Leading International Marathi News Daily

रविवार, २६ जुलै २००९

शैक्षणिक भूखंडाच्या श्रीखंडाचा चक्का !
पालिकेचे १०० कोटी पाण्यात
संजय बापट
शहरातील मोक्याचे भूखंड आपल्या मर्जीतील शिक्षण संस्थांच्या घशात घालण्याचा डाव प्रशासनाच्या नव्या धोरणामुळे उधळला गेल्याने पालिकेला १०० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले असून ठाणेकरांनाही १० नव्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना मुकावे लागले आहे. या प्रक्रियेत आपले उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचाही अपेक्षाभंग झाला आहे. ठाण्यात आजही उच्च शिक्षणासाठी
महाविद्यालय व तंत्रशिक्षण विद्यालयांची वानवा आहे.

पेकाट मोडलेले चौक
भगवान मंडलिक

६०-७० वर्षापूर्वी कल्याणडों िबवली पालिका हद्दीतील रस्त्यांची उभारणी झाली. या रस्त्यांचे उद्घाटन ज्या नामवंत मंडळींनी केले, त्यातील काही आता ऐंशी-नव्वदीच्या घरात आहेत, तर काहींना देवाज्ञा झाली आहे. जे वृद्ध झाले आहेत, ते प्रकृतीला मानवेल असे वातावरण पाहून सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. या मंडळींनी उद्घाटन केलेले रस्ते, चौकही आता म्हातारे झाले आहेत. वृद्धत्वाकडे झुकल्यानंतर माणूस जसा आपल्या प्रकृतीची काळजी घेतो, तशी या रस्त्यांची काळजी घ्यायला कोणीच वाली नाही. रस्ते, चौकांना खड्डे पडले की तेवढय़ापुरती मलमपट्टी केली जाते.

पवना खोऱ्यातील सौंदर्य : बेडसे लेणी
रामदास ग. खरे

बुद्धकाळापासून लेण्यांची संस्कृती सुरू झाली. हे एक मोठं परिवर्तनच होते. पाषाणामध्ये खोदकाम करून, शिल्प आकारून, भिंतीवर चित्र रेखाटून कथा सांगण्याची संस्कृती निर्माण झाली. कलेला बहर आला आणि या कलामाध्यमातूनच त्यांनी अनोख्या महाकाव्यांना नवं रूप दिलं! महाकाव्याची मानसिक गरज अजिंठा, वेरुळसारख्या अतिभव्य, सुंदर पाषाणातून पूर्ण झाली. त्यामुळेच रामायण, महाभारतानंतर महाकाव्य रचली गेली नाहीत याचे दु:ख अजिबात नाही. म्हणजेच शब्दाऐवजी पाषाण हे माध्यम आलं.

चित्रकलेतील एकलव्यबाणा..
प्रशांत मोरे

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतीही प्रतिकूल परिस्थती एखाद्याला ध्येय गाठण्यापासून परावृत्त करू शकत नाही. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ ही वरकरणी असंभव वाटणारी उक्ती जिद्दी माणसं आपल्या कर्तृत्वाने सार्थ करून दाखवितात. वाडा तालुक्यातील बाळू धनंजय दिवा हा तरुण चित्रकार अशांपैकीच एक. चित्र काढण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारी हाताची बोटं नसतानाही दोन्ही हातांच्या मुठी आणि एकमेव अंगठय़ाच्या सहाय्याने खडू, ब्रश किंवा पेन्सिल धरून बाळूने आपल्यातल्या चित्रकाराला समर्थपणे अभिव्यक्त केले आहे.

वारसा.. सुरांच्या तंद्रीतला
अभय जोशी

साधारण २६/२७ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. पुण्यातलं एक मध्यमवर्गीय, परंतु विख्यात शास्त्रीय गायकाचं घर. घरात किशोरीबाईंच्या भूप रागाची रेकॉर्ड आणली होती. ही रेकॉर्ड वाजू लागल्यानंतर या गायकाचा तीन वर्षांचा नातू तल्लीन होऊन ऐकत असे. रेकॉर्ड संपली की ती पुन्हा लावा असा त्याचा हट्ट. रेकॉर्ड ऐकून मध्येच डुलकीही काढायची असा खेळ त्याचा सुरू होता. मात्र ही रेकॉर्ड बंद झाल्यानंतर पुन्हा लावण्याचा त्याचा हट्ट कायमच..

डिंगणे ते मुंबै बँक व्हाया कुलाबा!
आत्माराम नाटेकर

सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे या दुर्गम खेडेगावात गरीब कुटुंबात एक मुलगा जन्माला आला. तो दिवस होता, १५ जुलै १९३४, आषाढ अमावास्या. आपल्या वंशाला दिवटा जन्मला म्हणून जन्मदात्या आईने त्याला वाऱ्यावर सोडून दिले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. बुरसटलेल्या समजुती आणि अंधश्रद्धेपायी बळी जाणारा एक जीव साक्षात ‘नारायण’ दत्त म्हणून उभा राहिल्याने वाचला होता. पुढे तोच त्याचा तारणहार झाला. मुंबईस आणून या मुलाचे संगोपन केले. कालांतराने कुलाबा हेच त्या मुलाचे कार्यक्षेत्र बनले. जिद्द, चिकाटी आणि परिश्रम या बळावर उत्तम सावंत (दादा) मुंबै जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षपदी निवडून आले. सहकार क्षेत्रातील ही अग्रणी बॅंक म्हणून ओळखली जाते. गेल्याच आठवडय़ात दादांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले.

रघुवीरनगर प्रभाग ‘आयएसओ’ करणार
भाजपच्या जया सोनवणे यांचा दावा
डोंबिवली/प्रतिनिधी
भविष्यात रघुवीरनगर प्रभाग कसा नागरी सुखसुविधांनी सुसज्ज असेल हा भविष्यवेधी दृष्टिकोन समोर ठेवून मी निवडणूक लढवीत आहे. नवीन लोकांना संधी द्या हा विचार मी मतदार नागरिकांसमोर मांडत आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असा दावा भाजप उमेदवार जया सोनवणे यांनी केला आहे. रघुवीरनगर प्रभागाला ‘आयएसओ’ करणे हे माझे विजयानंतरचे पहिले उद्दिष्ट आहे.