Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

आजपासून परभणीत भारत निर्माण लोकमाहिती मोहीम
परभणी, २६ जुलै/वार्ताहर

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३१

 

जुलैदरम्यान बी. रघुनाथ सभागृह येथे पाचदिवसीय भारत निर्माण लोकमाहिती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या (दि. २७) कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते होणार आहे.
पाच दिवस चालणाऱ्या मोहिमेत पत्रसूचना कार्यालयासह जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, क्षेत्रीय संचालनालय, जाहिरात व दृश्य प्रसाद संचालनालय, गीत व नाटक विभाग, आकाशवाणी, दूरदर्शन, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे विभाग सहभागी होणार आहेत.
यानिमित्ताने २७ ला सकाळी शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य रॅलीत विविध शाळांतील १५०० विद्यार्थी हातामध्ये पर्यावरण, एड्स ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंतप्रधान सडक, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी योजनांच्या घोषवाक्याचे फलक घेऊन सहभागी होणार आहे. या रॅलीला शनिवार बाजार येथून नगराध्यक्षा जयश्री खोबे हिरवा झेंडा दाखवतील. यात प्रचार निर्देशनालयाचे पुणेचे संचालक जगदीश्वर पवार, पत्रसूचना कार्यालय मुंबईचे संचालक मनीष देसाई, सहसंचालक सी. के. सिंह, शिक्षणाधिकारी एम. बी. पवार सहभागी होणार आहेत. बी. रघुनाथ सभागृह येथे विसर्जित होणाऱ्या रॅलीनंतर राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल व त्यानंतर सरपंच व ग्रामसेवकांचा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर यावर मेळावा होईल.
या दिवशी विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित या पाच दिवसांत माहितीचा अधिकार, कायदा, महिला सबलीकरण, माता-पालन पोषण मोहीम, युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन, दहशतवाद विरोधी व्याख्यान, अंधश्रद्धा निर्मूलन, एड्स जनजागृती इत्यादी विषयांवर त्याच्या क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात येत आहे. याशिवाय सभागृहाच्या ठिकाणई दररोज दुपारी ३ वा. क्षेत्रीय प्रचार संचालनालयातर्फे बालचित्रपट महोत्सव २८ ते ३० जुलै व सायं. ५ ७ दरम्यान गीतनाटय़ विभागातर्फे मनोरंजनापासून जनजागृतीचे कार्यक्रम सादर करण्यात येतील. रात्री ७ ते ९ दरम्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या येतील. ३१ ला या मोहिमेस समूह नृत्य स्पर्धेने समारोप होणार आहे. या मोहिमेतून जाहिरात व दृकश्राव्य संचालनालयाचे ‘उद्दितमान भारत’ या विषयावर प्रदर्शन भरविण्यात येईल, विविध योजनांचे माहिती देणारे २५ स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात येईल.
या मोहिमेदरम्यान अमरावती व नांदेड येथील एक पथक एड्स जनजागृती व रोजगार हमी योजनाविषयक परभणी तालुक्यातील बलसा, सायळा, सोन्ना, टाकळी या गावांत कार्यक्रम घेणार आहेत.