Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

महासत्ता बनविण्यासाठी कुशल तंत्रज्ञांची गरज - शिवराज पाटील
अंबाजोगाई, २६ जुलै/वार्ताहर

देश महासत्ता बनविण्यासाठी कुशल तंत्रज्ञांची गरज असून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय

 

पातळीवर गुणवत्तेचा दबदबा निर्माण करावा, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी केले. लातूरच्या महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या अंबाजोगाई येथील टी. बी. गिरवलकर तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते.
चाकूरकर बीड जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी दोन्ही महाविद्यालयांना भेटी दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड, सांबप्पा गिरवलकर, प्रश्नचार्य बी. आय. खडकभावी, प्रश्नचार्य एम. बी. शेट्टी यांनी चाकूरकरांचा सत्कार केला. त्यानंतर महाविद्यालयाची पाहणी केली.
यावेळी श्री. चाकूरकर म्हणाले, या संस्थेने तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय झाली आहे. याचा फायदा देशाला होणे आवश्यक आहे. भारत महासत्तेकडे वाटचाल करत असल्याने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवत्तेचा दबदबा निर्माण करून देशाची मान उंचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रश्नचार्य खडकभावी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा प्रश्नस्ताविकात घेतला. यावेळी अ‍ॅड्. विजयकुमार शेटे, प्रश्नचार्य त्रिंबक कडगे, अ‍ॅड्. शांतवीर चौधरी, प्रश्न. पी. ए. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. एस. ए. बिराजदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.