Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

जालना शहराजवळ टोलनाका उभारणीस विरोध
जालना, २६ जुलै/वार्ताहर

जालना शहरानजीक औरंगाबाद रस्त्यावर टोलनाका सुरू करू नये यासह इतर मागण्यांसाठी

 

भारिप- बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी विलास ठाकूर यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद रस्त्यावर जालना शहरालगत टोलनाका सुरू करण्यात येणार असल्यामुळे त्याचा भुर्दंड पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागेवाडी बौद्धविहार, एमआयडीसी, आरटीओ कार्यालय, इंजिनीयरिंग कॉलेजेस, महिको कंपनी आदी ठिकाणी जाणाऱ्या शहरवासीयांना व विद्यार्थ्यांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे हा टोलनाका शहरापासून १५ किलोमीटर दूर हटविण्यात यावा. पोलिसांसाठी आधुनिक वाहनांची तरतूद करावी, गायरान जमिनी मागासवर्गीयांना वाटप कराव्यात, सेतू सुविधा केंद्रात कायमस्वरूपी नायब तहसीलदाराची नेमणूक करावी, विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र घरपोच देण्यात यावे आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. भारिप बहुजन महासंघाचे मराठवाडा युवक अध्यक्ष सुधाकर निकाळजे, जिल्हाध्यक्ष चोखाजी सौंदर्य यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी ठाकूर यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले.