Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘राज्यातील दीडशे जाती केंद्राच्या लाभापासून वंचित’
लातूर, २६ जुलै/वार्ताहर

ज्या जातींना राज्य सरकारकडून सवलती मिळतात त्यातील १५० जातींना अद्यापि केवळ त्यांचे नेते

 

जागरुक नाहीत म्हणून केंद्र सरकारच्या सवलती मिळत नसल्याची खंत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे सदस्य अब्दुल अली अझिझी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
अझिझी एक दिवसाच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर होते. त्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्राच्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाहीत.
कोटय़वधी रुपयांचा निधी उपलब्ध असताना केवळ मागणी नाही म्हणून तो निधी खर्च होत नसल्याचे ते म्हणाले. ऊर्दू भाषा प्रचारासाठी ४ संगणक, ४ शिक्षक, २ कर्मचारी दिले जातात. मात्र, अशा योजना लोकांना माहीत होत नाहीत.
रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात स्मशानभूमीची कामे घेण्याची सूचनाही आपण मांडली असल्याचे ते म्हणाले.
लघु उद्योगासाठी कर्ज दिले जातात. गरीब माणूस हा अधिक प्रश्नमाणिक असतो. मात्र त्यांच्यावर विश्वास टाकून त्याला मदतीचा हात दिला गेला पाहिजे. सामान्य माणसापर्यंत योजना पोहोचविण्यास अपयश हे सर्व स्तरावर नीट काम न होण्यातच असल्याची कबुली त्यांनी दिली.