Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेचे शानदार उद्घाटन
औरंगाबाद, २६ जुलै/खास प्रतिनिधी
औरंगाबाद जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने

 

आयोजित ४३ व्या आशियायी शरीरसौष्ठव स्पर्धेला रविवारी प्रश्नरंभ झाला. या स्पर्धेत २० देशांचे ६० शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले आहेत. सोमवारी दुपारी या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे.
वेगवेगळ्या गटातील विजेत्यांना मि. आशिया हा मानाचा किताब दिला जातो. आतापर्यंत विविध गटाच्या विजेत्यांना एकत्र येऊन मि. आशिया निवडण्याची पद्धत होती. आता ही पद्धत डावलून प्रत्येक गटासाठी मि. आशिया हा किताब दिला जातो, अशी माहिती भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस संजय मोरे यांनी दिली. उत्तेजक द्रव्य चाचणीच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव महासंघ अत्यंत कडक पावले उचलत आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता उत्तेजक द्रव्य सेवन करणारे शरीरसौष्ठवपटू स्पर्धेकडे पाठ फिरवत आहे. याचा परिणाम या आशियायी स्पर्धेवरही झाला आहे, असेही श्री. मोरे यांनी सांगितले.
या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री अरुण यादव यांच्या हस्ते झाले. या वेळी व्यासपीठावर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, महापौर विजया रहाटकर, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव महासंघाचे अध्यक्ष डॉ. राफेल सॅन्टोजा, आशियायी शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस संजय मोरे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेदरम्यानच भारतामध्ये शरीरसौष्ठवसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संघटकांचा सत्कार करण्यात आला. भारतीय शरीरसौष्ठवपटू संघटनेचे कोषाध्यक्ष राजेश सावंत (मुंबई), उपाध्यक्ष डॉ. रणधीर हस्तीर (पंजाब) यांना डॉ. सॅन्टोजा यांच्या हस्ते रौप्यपदक देऊन सन्मान करण्यात आला. प्रेमसिंग यादव (मध्य प्रदेश), श्री. पन्नीकर (केरळ) आणि अजित सिद्धमवार (कर्नाटक) या पदाधिकाऱ्यांनाही आंतरराष्ट्रीय संघटनेतर्फे कांस्य पदक देऊन सन्मानीत करण्यात आले.
सोमवारी सकाळी ११ वाजता ९ वजनी गटांच्या अंतिम फेरींना प्रश्नरंभ होणार आहे.