Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

सत्यम घोटाळा : आरोपींच्या ब्रेन मॅपिंगला उच्च न्यायालयात आव्हान
हैदराबाद, २४ जुलै / पी.टी.आय.

सत्यम कॉम्प्युटरच्या घोटाळ्याबाबत कंपनीचे संस्थापक बी. रामलिंगा राजू व यांची यांची सीबीआयमार्फत ब्रेन मॅपिंग वा लाय-डिटेक्टरसारखी वैज्ञानिक चाचणी करण्याच्या दिलेल्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका राजू यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दाखल केली आहे. कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक एम. डी. रामाराजू व माजी सीएफओ

 

वाल्दामिनी श्रीनिवास यांचीही चाचणी करण्याचे आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिले होते.
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करावा, असे सांगून राजू यांच्या वकिलांनी सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, राज्य गुन्हा अन्वेषण व सीबीआय यांनी राजू यांची कोठडीत सर्वप्रकारे चौकशी केली असून त्यांची लाय डिटेक्टरच्या वा अन्य प्रकारच्या वैज्ञानिक चाचणीसाठी कोणतेही वॉरंट बडावण्यात आलेले नाही. याचिका उद्या सुनावणीसाठी घेण्यात येण्याची शक्यता आहे. सदर आदेशामध्ये कनिष्ठ न्यायालयाने ही वैज्ञानिक चाचणी दोन महिन्यांमध्ये घेण्यात यावी, असे म्हटले आहे.