलण्यास भाग पाडले पाहिजे, त्यासाठी मनसे पुढाकार घेणार असल्याचे साळुंके म्हणाले.

बनावट बियाणांबद्दल शेतकऱ्यांची तक्रार
लोहा, २४ जुलै/वार्ताहर
कारेगाव येथील तीन शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात यशोदा कंपनीच्या सोयाबीनचे बियाणे पेरणीसाठी खरेदी केले; परंतु ते बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड या तीन शेतकऱ्यांना सोसावा लागला. याची चौकशी करावी, अशी लेखी तक्रार तीन शेतकऱ्यांनी केली आहे.बाबुराव बालाजी मोरे, संजय रामदास किरकडे, गोपाळ विनायक मोरे (सर्व राहणार कारेगाव) यांनी शहरातील दिलीप कृषी सेवा केंद्राकडून यशोदा नावाचे सोयाबीन बियाणे खरेदी केले. ते शेतात पेरले, पण पेरा उगवलाच नाही. या संदर्भात गट विकास अधिकाऱ्यांकडे तिन्ही शेतकऱ्यांनी लेखी तक्रार केली. कृषी विभागाने पंचनामाही केला; परंतु बनावट बियाणे देऊन आम्हा शेतकऱ्यांची या कंपनीने फसवणूक केली, असे या शेतकऱ्यांनी सांगितले. संबंधित दुकानदार आणि कंपनीवर कारवाई करावी व नुकसानभरपाई द्यावी, अशी लेखी तक्रार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडेही एक प्रत देऊन केली आहे.

उपनगराध्यक्षपदी चाऊस
बीड, २४ जुलै/वार्ताहर
माजलगावच्या उपनगराध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य सहाल चाऊस यांची आज बिनविरोध निवड झाली. या पदाच्या निवडणुकीसाठी आज नगरपालिकेची सभा झाली. उपाध्यक्षपदासाठी श्री. चाऊस यांचा एकमेव अर्ज होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक डक यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली आहे.

हिमायतनगरमधील गॅस्ट्रोच्या रुग्णाचा मृत्यू
नांदेड, २४ जुलै/वार्ताहर
हिमायतनगर तालुक्यातील एकंबा येथे गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक रुग्ण प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत, तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी नांदेडला आणले जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे एकंबा येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गॅस्ट्रोमुळे जवळपास ७० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात कोंडबा गणपत वाघमारे (वय १८) याचा मृत्यू झाला. पंचकुला वाघमारे, सुमन पिटलेवाड, मधुकर वानखेडे, सुनीता कल्याणकर, छाया सोनकांबळे, श्रीरंग राणे, नितीन सूर्यवंशी, विजयमाला लुम्दे, गजानन शिलेमाने, संतोष वाघमारे. ज्ञानेश्वर पिटलेवाड, राजाबाई माने, नामदेव बेलखोडे, पुंजाराम कोंकेवाड, भाग्यश्री लुम्दे यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. गॅस्ट्रोचा फैलाव लक्षात घेता गावकऱ्यांनी पाणी शुद्ध करून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे डॉ. चव्हाण, दामोदर राठोड यांनी केले आहे.

सभापतिपदाच्या मुदतवाढीच्या शक्यतेने राजकीय हालचाली थंडावल्या
गंगाखेड, २४ जुलै/वार्ताहर
राज्यातील पंचायत समितीच्या सभापतींना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळणार असल्याच्या शक्यतेने जवळपास सर्वच ठिकाणच्या राजकीय हालचाली थंडावल्या असल्याचे दिसते. सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. तालुक्याच्या राजकारणावर पंचायत समितीचे राजकारण प्रभाव पाडते हे लक्षात घेऊन सरकारकडून विद्यमान सभापतींना सहा महिने मुदतवाढ देऊन एक प्रकारे बोनसच देण्यात येणार आहे. त्यातच बहुतांश ठिकाणी सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती असल्याने त्यांना खुश करण्याचा सरकारचा विचार असल्याचे दिसते.राज्यातील बहुतांश ठिकाणचे पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. परिणामी इच्छुकांची मोर्चेबांधणी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच सहा महिन्यांच्या मुदतवाढीचा निर्णयही दृष्टिक्षेपात असल्याने तूर्त राजकीय हालचाली थंडावल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.

‘महिला सक्षमीकरणासाठी मोठे प्रकल्प उभारण्यात येणार’
बीड, २४ जुलै/वार्ताहर
महिला सक्षमीकरणासाठी बचतगटा-च्या माध्यमातून मोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षणास पाठविले जाईल, असे जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. नगरपालिकेच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेत महिला व बालिकांचा विकास गटांना बँकेमार्फत कर्ज, अनुदान व जनश्री विमा काढलेल्या महिलांच्या मुलांमुलींना शिष्यवृत्ती वाटप, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे कर्जवाटप करण्याचा कार्यक्रम ‘वृंदावन गार्डन’ येथे झाला. या वेळी श्री. क्षीरसागर बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा अग्रणी बँकेचे पी. आर. रामदासी होते. डॉ. भारतभूषण क्षीरसागर, नविदुज्जमा, उपाध्यक्ष फारूक पटेल,अरुण डाके, ए. यू. कवडे आदी उपस्थित होते.

बायरक्रॉप सायन्सच्या चर्चासत्राला चांगला प्रतिसाद
सिल्लोड, २४ जुलै/वार्ताहर
कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान या विषयावर सिल्लोड येथे बायरक्रॉप सायन्सने चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी बन्र्ड नाफ उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत कापूस पिकावर उच्च तंत्रज्ञानाला अनुसरून कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी कोणते बदल अपेक्षित आहेत या विषयावर चर्चा करण्यात आली. संदीप पाटील यांनी रोग व किडीच्या नियंत्रणाविषयी माहिती दिली. सतीश अजने, जेन्स हरीमन, रामाराव, अनिल जैन या वेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्याधर बढे यांनी केले. विलास चव्हाण यांनी आभार मानले.

माहूर अविश्वास ठरावावर १२ ऑगस्टला चर्चा
नांदेड, २४ जुलै/वार्ताहर

माहूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी दि. १२ ऑगस्टला विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज तसा आदेश काढला. सभापती सुनीता रुणवाल व उपसभापती निर्मला राठोड सदस्यांना विश्वासात घेऊन काम करीत नाहीत असा आरोप करीत भारतीय जनता पक्षाचे शरद राठोड, अर्जुन दवणे, काँग्रेसचे किसन राठोड व राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद दुमाले यांनी अविश्वास ठराव आणला आहे. सहा सदस्यांच्या पंचायत समितीत शिवसेना व भा. ज. प. यांचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे.

दीडशे सेवा संस्थांची १५ वर्षापासून निवडणूक नाही!
अंबड, २४ जुलै/वार्ताहर
अंबड व घनसावंगी तालुक्यांतील १५८ विविध सहकारी संस्थांपैकी १४० संस्थांच्या निवडणुका गेल्या १५ वर्षांपासून झाल्याच नाहीत. संचालकांची उदासीनता आणि आर्थिक परिस्थिती याला कारणीभूत असल्याची माहिती सहायक निबंधक ए. आर. पुरी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.अंबड तालुक्यात ७० व घनसावंगी तालुक्यात ८८ सेवा संस्था आहेत. निवडणूकपात्र संस्थांच्या निवडणुका संस्थांची आर्थिक परिस्थिती ज्यात २० ते २५ हजार रुपये खर्च अपेक्षित असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेने घालून दिलेली तीन हजार रु. खर्चाची मर्यादा, संचालक मंडळाची निवडणुकीबाबत असलेली उदासीनता याबरोबरच निवडणुकीसाठी सहायक निबंधक कार्यालयाकडे असणारा कर्मचारीवर्ग अशा विविध कारणांमुळे निवडणुकीची वाट पाहावी लागत आहे. मुदतबाह्य़ संचालक मंडळ ं काम करीत आहे, ही आश्चर्याची बाब आहे.

शालेय पोषक आहारातील खिचडीत आयोडीनयुक्त मिठाऐवजी साधे मीठ
वसमत, २४ जुलै/वार्ताहर

शालेय पोषक आहाराच्या खिचडीत आयोडीनयुक्त मीठ न वापरता जाडे मीठ वापरत असल्याचे आढळून आले. शिक्षण विभागाने तातडीने लक्ष द्यावेत अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे.
तालुक्यातील जोडजवळा येथे शालेय पोषक आहाराच्या खिचडीमध्ये पाल शिजल्याने २५ जणांना विषबाधा झाली. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले होते. जी खिचडी या शाळेत दररोज शिजते. त्या खिचडीत आयोडीनयुक्त मिठाचा वापर न करता चक्क जाडे मीठ वापरत असल्याचे पहावयास मिळाले. ज्या खोलीत खिचडी शिजली त्याच ठिकाणी जाडे मीठ आढळून आले. आयोडीनयुक्त मीठ १२ रुपये किलो व जाडेमीठ २ रुपये किलो असून, हे दहा रुपये वाचविण्यासाठी हा खेळ चालू असल्याचे पहावयास मिळाले.ग्रामीण भागातील अनेक शाळेत खिचडी दर्जाहीन शिजविली जात असल्याचा आरोप पालकांनी केला. खिचडी लागणारे साहित्य स्वस्तामध्ये आणून तयार केली जात आहे असाही आरोप आहे.

पतीस सक्तमजुरीची शिक्षा
जालना, २४ जुलै/वार्ताहर
पत्नीवर प्रश्नणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून आशीष विलास साळवे यास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि तीनशे रुपये दंड अशी शिक्षा दिली. त्याची पत्नी सुनीता साळवेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून दोषारोपत्र दाखल केले होते. जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीमती वि. ग. खरे यांनी हा निकाल दिला. सरकारची बाजू वकील प्रदीप जाधव यांनी मांडली.

धानोऱ्यात दीड लाखांची घरफोडी
लोहा, २४ जुलै/वार्ताहर

धानोरा (मुक्ता) येथील गोपीनाथ गायखर व रामदास गायखर या बंधूंच्या घरी मध्यरात्री झालेल्या चोरीत दीड लाख रुपयांचा ऐवज गेला. अज्ञात चोरांनी भिंतीवर चढून घरात प्रवेश केला. वाडय़ातील खोल्यांना साखळी लावून दार बंद केले. लोखंडीपेटय़ा घेऊन चोर पसार झाले. त्यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम होती. लोहा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तंटामुक्ती गाव समितीकडून धानोरा येथे पाहणी
लोहा, २४ जुलै/वार्ताहर
महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभि-यानात जिल्हा समितीने तालुक्यातील धानोरा येथे आज पाहणी केली. समितीत बी. डी. शिंदे,श्रीकांत मोरे,एम. एस. सौंदाळे, रमाकांत भदरगे यांचा समावेश होता. पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर, तहसीलदार संतोष गोरड उपस्थित होते.

वर्षा पौळ बी. एड. परीक्षेत प्रथम
गंगाखेड, २४ जुलै/वार्ताहर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नुकत्याच घेतलेल्या बी. एड्. परीक्षेत परभणीच्या शासकीय बी.एड्. महाविद्यालयातून वर्षा पौळ सर्वप्रथम आली आहे. तिने बी. एड्. परीक्षेत ७४.५० टक्के गुण मिळविले.