Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘पीकविमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा’
परळी वैजनाथ, २६ जुलै/वार्ताहर

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरलेल्या

 

राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेचा बीड जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते पंडितअण्णा मुंडे यांनी केले.
या योजनेंतर्गत पीकविम्याची रक्कम भरण्यासाठी ३१ जुलै अंतिम तारीख असल्याने बीड जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी उपरोक्त तारखेपर्यंत पीकविम्याची रक्कम बँकेत भरणे आवश्यक आहे. पीक पेरा केलेल्या सर्व कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे देशात राष्ट्रीय कृषी पीकविमा योजना लागू करण्यात आली. गेल्या काही वर्षात या योजनेचा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात लाभ झाला आहे. त्यामुळे यावर्षीही शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता त्वरेने बँकेत जमा करावा, असे आवाहन श्री. मुंडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.