Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

गंगाखेड शहरातील दोन घरे चोरटय़ांनी फोडली!
गंगाखेड, २६ जुलै/वार्ताहर

शहरातील बळीराजा कॉलनीतील रहिवासी प्रश्न. भगवान भोसले व प्रश्न. आत्माराम सिताफळे यांची

 

घरे रात्री चोरटय़ांनी फोडीत सुमारे पन्नास हजारांचा माल लंपास केला आहे. दरम्यान शहरात चोरीच्या घटना वाढल्याने पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
काल रात्री शहरातील बळीराजा कॉलनी येथे चोरटय़ांनी हैदोस माजवीत मोठी चोरी करण्याचा प्रयत्न केला. बहुतेक घरांची चाचपणी केल्यानंतर दोन घरात घुसून चोरी करण्यात चोरटे यशस्वी झाले.
प्रश्न. भगवान भोसले यांच्या घरामागील लोखंडी खिडकी तोडून आत प्रवेश करीत कपाट तसेच सुटकेसमधील १४ हजार ५० रुपये नगदी व ३१ हजारांचे सोन्याचे दागिने पसार केले. ही खोली बाजूस असल्याचा फायदा घेत आतून कडी लावून घेत चोरटय़ांनी सफाईदारपणे चोरी केली.
या घरालगतच असलेल्या प्रश्न. आत्माराम सिताफळे यांच्याही घरात कोणीच नसल्याची संधी साधत चोरटे कुलूप तोडून आतमध्ये शिरले. मात्र त्यांच्या हाती काहीच
लागले नाही.
दरम्यान चोरीच्या तपासासाठी श्वानपथक मागविण्यात आले होते. मात्र श्वानास कुठलाच थांगपत्ता लागला नाही. विशेष म्हणजे चोरटय़ांनी प्रश्न. सिताफळे यांच्या पटांगणात शेजारच्या चप्पल आणून ठेवीत चालाखी करण्याचा प्रयत्नही केला आहे.
शहरात चोरींचे वाढते प्रमाण रोखण्यात शहरातील दोन्हीही पोलीस बीट अकार्यक्षम ठरल्याने दोन्हीही बीट जमादारांना बदलत कार्यक्षम बीट जमादार नेमावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.