Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

विद्यार्थ्यांनी ताज्या घटनांची माहिती घ्यावी - पोफळे
बीड, २६ जुलै/वार्ताहर

सध्याचे युग हे स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच जगातील रोज घडणाऱ्या

 

घटनांची माहिती घ्यायला हवी, असे आवाहन प्रभारी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे यांनी व्यक्त केले.
बीड शहरातील अल फताह इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हल्पमेंटतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतील बक्षीसपात्र मुलांना शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. या वेळी प्रश्नचार्य डॉ. मोहम्मद इलियास फाजील व इतर मान्यवर उपस्थित होते.
मिल्लिया कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी दायमी इस्बाह फातेमा हिने ऊर्दू माध्यमातून दहावीच्या परीक्षेत जिल्ह्य़ातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर स्पर्धा परीक्षेत सर्वप्रथम आलेले मोहम्मद रेहान, लबीहा आयेशा तर सर्वद्वितीय सबा नाझ, काझी गुफरान, फरहा नाझ तर सर्वतृतीय जवेरिया तमकीन, अफशा समरीन, मोमीन रसिला सदफ यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देण्यात आली.