Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘बिग बझार’चा मतिमंदांना मदतीचा हात!
औरंगाबाद, २६ जुलै/प्रतिनिधी

भारतातील आघाडीची रिटेल मार्केट साखळी असलेल्या बिग बझारने महाराष्ट्रात प्रथमच कॉर्पोरेट

 

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत मतिमंदांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अन्नछत्र उपक्रमातून बिग बझार निधी उभारणार आहे.
फ्यूचर समूहाचे बिग बझार ३१ जुलैला दुपारी साडेबारा ते चार या वेळेत आपल्या सर्व ग्राहकांना जेवणाचे निमंत्रण देत आहे. अन्नछत्र नामक या उपक्रमादरम्यान ग्राहकांना स्वेच्छेप्रमाणे रक्कम देण्याचे आवाहन करेल. शहरातील नवजीन मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तो जमलेला निधी देण्यात येईल, अशी माहिती बिग बझारच्या वाणिज्य व्यवस्थापक सोनाली पाध्ये यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
सकारात्मक समाज घडविण्यासाठी समाजातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा बिग बझारच्या अश्नी बियानी यांची आहे. अन्नछत्र उपक्रम दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी राबविण्याचा प्रयत्न असून त्यातून जमणारा निधी विविध सामाजिक संस्थांना देण्यात येईल, असेही सोनाली पाध्ये यांनी सांगितले. यावेळी शाळेच्या संचालिका शकुंतला गांधी, जयश्री केंद्रे यांची उपस्थिती होती.