Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

हल्ल्याची शक्यता नसली तरी संघ मुख्यालयाला कडक सुरक्षा
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी

मुंबईसह राज्यात सात ठिकाणी दहशतवादी हल्ले होण्याचे संकेत गेल्या आठवडय़ात मिळल्यानंतर

 

आता नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय उडवण्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी याचा इन्कार केला असला तरी, कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. महालातील गजबजलेल्या वस्तीत संघाचे मुख्यालय आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने बॉम्ब स्फोटाद्वारे संघ मुख्यालय उडवण्यात येईल, असे वृत्त काही वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यावर खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांना असा कुठलाही ई-मेल प्राप्त झाला नाही, असा खुलासा पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.