Leading International Marathi News Daily
रविवार, २६ जुलै २००९

लाभदायक राश्यांतर
पंचमात शनी, दशमात राहू आणि शुक्र-बुधाच्या राश्यांतरामुळे मेष व्यक्तींच्या विचारांना वेग येईल. कृतीला आकार मिळेल आणि प्रयत्न सार्थकी लागल्याचा आनंदही मिळणार आहे. शनिवापर्यंत आपण अशाच सरळ मार्गाने पुढे पुढे सरकत राहणार आहात. गुरू राश्यांतरात समस्या नाहीत. त्यामुळे शेती, व्यापार, राजकारण यामध्ये स्थिरता निर्माण करता येईल. शिक्षणातले प्रश्न सोडवता येतील. शुक्र, हर्षल केंद्रयोगात प्रलोभनात अडकवू नये यासाठी मात्र सावध राहा.
दिनांक- २८, २९, ३० शुभकाळ
महिलांना- अचानक मार्ग सापडतील.

समीकरणं साधता येतील
रविवारी शुक्राचे राश्यांतर होत आहे. सोमवारी शुक्र, गुरूचा नवपंचम योग होत आहे. यांच्या परिणामांनी प्रगतीची समीकरणे साधता येतील. सफल परिश्रमातून नवा विश्वास मिळेल. चतुर्थात सुरू होत असलेल्या बुध- शनीचा सहयोग काही प्रांतात परीक्षा घेणारा राहील. महत्त्वाची पुस्तकं, कागदपत्रं सांभाळा; ऐनवेळी उपयोगात येतील. गुरू राश्यांतरात संधीचा झटपट लाभ उठवता येईल. प्रापंचित जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. परमेश्वरी चिंतनाला नवा मार्ग मिळेल. शुभवार्ता समजतील. प्रत्येक पाऊल विचाराने टाका आणि शब्दांनी गोंधळ वाढवू नका.
दिनांक : २६, २७, ३१, १ शुभकाळ
महिलांना : जवळचे आप्त- मित्र भेटतील.

आव्हानं दबाव आणतील
बुध-शुक्राचे राश्यांतर परिणामांनी चांगले असले तरी गुरूच्या राश्यांतरातून काही काळ नवीन आव्हानं समोर येण्याचा संभव आहे. व्ययस्थानी मंगळ असल्याने आव्हानामध्ये दबावही राहील. मिथुन व्यक्तींनी साहसांनी कृती करू नये. शुक्र-हर्षल केंद्रयोग होत असल्याने प्रलोभनापासून दूरच राहावे. सोमवारचा शुक्र- गुरू नवपंचम योग आर्थिक समस्या दूर करणारा ठरेल. बौद्धिक क्षेत्रात मिथुन व्यक्ती चमकतील. धर्मकार्यातून आनंद मिळेल. प्रवास कराल. नवे परिचय उपयुक्त ठरतील.
दिनांक - २८, २९, ३० शुभकाळ.
महिलांना- प्रत्येक पाऊल विचाराने टाका.

रवी, मंगळ आधार देतील
साडेसातीचे परिणाम व्ययस्थानी प्रवेश करणाऱ्या शुक्रामुळे प्रपंच प्राप्ती आणि शांती यावर तीव्र होतात. अष्टमातील गुरूमधील बदलही त्वरित समाधानाचा ठरणारा नाही; परंतु रवी-मंगळाच्या आधाराने प्रतिष्ठा प्राप्ती संरक्षणात ठेवता येईल. श्री मारुतीची उपासना, आराधना मन:शांतीची ठरणारी आहे. स्पर्धा टाळा. आरोग्य, देवघेव, प्रवास यात सावधानता बाळगा. आरोग्य सांभाळा, खर्चावर नियंत्रण ठेवा. बुध-नेपच्यून प्रतियोगात महत्त्वाच्या वस्तू हरवण्याचा संभव असतो. काळजी घ्या.
दिनांक - २६, २७, ३१, १ शुभकाळ
महिलांना - साहस करून संकटांना निमंत्रण नको.
नवे परिचय उपयुक्त ठरतील.

मूठ पक्की राहील
साडेसाती, अनिष्ठ राहू, केतू त्यात वक्री गुरूचा समावेश होत असल्याने नव्या चिंता, नवीन समस्या निर्माण होतात. नजीकच्या काळात सिंह व्यक्तींच्या कार्यप्रांतात प्रवेश करणं शक्य आहे. बुध- शुक्राचे राश्यांतर, दशमात मंगळ आपल्या प्रयत्नाला सहकार्य करणार असल्याने झाकली मूठ पक्की राहील. धकाधकीतही कार्यपथावरील उपक्रम सुरू ठेवता येतील. प्रलोभनं, हलक्या विचारांची परिचित मंडळी, साहसी प्रयोग यांपासून दूर राहा. संकट टळतील. धर्मकार्यातून आनंद मिळेल.
दिनांक - २६ ते ३० शुभकाळ
महिलांना- आरोग्य, देवघेव यात सावध राहा.

मार्ग सापडतील
शुक्र-गुरूचे राश्यांतर, पंचमात राहू आणि शुक्र-गुरू नवपंचम यांच्यातील प्रतिक्रिया प्रयत्नात विश्वास निर्माण करतील. साडेसाती, व्ययस्थानी येणारा बुध यांच्या अनिष्ठतेवर मात करून मार्ग शोधून सफलता मिळवता येईल. व्यापारी देवघेव, प्रापंचिक प्रश्न सामाजिक संपर्क, आरोग्याच्या तक्रारी, परिचितांमधील वाद यांचा समावेश त्यात होईल. यामध्ये श्री मारुतीची उपासना, आराधना साथ देऊ शकेल. बुध, गुरू प्रतियोगात दस्तऐवज सांभाळावा लागतो. स्पर्धा टाळा. आरोग्य सांभाळा, खर्चावर नियंत्रण ठेवा.
दिनांक - २६ ते ३० शुभकाळ.
महिलांना - संमय सोडू नका, यश मिळेल. धर्मकार्यातून आनंद मिळेल.

विघ्ने येतील, चुका टाळा
बुध-शुक्राचे राश्यांतर उत्साह आणि यश यांच्यासाठी उपयुक्त ठरतील; परंतु गुरू राश्यांतर नवी नवी विघ्ने निर्माण करणार असल्याने अवास्तव साहस कटाक्षाने टाळा. दुसऱ्यांवर विश्वासून कार्यक्रम आखू नका. शनीचं सहकार्य प्रतिष्ठा मजबूत ठेवण्यास उपयुक्त ठरणार आहे. शुक्र-नेपच्यून नवपंचम योग अनपेक्षित संधीतून महत्त्वाची प्रकरणे मार्गी लावावयास उपयुक्त ठरणारा आहे. आर्थिक-प्रापंचिक दडपणेही कमी करता येतील. चुका मात्र टाळाच.
दिनांक : २८ ते ३१ शुभ काळ.
महिलांना : समस्यांवर हुशारीने मार्ग शोधावे लागतील. बुध-शुक्र त्यात यश देतील.

ग्रहबदल प्रगतीचे ठरतील
बुध-गुरूमध्ये होत असलेले बदल वृश्चिक व्यक्तींना लाभाचे ठरणार आहेत. त्यातून स्थगित प्रकरणांना वेग देता येईल. आर्थिक तणाव दूर होतील. संपर्क-प्रवास-चर्चा यांचा प्रगतीसाठी उपयोग होईल. दशमातील शनी प्रतिमा चकचकीत ठेवणार आहे. शुक्र अष्टमांत येत असल्याने प्रपंच आणि आरोग्य यांच्या छोटय़ा तक्रारींनी उग्र रूप धारण करू नये यासाठी सावध राहा. अवघड प्रकरण मार्गी लावता येणार नाही. प्रबल यशासाठी काही काळ थांबावे लागणार आहे. प्रवास कराल.
दिनांक : २६, २७, ३१, १ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्नाने निराशा टाळता येईल. नवीन क्षेत्रात प्रवेश करू शकाल.

यशस्वी वेळापत्रक
बुध-शुक्र-गुरू यांची राश्यांतरे नवीन योजनांची रूपरेखा ठरवून वेळापत्रकात अचूक विषय-वेळ यांचा समावेश करता येईल आणि शनिवापर्यंत आपणास नेत्रदीपक यशही मिळवता येईल. त्याचा प्रारंभ रविवारच्या शुक्र राश्यांतरापासून होणार आहे. त्यात प्राप्ती-प्रपंच-शेती सामाजिक चळवळी यांचा समावेश राहील. षष्ठातील मंगळ शत्रूंना पुढे सरकू देणार नाही. शुक्र-हर्षल केंद्रयोग होत असल्याने प्रलोभनं टाळाच. प्रवास कराल.
दिनांक : २६ ते ३० प्रगतीचा काळ.
महिलांना : निर्धाराने पुढे चला; यशस्वी व्हाल. नाहक चिंता करू नका.

समस्या वाढतील
मकर व्यक्तींना सबुरी आणि श्रद्धा याच मंत्रावर आधारित उपक्रम ठरवावे लागणार आहेत. अष्टमात शनी आणि शुक्र-बुधाची राश्यांतरे समस्यांना आक्रमक करतात. त्यातून प्रगती कोंडीत सापडते. सतर्क राहा, पुढे चला. राशीस्थानचा राहू आणि गुरूचे सहकार्य यांचा संरक्षणासाठी उपयोग होईल. त्यातून व्यापार-राजकारण-प्राप्ती यामधील प्रतिष्ठा मजबूत करता येईल. अपरिचित क्षेत्रात साहस करू नका. रागरंग पाहून केलेली कृतीच यशस्वी ठरेल. धर्मकार्यातून आनंद मिळेल.
दिनांक : २७ ते ३१ शुभ काळ.
महिलांना : यशस्वी समीकरणासाठी शिकस्तीने सामना करावा लागणार आहे.

यशासाठी थांबा
व्ययस्थानच्या राहूचे परिणाम गुरू बदलातून तीव्र होतील. चौथा मंगळ त्रास देत आहेच. कुंभ व्यक्तींनी विचाराने निर्णय घेऊन हुशारीने कृती केली तर बुध-शुक्रातील बदल शनीची अनुकूलता इभ्रत सांभाळणारी सफलता देतील. प्रवास होतील. नवीन परिचय होतील. भागीदारीतले प्रश्न सोडवता येतील. अचानक येणारा पैसा दडपण दूर करणारा ठरेल. परंतु एवढय़ावर अवघड प्रकरण मार्गी लावता येणार नाही. प्रबल यशासाठी काही काळ थांबावे लागणार आहे.
दिनांक : २८ ते ३१ शुभ काळ.
महिलांना : रागरंग पाहून केलेली कृतीच यशस्वी ठरेल.

संभ्रमात सतर्क राहा
पराक्रमी मंगळ, चतुर्थात प्रवेश करीत असलेला शुक्र, गुरुवारी परत लाभांत येत असलेला गुरू आणि राहूचं सहकार्य यामधून मीन व्यक्तींना संधी साधून अनेक विभागांत प्रभाव निर्माण करता येईल. कला-शिक्षण-विज्ञान साहित्य-व्यापार यांचा त्यात समावेश राहील. गुरुवारी षष्ठात सुरू होणाऱ्या बुध-शनी सहयोगामुळे संशय आणि संभ्रमात निर्णय कृती सापडण्याचा संभव असल्याने सतर्क राहूनच सफलता सांभाळावी लागणार आहे.
दिनांक : २६, २७, ३१, १ हा काळ शुभ आहे.
महिलांना : साहसापेक्षा संयमच सफलता देऊ शकेल.