Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

भूसंपादन विधेयकास ममता बॅनर्जींचा विरोध
नवी दिल्ली, २४ जुलै / पी.टी.आय.

औद्योगिकीकरणासाठी जमीन संपादन करण्याच्या प्रस्तावित विधेयकाला रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बॅनर्जी यांनी आपले आक्षेप उपस्थित केले. काल मंत्रिमंडळात २००७ च्या भूसंपादन कायद्यातील दुरुस्तीसंदर्भातील विधेयकावर चर्चा

 

करण्यात आली. या विधेयकात ७० टक्के जमीन खासगी विकासकाने मिळवायची आहे तर ३० टक्के जमीन राज्य सरकारने संपादित करून द्यायची आहे. जमीन संपादन करताना विकासक गुंडगिरी करतात असा आरोप करून या संदर्भात विकासकांना रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईची तरतुद करण्याचा ममता बॅनर्जी यांनी आग्रह धरला आहे. तृणमूलने विधेयकासंदर्भात आपल्या सूचना यापूर्वीच सरकारकडे दिल्या आहेत. यातील दुरुस्त्यांसंदर्भात बैठकीत तीन तास चर्चा झाल्याचे समजते.