Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

दारू पिण्यावरून एकाचा खून
औरंगाबाद, २६ जुलै/प्रतिनिधी

दारू पिण्यासाठी सोबत येण्याच्या कारणावरून दोघांनी एकास भोकसल्याने त्याचा मृत्यू झाला. ही

 

घटना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिसारवाडी येथे घडली. राजू श्यामराव मिसाळ (वय ३२) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा खून केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी समाधान लक्ष्मण दांडगे आणि प्रवीण दांडगे (दोघेही राहणार मिसारवाडी) या दोघांना अटक केली आहे.
राजू याने दारू पिण्यासाठी सोबत यावे, असे समाधान आणि प्रवीण याचे म्हणणे होते. यास राजूने विरोध केला. यावरून त्यांच्यात वाद झाला. समाधान आणि प्रवीण यांनी राजू याच्यावर चाकूने वार केले. त्याला जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दारू पिण्यासाठी पैसे देण्याच्या कारणावरून याच ठिकाणी काल दोघांनी एकास बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम काढून घेतली होती. आज त्याच ठिकाणी ही घटना घडली.