Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू
हिंगोली, २६ जुलै/वार्ताहर

वसमत तालुक्यातील पोटा (खुर्द) येथील विवाहिता अनिता समृतकर (वय ३०) नागपंचमीच्या

 

सणासाठी आडगाव (रंजे) येथे दुचाकीवरून माहेरी जाताना खाली पडल्याने मरण पावली.
अनिता समृतकर यांना नागपंचमीच्या सणाला माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचा भाऊ पोटा खुर्द येथे शनिवारी सकाळी आला होता. परंतु शेतातील काम असल्याने संध्याकाळी नवऱ्यासोबत मोटारसायकलने येते, असे सांगून त्यांनी भावाला परत पाठवले. शेतातील काम आटोपून त्या दोन मुलांना घेऊन मोटारसायकलवरून शनिवारी सायंकाळी आडगाव (रंजे) येथे जाताना गुंडापाटीजवळ मोटारसायकल खड्डय़ात गेल्याने अनिता जमिनीवर पडल्या. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
त्यांना परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता रात्री तिचे निधन झाले. मोटारसायकलवरील त्यांची मुले व नवऱ्याला मात्र इजा झाली नाही. या घटनेमुळे आडगाव (रंजे) व पोटा (खुर्द) येथे शोककळा पसरली आहे.