Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

नेपाळमधील समस्येला सर्व पक्ष जबाबदार
संयुक्त राष्ट्रे :
नेपाळमधील सध्याच्या समस्येला तेथील सर्व पक्ष सारखेच जबाबदार आहेत, असे

 

संयुक्त राष्ट्रांचे नेपाळमधील प्रतिनिधी करिन लॅण्डग्रेन यांनी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. सर्व पक्ष आता पुढे येऊन आपले मतभेद बाजूला ठेवून समस्येवर तोडगा शोधतील, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांमध्ये सर्व पक्षांनी जी कृती केली त्यामुळे तेथील शांतता निर्मितीची प्रक्रिया थंडावली होती, असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या की, ही प्रक्रिया आता पुढे एकमताने व सुसंवादाने सुरू ठेवून तसेच आपापसातील मतभेद संपवून सर्व पक्षनेते एकत्रितपणे काम करतील, अशी अपेक्षा आहे. या नेत्यांनी राजकीय वातावरण चांगले राहावे यासाठी नियमित सुसंवाद ठेवायला हवा, अशीही सूचना केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या नेपाळ मिशनची मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढविण्यात आली असून त्याचेही त्यांनी स्वागत केले.