Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

व्यापार - उद्योग

लाइटस्पीड व्हेन्चर पार्टनर्सची ‘इट्झ कॅश कार्ड’ मध्ये ५० कोटींची गुंतवणूक
व्यापार प्रतिनिधी: व्हेंचर कॅपिटल आणि ग्रोथ इक्विटी क्षेत्रातील जागतिक स्तरावर अग्रगण्य अशा लाइटस्पीड व्हेंचर पार्टनर्स कंपनीने भारतातील सर्वात मोठय़ा, बहुउपयोगी प्रीपेड कार्ड कंपनी असलेल्या इट्झ कॅश कार्ड लिमिटेडमध्ये ५०० दशलक्ष रुपयांची गुंतवणूक केली आहे. मॅट्रिक्स पार्टनर्स इंडिया आणि इन्टेल कॅपिटल या सध्याच्या दोन गुंतवणूकदारांसोबत ही गुंतवणूक केली आहे. इट्झ कॅश कार्ड कंपनी या गुंतवणुकीचा उपयोग प्रश्नॅडक्ट पोर्टफोलिओचा विस्तार तसेच व्यवसायवृद्धीसाठी करणार आहे. यात रिटेल पेमेंट क्षेत्रात प्रवेश करण्याचा समावेश आहे.या गुंतवणुकीनंतर लाइटस्पीड अ‍ॅडव्हायझरी सव्‍‌र्हिसेस इंडिया प्रश्नयव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बेजुल सोमैया यांचा इट्झ कॅश कार्डच्या संचालक मंडळात समावेश होणार आहे. या गुंतवणुकीचा उपयोग करून इट्झ कॅश कार्ड कंपनी सध्याच्या व्यवसायाची वृद्धी करून नवीन उत्पादने तसेच नवीन मार्केट क्षेत्रात प्रवेश करणार आहे.याप्रसंगी बोलताना इट्झ कॅश कार्ड लिमिटेडचे अध्यक्ष अशोक गोयल म्हणाले, ‘‘लाइटस्पीड व्हेन्चर पार्टनर्सच्या गुंतवणुकीमुळे इट्झ कॅशच्या मजबूत बिझनेस मॉडेल तसेच कंपनीच्या विकासाला बळकटी मिळणार आहे. गेल्या दोन वर्षात आमच्या कंपनीत अशा प्रकारची गुंतवणूक दुसऱ्यांदा केली जात आहे. या पूर्वी मॅट्रिक्स पार्टनर्स आणि इन्टेल कॅपिटलने १० मिलियन यूएस डॉलरची गुंतवणूक केली होती. या फेरीत पहिले दोन्ही गुंतवणूकदार सहभागी होत आहेत. रोख रकमेला पर्याय म्हणून इट्झ प्रीपेड कार्ड, व्यक्ती तसेच उद्योगांना समाधान, इंटरनेट आणि मोबाइलद्वारे सोपे, सुरक्षित आणि कार्यक्षम पर्याय उपलब्ध करून देते. देशात बँक व्यवहाराशी जुळलेल्या अथवा न जुळलेल्या नागरिकांना इट्झ कॅश प्रीपेड कार्ड हे आर्थिकदृष्टय़ा सक्षम करते.

पुणेस्थित ‘ट्रान्सपरन्ट’चा सिमेन्सबरोबर सामंजस्य करार
व्यापार प्रतिनिधी: पुणेस्थित ट्रान्सपरन्ट एनर्जी सिस्टीम सिमेन्स व्हेनाचार कॅपिटलबरोबर आर्थिक सामंजस्याचा करार केला आहे. कराराचे मूल्य अघोषित आहे. ट्रान्सपरन्ट कंपनी मूळ स्रोतचे जतन व टाकाऊ पदार्थातून उष्णता मिळविण्याचे विविध उपाय यामध्ये कार्यरत आहे. पत्रकारांना माहिती देताना असे सांगितले, की या भरघोस आर्थिक मदतीमुळे ट्रान्सपरण्टच्या उलाढालीत खूपच वाढ होईल त्यामध्ये मूळ स्रोताचे जननीकरण तर नमूद आहेच त्याशिवाय टाकाऊ पदार्थापासून उष्णता मिळविण्याचे तसे उसर्जरित पाण्यावर प्रक्रिया करण्याचे विविध उपाययोजना ज्या गरजेनुसार योजलेल्या असतील यामध्येसुद्धा अमूल्य अशी भरघोस वाढ होणार आहे. अशा प्रकल्पाचे आराखडे व योजना या भारताबरोबरच परदेशातही कार्यान्वित होईल.सिमेन्स व्हेनाचार कॅपिटलचे गुंतवणूक अधिकारी राजेश वकील म्हणाले, आम्ही ट्रान्सपरण्टबरोबर हा करार केला आहे कारण ट्रान्सपरण्ट एक अशी कंपनी आहे, की त्यांनी नैसर्गिक मूलस्रोताचे महत्त्व योग्य रीतीने जाणले आहे. त्याशिवाय त्याची स्वत:ची अशी पेटेण्ड टेक्नॉलॉजी आहे. ट्रान्सपरण्टने ऊर्जा व पाण्यावरील प्रक्रियेत उल्लेखनीय असे काम केले आहे. त्यात आवश्यकतेनुसार व अनेक उदगोगाच्या परिमाणानुसार प्रणाली वापरता येऊ शकेल, असे तंत्रज्ञ आहे. त्यामध्ये सीमेंट, पोलाद, काच यासारखे अनेक उद्योग आहेत. या सर्व तंत्रज्ञानातील आघाडीच्या मूल्यामुळे आज ट्रान्सपरण्ट ही जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान पुरविणारी एक कंपनी ठरलेली आहे.ट्रान्सपरण्टचे पदसिद्ध अध्यक्ष अशोक अत्रे म्हणाले, की सिमेन्सच्या बरोबरील सामंजस्याचा करार आमच्या कंपनीस मौलिक टॉनिक ठरणार आहे. त्यांचा ऊर्जा क्षेत्रातील कारभार व अनुभव व त्याशिवाय त्यांचे उद्योग जगतातील अस्तित्व यामुळे ट्रान्सपरण्टचा उज्ज्वल भविष्यकाळ आहे. ट्रान्सपरण्टचे नाव या बाबतीतील तंत्रज्ञान भारतातीलच नव्हे तर जगात आघाडीवर राहील, अशी आशा बाळगा, अशी खात्री अत्रे यांनी दिली.

रेलिगेअर एमएफचा ‘रेलिगेअर बिझिनेस लीडर्स फंड’
व्यापार प्रतिनिधी : रेलिगेअर एमएफने ‘रेलिगेअर बिझिनेस लीडर्स फंड’ (ओपन एन्डेड इक्विटी योजना)च्या अधिकृत शुभारंभाची घोषणा केली. ज्या कंपन्या आपापल्या उद्योगामध्ये आणि त्या उद्योग विभागात आघाडीवर आहेत, असे रेलिगेअर एएमसीला वाटते, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून भांडवलवृद्धी गाठण्याचे या फंडाचे उद्दिष्ट आहे. या कंपन्या त्यांच्या क्षेत्रात कोणत्याही आर्थिक परिस्थितीत वृद्धी, मार्जीन आणि नफा या गोष्टी साध्य करत इतर कंपन्यांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे. सर्वसाधारणपणे ज्या कंपन्या त्यांच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत त्या खालील गोष्टींपैकी एक किंवा अधिक बाबतीत सर्वोत्तम कामगिरी करतात :
१. चांगली किंमत क्षमता, २. उत्तम ढांचा/ कार्यक्षमता, ३. आकर्षक सातत्यपूर्ण स्पर्धात्मक फायदे, ४. भांडवलाची चांगली उपलब्धता. या गुणांमुळे मग कंपनीला त्या क्षेत्रातील सरासरीपेक्षा बाजारपेठेतील आपला वाटा, मार्जिन आणि वृद्धीदर या आघाडय़ांच्या माध्यमातून सर्वोत्तम ३ किंवा ५ कंपन्यांमध्ये स्थान पटकावणे शक्य होते. फंडामध्ये ग्रोथ आणि डिव्हिडंड हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. यातील प्रत्येक युनिट हा १० रुपयांना उपलब्ध असेल आणि त्यावर अतिरिक्त भार लागेल. एसआयपीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर कोणताही प्रवेश भार लागणार नाही. एकत्रितपणे खरेदी केल्यास किमान अर्ज रक्कम ही ५,००० रुपये असणे आवश्यक असून त्यानंतर ती १ रुपयाच्या पटीत असू शकते. एसआयपी गुंतवणुकीसाठी किमान अर्ज रक्कम ही १,००० रुपये असणे आणि त्यानंतर ती दर महिन्याला १ रुपयाच्या पटीत असणे आवश्यक आहे.

सोलापूरच्या समर्थ बँकेला एक कोटीचा निव्वळ नफा
सोलापूर, २९ जुलै/प्रतिनिधी
येथील समर्थ सहकारी बँकेच्या ठेवीत गतवर्षीपेक्षा १० कोटींनी वाढ झाली असून, बँकेला १ कोटी १ लाखाचा नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.आयएसएओ-९००१: २००० प्रमाणित असलेल्या समर्थ बँकेने अल्पावधीतच ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केल्यामुळे बँकेच्या ठेवी १३० कोटींच्या झाल्या असून ८२ कोटींचे कर्जवाटप झाले आहे. बँकेने ५८.१२ कोटींची गुंतवणूक केली असून खेळते भांडवल १३९.७५ कोटी इतके झाले आहे. बँकेला १ कोटी १ लाख ९७ हजारांचा निव्वळ नफा झाला असून बँकेच्या स्थापनेपासूनच बँकेने ‘अ’ वर्ग कायम ठेवला आहे. बँकेचे एनपीए ७.०५ टक्के इतके असल्याची माहितीही श्री. अत्रे यांनी दिली.
पुण्यात शाखा व एटीएम
बँकेच्या पुणे येथील भांडारकर रोड शाखेचा व एटीएम नॅशनल कनेक्टिव्हिटीचा शुभारंभ येत्या १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रश्नज इंडस्ट्रीज प्रश्न. लि. पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय अधिकारी शशांक इनामदार आणि बँक ऑफ इंडियाचे निवृत्त उपसरव्यवस्थापक व्ही. बाबू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बँकेचे सोलापूर शहरात दोन आणि आता पुण्यात एक याप्रमाणे तीन एटीएम सेंटर कार्यरत आहेत.

‘एलआयसी’चे हिंजवडीत ग्राहक सेवा केंद्र
पुणे, २९ जुलै/ प्रतिनिधी
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या हिंजवडी येथील ‘कस्टमर केअर कम ऑनलाईन प्रीमियम कलेक्शन’ सेंटरचे उद्घाटन शाखा व्यवस्थापिका सीमा जोशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. िहजवडी परिसरातील विमाधारकांच्या सोयीसाठी या केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. विमा प्रतिनिधी यू. पी. मेघाणी यांच्यामार्फत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून ‘एलआयसी’ विमाधारकाला आपला विम्याचा हप्ता भरता येणार असून, अधिकृत पावतीदेखील मिळेल. त्याचबरोबर विमाधारकाला विमाविषयक माहिती व सल्ला मोफत देण्यात येईल. हिंजवडी येथील आयटी पार्कमधील फेज वन मध्ये इन्फोसिस कंपनीसमोर हॉटेल तमन्ना एक्झिक्युटिव्ह येथे या केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी विमा अधिकारी शैलजा बोरकर, शाखाधिकारी जोसेफ अँटनी उपस्थित होते.

राजर्षी शाहू बँकेच्या संचालकांची निवडणूक बिनविरोध
पुणे, २९ जुलै/ प्रतिनिधी
राजर्षी शाहू सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक संचालकांचे व विद्यमान संचालकांचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सर्वसाधारण गटातील दहा जागांसाठी प्र. दि. ऊर्फ आबासाहेब शिंदे, सुधाकर पन्हाळे, संभाजीराव पाटील, शिवाजी वाडकर, शांताराम धनकवडे, बाळासाहेब जगताप, पद्माकर पवार, सुरेश खैरे, दिलीप शिंदे व अभय मोहिते. महिला मतदारसंघात कमल व्यवहारे व मंगला जाधव, इतर मागास वर्गातून सचिन पन्हाळे, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांमधून राजाबाई जेधे, अनुसूचित जाती-जमातीतून कुसुम अडसुळे, तर विमुक्त जाती व भटक्या जमातीमधून शशिकांत नाईक अशा १६ संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये ६ संचालक नवीन असून १० जुन्या संचालक मंडळातील आहेत.

एलोफिक इंडस्ट्रिजची ऑईल उत्पादने बाजारात
पुणे, २९ जुलै/ प्रतिनिधी
एलोफिक इंडस्ट्रिज लि. या ऑईल, एअर व फ्युएल फिल्डर निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपनीने दर्जेदार ऑईल उत्पादने बाजारात आणली आहेत. यामध्ये नेक्स्ट जेन १५ डब्ल्यू ४०, मॅराथॉन ४ एक्स, एसएई-४०, ४ एक्स व्हिक्ट्रा, २० डब्ल्यू ५० आणि माही ४ एक्स, २० डब्ल्यू ४० या उत्पादनांचा समावेश आहे. एका खास कार्यक्रमात ही उत्पादने सादर करण्यात आली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक के. डी. सहानी, उपाध्यक्ष पवन शर्मा, पुणे विभागाचे व्यवस्थापक उदय फडणीस, श्री मोघे आदी मान्यवर उपस्थित होते. कंपनीने १९९५ पासून आयएसओ-९००१ हे दर्जा प्रमाणपत्र प्रश्नप्त केले आहे. असे कंपनीच्या पत्रकात म्हटले आहे.

साईबाबा संस्थानमध्ये सर्वात मोठी सौर ऊर्जाप्रणाली
पुणे, २९ जुलै/ प्रतिनिधी

‘गढीया सोलर एनर्जी सिस्टिम्स या कंपनीने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टसाठी जगातील सर्वात मोठी सोलर पॅराबोलिक कॉन्संट्रेटेड टेक्नॉलॉजी सिस्टिम उत्पादित आणि कार्यान्वित करून दिली आहे. साईबाबा संस्थानमध्ये नव्याने अद्ययावत केलेल्या या प्रणालीमुळे दिवसाला ५० हजार भाविकांसाठी भोजन तयार होऊ शकते. कंपनीला ही प्रणाली स्थापित व कार्यान्वित करण्यासाठी ७ महिने लागले. या प्रणालीचे आयुष्य २५ वर्षे आहे, ही माहिती ‘गढीया सोलर’चे व्यवस्थापकीय संचालक बादल शहा यांनी दिली. जगातील सर्वात मोठय़ा या सौर स्वयंपाक प्रणालीचे उद्घाटन केंद्रीय नूतन व पुनर्वापरक्षम ऊर्जामंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या हस्ते उद्या (गुरुवार) शिर्डीत होणार आहे.