Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘ आठवलेंच्या पराभवाचा वचपा काढणार’
गंगाखेड, २६ जुलै/वार्ताहर

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या शिर्डी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची

 

‘सल’ आंबेडकरी जनतेच्या मनातून उतरलेली नाही. त्याचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची युती मोडीत काढू. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसना ‘अस्मान’ दाखवीत स्वबळावर गंगाखेड विधानसभा निवडणूक आपण स्वत: लढविणार आहोत, असे प्रतिपादन रिपाइं (आठवले गट)चे तालुकाध्यक्ष सतीश घोबाळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात आज शुक्रवारी रिपाइं कार्यकर्त्यांसह बैठक झाली. यामध्ये आठवले यांच्या पराभवास दोन्ही काँग्रेस कारणीभूत असल्याचे मत व्यक्त होऊन विधानसभा स्बळावर लढविण्याबाबत चर्चा झाली.
बैठकीस घोबाळे यांच्यासह सरचिटणीस दिगंबर घोबाळे, शहराध्यक्ष दशरथ तायडे, विठ्ठल साळवे, अ‍ॅड. गौतम हुलगुडे तसेच, ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही काँग्रेसना रोषास तोंड द्यावे लागेल अशी परिस्थिती आहे.