Leading International Marathi News Daily

रविवार, २६ जुलै २००९

लोकसत्ता रविवार वृत्तान्त! | नागपुर रविवार वृत्तान्त! | विदर्भरंग!

डार्विन ते डॉकिन्स..
डॉ. सिद्धिविनायक बर्वे

जगाची वैचारिक संकल्पना बदलून टाकणारी उत्क्रांतीवादाची संकल्पना मांडणाऱ्या चार्लस् डार्विन या महान शास्त्रज्ञाची द्विजन्मशताब्दी यंदा साजरी होत आहे व उत्क्रांतीवादाच्या क्रांतिकारी सिद्धांताला या वर्षी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात ५ ते १० जुलै २००९ दरम्यान डार्विन महोत्सव व वैज्ञानिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
आधुनिक काळात नावीन्य व प्रगती साधण्याच्या उद्देशाने डार्विन व उत्क्रांतीवादाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच डार्विन व डार्विनवादाची जगाला नव्याने ओळख होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

राख्यांच्या बाजारात ‘झूझू’
प्रश्नजक्ता कदम

‘बालगणेश’, ‘हॅरीपॉटर’, ‘हनुमान’, ‘शिनचॅन’, ‘मिकी’, ‘स्पायडरमॅन’, ‘सुपरमॅन’ आदी बच्चेकंपनीचे मन मोहून टाकणाऱ्या, त्यांना आकर्षित करणाऱ्या राख्यांच्या यादीत यंदा ‘झूझू’ची भर पडली आहे. ‘आयपीएल’ मालिकेदरम्यान दूरचित्रवाहिन्यांवरील जाहिरातींमधील सर्वाच्याच कुतूहलाचा विषय ठरलेल्या ‘झूझू’ने राख्यांच्या बाजारातही प्रवेश केला असून ‘झूझू’ची राखी सगळ्यांचेच आकर्षण ठरली आहे.

विजय बजरंग पथकाची एक्झिट
प्रशांत केणी

डिलाइल रोड या कामगार भागातील ६० वष्रे जुनी विजय बजरंग संघाचा गोविंदा यंदापासून बंद करण्याचा निर्णय संस्थेच्या कार्यकारिणीने घेतला आहे. गेल्या काही वर्षात गोविंदा पथकांना आलेले व्यावसायिक स्वरुप, अधिकाधिक थर रचून दहीहंडी फोडण्यासाठी लागणारी चुरस, पर्यायाने गोविंदा पथकात सहभागी होणाऱ्या युवकांच्या जीवाशी होणारा खेळ, या गोष्टी योग्य नाहीत. याची तीव्रतेने जाणीव झाल्यामुळे आम्ही गोविंदा पथक बंद करीत आहोत, अशी माहिती विजय बजरंगचे कार्याध्यक्ष आणि कबड्डीतील पहिले अर्जुन पुरस्कारविजेते सदानंद शेटय़े यांनी सांगितले.

‘Microwave चकणा!'
आजच्या तरुणाईचा आरसा

तरुण पिढी उथळ, उच्छृंखल आहे, आत्मकेंद्री आहे.. कमालीची व्यवहारी आहे.. त्यांना इतरांशी काही देणंघेणं नसतं.. आपलं सुख आणि स्वार्थापलीकडे त्यांना कशाचीच पर्वा नसते.. शारीर नाती आणि शारीर भाषाच या पिढीला समजते व मानवतेही.. प्रेम, माया, ममता, विश्वास, त्याग, दुसऱ्याकरता झिजणं, सोसणं, संयम, नैतिकता वगैरे गोष्टींना त्यांच्या आयुष्यात थारा नाहीए.. वगैरे अनेक आरोप या पिढीवर केले जात असतात. अलीकडेच हिंदी चित्रपटसृष्टीतील एकेकाळचा चॉकलेट हीरो ऋषी कपूर याने एका मुलाखतीत ‘प्रेम’ या विषयावर बोलताना त्याच्या व नीतू सिंगच्या प्रेमप्रकरणातील हळुवारपणा, सुरुवातीचा बुजरेपणा, परस्परांची मनं जिंकण्यासाठी उभयतांनी केलेले अलवार प्रयत्न यांबद्दल भरभरून सांगितलं. आणि त्याचवेळी आजच्या तरुण पिढीची प्रेमाची भाषा मात्र आपल्याला समजत नाही, हेही स्पष्टपणे कबूल करून टाकलं होतं.

फ्लेमिंगो
तिकोना किल्ल्याची वाट. डोक्यावर पाऊस. दिवसभर पायपीट करून खाली उतरताना कारवीच्या दाट दमट जाळीत कुठलंतरी गडद गुलाबी रंगाचं फूल दिसतं. आम्ही पायाखालची वाट सोडून जाळीत डोकावतो. आधी एक.. मग दोन, मग तीन आणि मग अनेक अनेक.. आमचे डोळेच दिपले. अत्यंत दमट-काळोख्या अशा वातावरणातही ती फुलं छान टवटवीत दिसत होती. फुलांचा आकार पाहून माझा कलाकार छायाचित्रकार मित्र रूपक साने चटकन म्हणाला,Flamingo सारखी दिसत आहेत. नीट पाहिल्यावर मलाही फ्लेमिंगो पक्ष्यांचा भास झाला. तीच फ्लेमिंगोसारखी वाकडी ‘चोच’, उंच मान, काटक बांधा आणि सर्वात महत्त्वाचा-छान गुलाबी रंग. मग आम्हीच या फुलांचं बारसं केलं! आमच्यापुरतं त्याचं नाव ठेवलं-‘फ्लेमिंगो.’