Leading International Marathi News Daily

रविवार, २६ जुलै २००९

गंगुबाईंचा आवाज आपल्याला परिचित असलेल्या आवाजापेक्षा वेगळा असा पातळ, तारस्वरी आणि हलका होता. पण पुढे आपल्या कल्पकतेने मेहनत करून गंगुबाईंनी आपला आवाज रुंद, भरीव आणि जोरदार केला. तो पुरुषी भासत असे. त्यामुळे काहीजण त्यांना गंगुबाईंपेक्षा गंगुबुवा म्हणत. या आवाजाला साजेशा अशाच त्या बैठकीत मांडी घालून गायला बसत. धारवाड येथे ५ मार्च १९१३ रोजी जन्मलेल्या गंगुबाई हनगळ २१ जुलै २००९ रोजी वयाची ९६ वर्षे पुरी करून अनंतात विलीन झाल्या. गंगुबाईंचे गाणे २००२ साली थांबले त्या वेळी त्या ८९ वर्षांच्या होत्या. पण एखादा कलाकार वयाच्या ८९ व्या वर्षांपर्यंत आपली कला सादर करीत राहू शकतो हासुद्धा जागतिक विक्रम असू शकतो. त्यातून गाण्यासारखी दमसास लागणारी कला. हे अधिक अवघड काम असते. गंगुबाईंचे गुरू रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथी महोत्सवात गंगुबाईंचा आवाज लागेना तेव्हाच त्यांनी जाहीरपणे सांगून टाकले की, ही माझी शेवटची सेवा आहे.

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे येत्या सोमवारी ५०व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत; त्यानिमित्ताने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रेखाटलेल्या ठाकरे-पुरंदरे कौटुंबिक संबंधांच्या आठवणी- ठा करे घराण्याचं आणि आमच्या पुरंदरे वाडय़ाचं जिव्हाळ्याचं नातं गेल्या जवळजवळ शंभर वर्षांचं. प्रबोधनकार ‘कोदंड’ म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे तीर्थरूप वडील. माझ्या वडिलांचे ते मित्र होते. प्रबोधनकारांची लेखणी म्हणजे थोरल्या महाराजांच्या पाचनखी वाघनखातील मधले नखच होते.


सु धीर फडके तथा बाबुजी गेले व संगीतातील एक सुरेल पर्व संपले. प्रत्येक मराठी रसिकमन हेलावले. नाते हे फक्त रक्ताचे नसते. अभिजात कलाकार व कलासक्तप्रेमी यांचे नाते अधिक जिव्हाळ्याचे व अतूट असते. इथे फक्त भरभरून एकमेकांना द्यायचे असते. बाबुजींच्या चैतन्यांनी भारलेल्या सुरांनी मराठी मनाला जवळजवळ साठ वर्षे रिझवले, फुलवले, जोपासले. त्यांचे भावजीवन समृद्ध केले. ‘वंदे मातरम्’, ‘मीना स्वयंवर’, ‘माया बाजार’, ‘पुढचं पाऊल’, ‘लाखाची गोष्ट’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘सुवासिनी’, ‘प्रपंच’, ‘मुंबईचा जावई’ या त्यांच्या चित्रपटांतील अवीट गोडीच्या गाण्यांनी बालपणी व तारुण्याच्या उंबरठय़ावर साथ दिली नसती तर हे मध्यमवर्गीय प्रापंचिक जीवन किती बेसूर व भेसूर झाले असते याची कल्पनाही करवत नाही. त्यांचे गीतरामायण म्हणजे गेल्या शतकातील चमत्कारच म्हणावा लागेल! त्यांच्या सुरेल माधुर्यपूर्ण स्वरांनी मराठी मनाला अध्यात्माची गोडी लावली, अस्थिर मनांना सात्त्विक आनंद दिला.

ए क महान मन:शक्ती, एक महान इच्छाशक्ती, एक थोर आणि सुप्रसिद्ध लोकाग्रणी आपले उद्दिष्ट साध्य करीत असताना त्याच्या कार्यक्षेत्रांतून निघून गेला आहे. लोकमान्य टिळकांच्या विषयी राष्ट्राच्या मनात काही विशेष भाव वसत होता, कारण ते एक राष्ट्राचे प्रभावी अंग होऊन राहिले होते. राष्ट्राच्या भूतकालीन प्रयत्नांची मूर्ती व राष्ट्राच्या मुक्त आणि उच्चतर जीवनार्थ चाललेल्या चालू संग्रामाचे धुरीण ते झाले होते. लोकमान्यांनी बजाविलेली कामगिरी व त्यांचे व्यक्तिमत्त्व यायोगे ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या मालिकेत त्यांची गणना झाली आहे. अल्पत: प्रारंभ झालेली कार्ये त्यांच्या हातून अति त्वरेने कळसास पोहोचली, अगदी अध्र्याकच्च्या साहित्यातून त्यांनी महान गोष्टी निर्मिल्या. नवीन स्वरूपाची अत्यंत बलशाली आणि आत्मनिष्ठ राष्ट्रीय भावना, जनतेच्या जीवनात व मनात राजकीय वृत्तीची पुनर्जागृती, स्वातंत्र्यप्राप्तीविषयी व राष्ट्रकार्याविषयी तीव्र आकांक्षा व राष्ट्राच्या ध्येयभूत कर्तव्याविषयींची जाणीव या गोष्टी ते आपल्यामागे ठेवून गेले आहेत.

महाराष्ट्राच्या संदर्भात ‘पुरोगामी’ या बिरुदाचा अलीकडच्या काळात अभिमानाने नव्हे, सातत्याने उपहासानेच उल्लेख होऊ लागला आहे. जात- पात, धर्म आणि अस्मितेच्या विघातक राजकारणामुळे कधी नव्हे तो इथला समाज तुकडय़ा-तुकडय़ात विभागला जाऊ लागला आहे. एरवीसुद्धा विषमता मग ती जातीय असो वा आर्थिक, सुस्थितीतला भारतीय समाज विषमतेच्या तत्त्वाला जाहीरपणे विरोध करण्याऐवजी मूक संमतीच देत आला आहे. त्या पाश्र्वभूमीवर लातूर जिल्ह्य़ातल्या हासेगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत दाखल एचआयव्ही पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांवर बहिष्कार टाकण्यासाठी इतर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याची घडलेली घटना म्हणूनच फारशी धक्कादायक वाटत नाही.

इराणमध्ये गेल्या १२ जूनला झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महमूद अहमदिनेजाद यांनी भल्या- बुऱ्या मार्गाचा अवलंब करून विजय मिळविला असा आरोप होत असून, त्यांच्या परिणामी त्या देशामध्ये राजकीय संघर्ष पेटला होता. निदर्शने सुरू होती असे चित्र प्रसारमाध्यमांनी त्या देशांतील घडामोडींच्या केलेल्या वृत्तांकनावरून उभे राहिले आहे. निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूनेच कसा लागेल यासाठी तेथील विद्यमान सरकारने केलेले प्रयत्न यांना एकवेळ कमी महत्त्व देऊ.

‘सिएरा क्लब’तर्फे देण्यात येणारे ५० लाख रुपयांचे पर्यावरण पुरस्कार अहमदाबादची सेवा, राजस्थानमधील बेअरफुट कॉलेज आणि हिमाचल प्रदेशातील स्पिती नदीच्या खोऱ्यात काम करणाऱ्या ईको-स्फीअर या संस्थांना जाहीर झाले आहेत. त्यांचे वितरण मुंबईतील रवींद्र नाटय़ मंदिरात येत्या गुरुवारी (३० जुलै) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. त्यानिमित्त या संस्थेची करून दिलेली ओळख.. ए खाद्या अमेरिकी संस्थेने, त्यातही बिगरसरकारी संस्थेने जगाला पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला तर..? तर तो फारसा गांभीर्याने घेतला जाणार नाही, कारण अमेरिकेकडूनच पर्यावरणाची पायमल्ली होत असेल तर त्यांच्या संस्थांनी दिलेला सल्ला मानणार कोण? सर्वसाधारणपणे अमेरिकी संस्थांची अशी प्रतिमा असली तर त्याला मोजकेच का होईना पण सन्माननीय अपवाद आहेत.