Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

मुंडे यांना अपेक्षित विकास करू - लोहिया
परळी वैजनाथ, २६ जुलै/वार्ताहर

गोपीनाथ मुंडे यांना अपेक्षित सर्वागीण विकास करून त्यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ

 

करू असे नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
शहराच्या भविष्यातील पाणीप्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी २९ कोटी रुपयांच्या स्वजल निर्मल योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेत नगरपालिकेला ६५ लाख रुपये भरावे लागतील व त्यानंतर या योजनेचा साडेसहा कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळेल.
शहराच्या स्वच्छतेसाठी चार अ‍ॅपे ऑटो, ३० हातगाडी, एक टिप्पर असे एकूण १५ लाख रुपये खर्चून वाहन खरेदी करण्यात आली असून रस्त्याची साफसफाई करण्यासाठी व्हॅक्युमक्लीनरची खरेदी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील रस्तेविकास, बागांची योग्य देखभाल, नागरिकांच्या तक्रारी जिथल्या तिथे सोडविण्याचा प्रयत्न आदी गोष्टींना प्रश्नधान्य असणार आहे. नागरिकांनी सर्व विकासकामात सहकार्य करावे, असे नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी आवाहन केले.