Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

आज प्रश्नत्यक्षिके दाखविणार
जागतिक ऑलिम्पिया स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांत येण्याची मनीषा -डेनिस वूल्फ
औरंगाबाद, २६ जुलै/खास प्रतिनिधी

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मि. ऑलिम्पियामध्ये पहिल्या तीन क्रमांकांच्या खेळाडूंमध्ये मला

 

स्थान मिळवायचे आहे. त्यासाठी सध्या जोरदार तयारी चालू आहे, असे जागतिक दर्जाचा शरीरसौष्ठवपटू डेनिस वूल्फने पत्रकारांना सांगितले.
४३ व्या आशियायी शरीरसौष्ठव स्पर्धेच्या अंतिम फेरी दरम्यान जर्मनीचा गाजलेला शरीरसौष्ठवपटू डेनिस वूल्फ याची प्रश्नत्यक्षिके सोमवारी दुपारी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव संघटनेने केलेल्या सहकार्यामुळे डेनिस वूल्फची प्रश्नत्यक्षिके औरंगाबादकरांना बघावयास मिळणार आहे. या महान शरीरसौष्ठवपटूचे प्रश्नत्यक्षिके बघून औरंगाबादकरांच्या डोळ्यांची पारणे फिटली जातील असा विश्वास भारतीय व आशियायी शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस संजय मोरे यांनी व्यक्त केला.
डेनिस वूल्फ हा प्रथमच भारतात आला आहे. लास वेगास येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या मि. ऑलिम्पिया स्पर्धेत एक प्रबळ दावेदार म्हणून डेनिस वूल्फचे नाव घेतले जाते. ५ फूट ९ इंच उंची, २४८ किलो वजन अशी त्याची शरीरयष्टी. तो काय खातो, पितो या विषयी माहिती जाणून घेण्याविषयी पत्रकारांमध्ये उत्सुकता होती. वर्षभर व्यायाम करतोच पण स्पर्धेच्या दहा आठवडेआधी व्यायाम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. शरीराच्या प्रत्येक अवयवांचे व्यायाम मी करतो. दिवसभरातून अडीच तास आणि आठवडय़ातून पाचच दिवस व्यायाम करत असल्याची माहिती डेनिस वूल्फने दिली.
जागतिक स्पर्धेत मि. ऑलिम्पिया होण्याचा त्याचा मानस आहे. २००५ मध्ये तो जागतिक विजेता ठरला होता. आता मि. ऑलिम्पियामध्ये मात्र त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. डेनिसने शौक म्हणून शरीरसौष्ठव खेळायला प्रश्नरंभ केला. आज तो पुरता व्यावसायिक बॉडी बिल्डर झाला आहे. दिवसभरातून चार वेळा जेवण करत असल्याची माहितीही त्याने दिली. सकाळी अंडय़ाचा नाष्टा केल्यानंतर दुपारच्या वेळी ३०० ग्रॅम चिकन, मासा, भात असा आहार मी घेत असल्याची माहिती त्याने दिली. ३० वर्षीय डेनिस वूल्फला खरी लढत द्यावी लागेल ती गतवेळचा विजेता डेकस्टर जॅकसन, जे. कटलर, फिलहीथ, व्हिक्टर मार्टिनेझ या शरीरसौष्ठवपटूंशी. गेल्या ऑलिम्पिया स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर डेनिसला समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र मी पहिल्या तीन खेळाडूंमध्ये येण्यासाठी कसून तयारी करत आहे. सध्या मी ट्रेनरच्या सांगण्यानुसार व्यायाम करतो आणि माझी पत्नीच मला डायटच्या संदर्भात सूचना देते, असेही डेनिस वूल्फ म्हणाला.