Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९


झळाळी शिवाजी संग्रहालयाची.. गेले दोन महिने नूतनीकरणासाठी बंद असलेले सातारा येथील शिवाजी संग्रहालय नागरिकांसाठी पुन्हा खुले झाले आहे. सुमारे दोन हजार शिवकालीन ऐतिहासिक वस्तुंचा खजिना असलेले हे संग्रहालय शहराचे मानाचे पान समजले जाते. या खजिन्यात शिवाजी महाराजांचा हाताचा ठसा, पेंटींग्ज, मोहरा, नाणी,शस्त्रे आदी वस्तूंचा समावेश आहे. (फोटो-राहुल देशपांडे, सातारा.)

मागास विद्यार्थ्यांकडून सक्तीने शुल्क घेणाऱ्या
महाविद्यालयाविरुद्ध फौजदारी कारवाई
जयप्रकाश अभंगे , सोलापूर, २९ जुलै
मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क सक्तीने भरून घेणाऱ्या महाविद्यालयाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आश्वासन शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे सचिव किशोर गजभिये यांनी दिले. मुंबईत मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात माकपचे आमदार नरसय्या आडम मास्तर, महाराष्ट्र विशेष मागासवर्ग कृती समितीचे अध्यक्ष उमाकांत अमृतवार (मुंबई), उपाध्यक्ष अशोक इंदापुरे (सोलापूर) यांनी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून सक्तीने शैक्षणिक शुल्क भरून घेत असल्याबाबतची तक्रार सचिव गजभिये यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत केली.

साखर साठेबाजांवर कठोर कारवाईची मंडलिक यांची मागणी
कोल्हापूर, २९ जुलै / विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हय़ामध्ये नुकत्याच बेकायदेशीर साखरसाठय़ावर टाकण्यात आलेल्या धाडीसंदर्भात खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी संसदेत सभागृहाचे लक्ष वेधले आहे. साखरेचा काळा बाजार करणाऱ्या साठेबाजांवर आणि या प्रकरणामध्ये गुंतलेल्या सर्वच दोषींवर कठोर कारवाईची त्यांनी मागणी केली आहे. गेल्या आठवडय़ात कोल्हापूर जिल्हय़ामध्ये स्थानिक पुरवठा अधिकाऱ्यांनी टाकलेल्या बेकायदेशीर साखरसाठय़ावरील धाडसत्रामुळे शुगर लॉबीमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

गंगुबाई हनगळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किराणा संगीत यात्रेचे आयोजन
मिरज, २९ जुलै / वार्ताहर

पद्मभूषण डॉ. श्रीमती गंगुबाई हनगळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किराणा संगीत यात्रा काढण्यात येणार असून, या यात्रेत डॉ. गंगुबाई हनगळ यांच्या अस्थिकलशाचे दर्शन संगीतरसिकांना मिळणार आहे. संगीतरत्न अब्दुल करीम खाँसाहेब यांचे शिष्य व डॉ. गंगुबाई हनगळ यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या कुंदगोळ (जि. धारवाड, कर्नाटक) येथून दि. ४ ऑगस्टपासून या किराणा संगीत यात्रेचा प्रश्नरंभ होणार आहे.

मिरजमध्ये पंचायत समिती सदस्यांमध्ये सभापतींसमोर रणकंदन
मिरज, २९ जुलै / वार्ताहर

जवाहर विहिरींच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या मिरज पंचायत समिती सदस्यांचा आवास योजनेवर हात मारण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने मिरजेत सभापतींच्या कक्षातच दोन सदस्यांत रणकंदन माजले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सदस्य एकमेकाच्या अंगावर धावून गेल्याने डल्ला मारण्याचा प्रयत्न आम जनतेसमोर उघडा पडला. शिक्षक बदली, बी- बियाणांचे वाटप, बांधकाम विभागातील हस्तक्षेप व शेती अवजारांचे वाटप यामुळे बदनाम झालेला मिरज तालुका पंचायत समितीचा कारभार आता हातघाईवर आल्याने ‘हेचि फळ काय मम तपाला’ असा प्रश्न सर्वसामान्य जनतेपुढे पडला आहे.

‘विठ्ठल’ कारखान्याच्या १९ संचालकांविरूद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली
पंढरपूर, २९ जुलै/वार्ताहर

पंढरपूर (गुरसाळे) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या १९ संचालकांच्या विरोधात पुणे येथील प्रश्नदेशिक सहसंचालक (साखर) यांनी ७३ फ-फ खाली काढलेली नोटीस मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. बी. म्हसे, न्यायमूर्ती आर. एम. सावंत यांच्या खंडपीठाने रद्द ठरवली आहे.

कोल्हापूरमध्येही ‘स्वाइन फ्लू’ ची संशयित रुग्ण महिला
कोल्हापूर, २९ जुलै / विशेष प्रतिनिधी

मुंबई पुण्यापाठोपाठ आता स्वाईन फ्लूच्या भीतीने निमशहरांनाही घेरण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापुरात अमेरिकेहून आलेल्या एका तरुणीने बुधवारी सकाळी आपल्या लक्षणांवरून येथील महापालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयाशी संपर्क साधला. तिच्या तपासणीमध्ये स्वाईन फ्लूचा संशय व्यक्त करण्यात आला असून पुढील तपासणीसाठी तिच्या रक्ताचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर देशमुख यांनी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिली.

शिफारस न केलेली खते माथी मारल्याचा ‘जनसुराज्य’चा आरोप
‘आरसीएफ’च्या कारभाराची गुप्तचर विभागाद्वारे चौकशीची मागणी
कोल्हापूर, २९ जुलै / विशेष प्रतिनिधी
भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम असलेल्या राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर या कंपनीच्या कोल्हापूर विभागात अधिकाऱ्यांनी नियमित खतांच्या खरेदीबरोबर कृषी विद्यापीठाने शिफारस न केलेली खते माथी मारण्याचा मनमानी उद्योग सुरू केला आहे. या उद्योगामुळे तालुका खरेदी विक्री संघ, खतांचे वितरक आणि पर्यायाने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत असल्याने या प्रकरणाची राज्य गुप्तचर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केली.

तेलगीची आज सोलापूरमध्ये सुनावणी
फसवणुकीचा खटला
सोलापूर, २९ जुलै/प्रतिनिधी
मुद्रांक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगी यास एका खटल्याच्या निमित्ताने बुधवारी सकाळी बंगळुरू येथून सोलापूर येथे कडेकोट बंदोबस्तात आणण्यात आले. त्याला सोलापूर जिल्हाकारागृहात ठेवण्यात आले आहे. उद्या (गुरुवारी) त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.सोलापुरातील शुक्रवार पेठेत राहणाऱ्या महमद अझर फाजल याच्यासह चार तरुणांना सौदी अरब येथे नोकरी लावतो, पासपोर्ट आणि व्हिसा काढून देतो असे सांगून १९९२ मध्ये २८ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्यावरून अब्दुल करीम तेलगी याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हय़ात स्थानिक न्यायालयात हजर राहण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गेल्या ७-८ महिन्यांपासून बंगळुरू येथील उच्च न्यायालयाशी पत्रव्यवहाराद्वारे संपर्क साधून पाठपुरावा केला. त्याच्या बंदोबस्तासाठी बंगळुरू येथील एक पोलीस निरीक्षक व एक पोलीस उपनिरीक्षक, १०० पोलीस तर सोलापूरचे एक पोलीस निरीक्षक दोन पोलीस उपनिरीक्षक आणि सहा कमांडो होते. या शिवाय कारागृहातही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या दि. ३० रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) यांच्या न्यायालयात त्याला उभे करण्यात येणार आहे. या खटल्याकरिता तेलगीच्या वतीने पुण्यातून वकील येणार असल्याचे समजते.

साताऱ्यात खरिपाच्या पेरण्या पूर्णत्वाकडे
सातारा, २९ जुलै/प्रतिनिधी

जिल्ह्य़ाच्या पश्चिम भागातील भातरोपांची लागण जोरात सुरू असून खरिपाच्या पेरण्या जवळपास पूर्णत्वाला गेल्या आहेत. आतापर्यंत ९९.१२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. ऊस लागणीचे क्षेत्र वगळून पेरण्यांची टक्केवारी ९४.५५ टक्के एवढी आहे. तूर पेरणी ५९ टक्केच झाली आहे.तालुकानिहाय ऊस वगळून झालेली पेरणी कंसात एकूण पेरणी व त्यानंतर टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. जावली १६,५४८ (१७,३८८) ७३.६, सातारा ४६,२२५ (५४,१४५) १०१.०२, पाटण ५८,८३५ (६४,९३५) १०३.५६, कराड ४१,९५० (५७,१३४) १००.०६, कोरेगाव ३१,०२० (३९०००), ९६.५३, ४२,३७३ (४३,२४४) ८४.१३, माण २६,१४८ (२६४९३) १०२.६९, फलटण ८८७९ (१८,४८९) १६२.१८, खंडाळा १७,२३६ (१८.०२५) ९९.०४, वाई १६,५६२ (२०८५४) ९७, महाबळेश्वर ३९७५ (१०००) ३९७.५० जुलै महिन्या अखेपर्यंत जिल्ह्य़ाची पावसाची सरासरी ४८९.२ एवढी आहे. प्रत्यक्षात सरासरी पाऊस ६४३.९ मि.मी. एवढा झाला आहे. सरासरीपेक्षा १५५ तर एकूण पाऊस १७०१ मिलिमीटर अधिक झाला आहे.

नऊ ऑगस्टला ‘सरकार चलेजाव’ आंदोलन
सातारा, खटाव, कराड (उत्तर) येथून भाजप लढण्यास सिद्ध - नलावडे
सातारा, २९ जुलै/प्रतिनिधी

येत्या ९ ऑगस्टला संपूर्ण राज्यभर ‘आघाडी शासन चलेजाव’ आंदोलन छेडण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्ष जिल्हय़ातील विधानसभेच्या सातारा, खटाव (माण) व कराड (उत्तर) या तीन जागा लढण्यासाठी सिद्ध आहे. उर्वरित पाच जागा शिवसेना घटकपक्षाला सोडण्यात आल्या असल्या तरी युती म्हणून हातात हात घालून यश खेचून आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा व जिल्हय़ाच्या संपर्कप्रमुख माजी आमदार कांताताई नलावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, ज्येष्ठ नेते डॉ. गजाभाऊ कुलकर्णी, प्रदेश प्रतिनिधी नरेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस अविनाश फरांदे, नितीन देशपांडे, सातारा शहराध्यक्ष किशोर गोडबोले या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या २५ ऑगस्टच्या दरम्यान लागू होणार आहे. पक्षाच्या वतीने येत्या पंधरा दिवसांत उमेदवारीबाबतचे निर्णय घ्यायचे आहेत. भाजपच्या वाटय़ाला राज्यात ११७, तर शिवसेनेच्या वाटय़ाला १७१ जागांचे यापूर्वीचेच सूत्र निश्चित झाले आहे. मतदारसंघाच्या फेररचनेनुसार काही ठिकाणी जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. खटाव (माण) विधानसभा जागेसाठी विद्यमान आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचे नाव निश्चित आहे. सातारा विधानसभेसाठी नरेंद्र पाटील व रवि परामणे, तर कराड (उत्तर)साठी गणेश देशमुख व नीतेश देशपांडे इच्छुक आहेत. जिल्हय़ातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली. १ ते ८ ऑगस्ट दरम्यान बूथ प्रमुखांचे आंदोलन घेण्यात येणार असल्याचेही नलावडे यांनी सांगितले.

दलित मित्र पुरस्कारासाठी आप्पासाहेब जाधव यांची निवड
सोलापूर, २९ जुलै/प्रतिनिधी

औरंगाबाद येथील मातंग समाज सद्भावना मित्र मंडळाच्यावतीने यंदाच्या वर्षीच्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित मित्र पुरस्कारासाठी निवृत्त शिक्षक आप्पासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली आहे. मूळचे मोहोळ तालुक्यातील यावली येथील रहिवासी असलेले श्री. जाधव हे वडगाव शेरी (पुणे) येथून नुकतेच शिक्षकी पेशातून निवृत्त झाले आहेत. येत्या २ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील एका समारंभात श्री. जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कोल्हापूरमध्ये वर्दळीच्या रस्त्यावर दोन तरुणांचा अपघाती मृत्यू
कोल्हापूर, २९ जुलै / प्रतिनिधी

ताराराणी चौक ते तावडे हॉटेल या दरम्यानच्या रस्त्याचे रस्ते विकास महामंडळाकडून गेल्या तीन महिन्यांपासून काम सुरू आहे. प्रचंड वर्दळीचा हा रस्ता सध्या एकाच बाजूने दुतर्फा वाहतुकीसाठी सुरू असल्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे. या रस्त्यावर आज सकाळी नऊ वाजता आणि सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन अपघात होऊन दोन तरुण केएमटीची बस आणि मालवाहू ट्रकच्या चाकाखाली चिरडून ठार झाले. या अपघातप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यामध्ये वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज सकाळी मुक्त सैनिक वसाहतीनजीक उद्यानाजवळ कागलकडे निघालेल्या केएमटी बसखाली सापडून फिरोजखान चाँदसो कवठेकर (वय २५) हा मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. फिरोजखान कवठेकर याचा आजच वाढदिवस होता. सायंकाळी त्याच्या घरामध्ये वाढदिवस साजरा केला जाणार होता. त्यासाठी खरेदी करण्याकरता तो बाहेर पडला होता.करवीर तालुक्यातील इस्पूर्ली या गावचा विनायक दिलीप वाघमारे (वय १९) हा युवक कोल्हापुरातच नोकरी करतो. आज तो आपल्या सायकलवरून रुईकर कॉलनीकडे जात असताना हॉटेल लिशासमोर एम.पी.०९ एच.एफ ६१४२ या बाराचाकी ट्रकने त्याला ठोकरले. तो चाकाखाली सापडल्याने जागीच मरण पावला. एकाच मार्गावर आज दोन अपघात झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

उद्योजक संग्रामसिंह पाटील यांना समाजभूषण पुरस्कार
इस्लामपूर, २९ जुलै / वार्ताहर

इस्लामपूर शहरातील इंद्रप्रस्थ कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष व उद्योजक संग्रामसिंह दिलीप पाटील यांना कोल्हापूर येथील वुमेन्स डेव्हलपमेंट एज्युकेशन अँड पब्लिक वेल्फेअर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने यंदाचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. नाटय़-चित्रपट व दूरदर्शन मालिकांतील सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या हस्ते प्रसिद्ध कागद व्यापारी रामवल्लभ बियाणी यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योगपती काकासाहेब चितळे व चित्रपट निर्माते अभिराम भडकमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली येथे संग्रामसिंह पाटील यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. संग्रामसिंह पाटील यांनी इंद्रप्रस्थच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करतानाच केवळ देखावा न उभारता यानिमित्त रक्तदान शिबिर, सर्वरोगनिदान शिबिर, गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप व महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर अशी समाजोपयोगी शिबिरांचे आयोजन केलेले आहे.

शिवामृत दूध संघाचा म्हशीच्या दुधास राज्यात सर्वाधिक भाव
माळशिरस, २९ जुलै/वार्ताहर

प्रथिनयुक्त म्हशीच्या दुधाची शहरी लोकांची वाढती मागणी लक्षात घेऊन शिवामृत दूध संघाने म्हशीच्या दुधाला राज्यात सर्वाधिक असा प्रतिलीटर १८ रुपयांचा दर जाहीर केला आहे. संघाचे संचालक धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही माहिती दिली.विजयनगर विझोरी येथे संघाच्या सभागृहात झालेल्या ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय आवताडे होते. या वेळी एकूण ९ ठराव एकमताने मंजूर झाले. संघाचे माजी उपाध्यक्ष दत्तात्रय भिलारे यांनी प्रश्नस्ताविकात अहवालवाचन करून संघास अहवाल सालात २ कोटी ७१ लाखांचा फायदा झाल्याचे सांगितले. या वेळी संघास सर्वात जास्त दूध पुरविणारे उत्पादक सुवर्णा व अनिल भोसले यांना प्रथम क्रमांकाचे ५० हजार श्रीमती शांताबाई पोळ व त्यांचा नातू प्रल्हाद खंदारे यांना द्वितिय क्रमांकाचे ४० हजार व सुनीता व पोपट माने यांना तृतीय क्रमांकाचे ३० हजारांचे बक्षीस देण्यात आले. मांडवे येथील महालक्ष्मी दूधसंस्थेस जनरल चॅम्पियन संस्थेचा मान व १ लाखाचे बक्षीस मिळाले.

सत्र परीक्षा पुढच्या वर्षीपासून सुरू करण्याची मागणी
माळशिरस, २९ जुलै/वार्ताहर

गेल्या पंधरा दिवसांपासूनच्या प्रश्नध्यापकांच्या आंदोलनामुळे अद्याप विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमही सुरू झालेले नाहीत. तोवर पहिल्या सत्राची परीक्षा येत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सोलापूर विद्यापीठाने सत्र परीक्षा पुढील वर्षापासून सुरू कराव्यात, अशी मागणी सोलापूर जिल्हा विजयप्रताप युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे.अकलूज येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी सोलापूर विद्यापीठाने सत्र परीक्षा पद्धतीचा विचार केला आहे. त्यानुसार जास्तीत जास्त ऑक्टोबर महिन्यात प्रथम सत्र परीक्षा अपेक्षित आहे. १४ जुलैपासून प्रश्नध्यापकांचे आंदोलन सुरू असल्याने ठरलेल्या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण होणे व विद्यार्थ्यांना त्याचे आकलन होणे अशक्य आहे. अद्याप प्रश्नध्यापक रुजू न झाल्याने प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कामही रखडले असल्याचे सांगण्यात आले. राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती एस. सी. जमीर यांच्या सूचनेनुसार विद्यापीठांनी सत्र परीक्षा पद्धती स्वीकारण्याचा निर्णय घेतला असला तरी या वर्षापासून त्याचा अंमल केल्यास विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे अनेक विद्यापीठांनी या वर्षी ही परीक्षा पद्धती स्वीकारलेली नाही.

कलाशिक्षकांच्या भरतीबाबत आदेशाच्या पुनर्विचाराची मागणी
सोलापूर, २९ जुलै/प्रतिनिधी
पहिली ते सातवी प्रश्नथमिक शाळांमध्ये कलाशिक्षकांच्या भरतीच्या संदर्भात शासनाने बेकायदेशीर काढलेल्या आदेशाबाबत पुनर्विचार करून कलाशिक्षकांच्या भरतीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कला विकास शिक्षक संघाच्या सोलापूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी कला संचालक प्रश्न. हेमंत नागदिवे यांची भेट घेऊन केली. कला विकास शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे जाऊन शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट न झाल्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवांची भेट घेऊन त्यांना कलाशिक्षकांच्या भरतीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी काढलेल्या बेकायदेशीर आदेशाबाबत त्वरित पुनर्विचार करण्याची मागणी केली. या संदर्भात महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे शिक्षण संचालक यांच्याकडून अभिप्रश्नय मागवून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात संघाचे अध्यक्ष संदीप जाधव, कार्याध्यक्ष इब्राहिम तडकळ, उपाध्यक्ष सचिन सालगुडे, सचिव बाळासाहेब लांबतुरे, राहुल माने, प्रश्न. डांगे, ज्योती विभुते, प्रतिज्ञा माने, आदी सहभागी झाले होते.

भारिप-बहुजन महासंघाचे सांगलीत लाक्षणिक धरणे
सांगली, २९ जुलै / प्रतिनिधी
वाढती महागाई कमी करून सर्व प्रकारच्या डाळी व कडधान्य स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून नागरिकांना द्यावेत, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य स्वस्त धान्य दुकानात मिळावेत, शिधापत्रिका नवीन करण्याबाबत तसेच शिधापत्रिकेवरील नव्या नोंदी निश्चित करण्यासाठी कालावधी ठरवून द्यावा. यासंदर्भात कार्डधारकांना टोकन द्यावे, टोकनवरील तारखेनुसार शिधापत्रिका देणे बंधनकारक असावे, फोड शिधापत्रिका निश्चित तारखेनुसार देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष परशराम कुदळे, सरचिटणीस चंद्रकांत शिंदे, प्रवीण कांबळे, नंदकुमार बनसोडे, दयानंद माने, अ‍ॅड. सुदर्शन कांबळे, आदी सहभागी झाले होते.

सोलापूरच्या शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन
सोलापूर, २९ जुलै/प्रतिनिधी
शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मुंबई येथील त्यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांचे सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे व पदाधिकाऱ्यांनी अभीष्टचिंतन केले. श्री. बरडे यांनी त्यांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार शिवशरण पाटील, प्रकाश वानकर यांच्यासह उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, शाहू शिंदे, सुनील शेळके, महेश धाराशिवकर, सदानंद येलुरे, गणेश नरोडे, अभिजित राजपूत, राजू मुदलियार आदी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी एकजुटीने आणि निष्ठेने काम करून विधानसभे3वर भगवा झेंडा फडकवावा, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.

महापालिका कर्मचारी शेखर मोहिते यांचे निधन
सांगली, २९ जुलै / प्रतिनिधी
महापालिका आरोग्य विभागाकडे गटर कुली पदावर काम करणारे कर्मचारी शेखर सुंदर मोहिते (वय ४५) यांचे आज कामावर असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. शेखर मोहिते हे आज सकाळी नेहमीप्रमाणे साडे सहा वाजता कामावर गेले. सकाळी नऊपर्यंत त्यांचे काम चालू होते. त्यानंतर त्यांना अचानक उलटीचा त्रास सुरू झाला व मुच्र्छा येऊन ते पडले. तातडीने त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मोहिते हे मृत झाल्याचे घोषित केले. त्यांच्या निधनाचे वृत्त महापालिकेत समजताच अधिकारी व कर्मचारी शासकीय रुग्णालयात जमा झाले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

फलटणमधील १८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
फलटण, २९ जुलै / वार्ताहर
प्रश्नथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत फलटण तालुक्यातील एकूण १८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. या परीक्षेत प्रश्नथमिक शाळेतील ४१५९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २९३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस २५६१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २४४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रश्नथमिक शिष्यवृत्तीसाठी स्वप्नील गायकवाड, प्रज्ञा पवार, संदेश िशदे यांची तर माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी निलांबरी कासीकर, अमोघ बर्वे, अशिष नरवटे, मयुरी कदम, किशोर जाधव, निलीमा तांबे, अक्षय गार्डे, अक्षय सुतार, तुषार खुडे, मृणाल झणधणे, स्मिता िशदे, रेश्मा दडस, धनश्री कचरे, ॠद्धी दोशी यांची निवड झाली आहे.

साताऱ्यात लिंकिंग खत विक्री केंद्रावर कारवाई
सातारा, २९ जुलै/प्रतिनिधी
लिंकिंगद्वारे खत विक्री करणाऱ्या २७ विक्री केंद्रांवर कृषी खात्याने कारवाई केली असून, विक्रीबंद आदेश बजावलेल्या ८९४५ किलोग्रॅम खताची किंमत २१ लाख ८२ हजार १६५ एवढी आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल यांनी दिली. खत टंचाई काळात शेतकऱ्यांना जादा दराने खताची विक्री होऊ नये. लिंकिंगचे प्रकार होऊ नये यासाठी तालुका तसेच जिल्हा स्तरावरून निविष्ठा विक्री केंद्राची कडक तपासणी चालू आहे. तपासणीमध्ये त्रुटी आढळलेल्या चार विक्री केंद्रधारकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. १५:१५:१५ व इतर खतांच्या ग्रेड्स बरोबर लिंकिंग करत असणाऱ्या २७ खत विक्री केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सुजला, १९:१९:१९ व इतर अशा द्रवरूप खतांच्या लिंकिंगची निविष्ठा विक्रीबंद करण्यात आली आहे.

उद्योग बँक व्याख्यानमाला अध्यक्षपदी डॉ. बोल्ली
सोलापूर, २९ जुलै/प्रतिनिधी
सोलापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या उद्योग बॅंक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या ४४ व्या गणेशोत्सव बौद्धिक व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांची एकमताने निवड करण्यात आली. मंडळाचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे- कार्याध्यक्ष- जयप्रकाश पल्ली, उपाध्यक्ष- अंबादास बिटला, सरचिटणीस- प्रकाश पुल्ली, चिटणीस- पुरुषोत्तम श्रीगादी, सहचिटणीस- नरेश श्रीराम, कोशाध्यक्ष- श्याम बोलाबतीन, सहकोशाध्यक्ष- अंबादास उपलंची, कार्यकारिणीवर विठ्ठलराव खंडे, हणमंत वड्डेपल्ली, अंबादास कुडक्याल, राजा पोतन, सुदर्शन गुर्रम, लक्ष्मीनारायण चक्राल, प्रदीप पडघे, सिद्धारूढ हुलमनी, रवींद्र गेंटय़ाल यांच्यासह चौदा सदस्यांची निवड करण्यात आली. आशिया खंडातील पहिली समजली जाणारी सोलापूर जिल्हा औद्योगिक सहकारी बँक आर्थिक कारणामुळे २००४ मध्ये अवसायनात निघाली. परंतु बँक पडली तरी बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन ही व्याख्यानमाला पुढे चालूच ठेवली. हे विशेष समजले जाते.

चंपाबाई कन्यारत्न पुरस्काराचे आज वितरण
सोलापूर, २९ जुलै/प्रतिनिधी
इंदुमती भालचंद्र कस्तूरकर यांच्या एकसष्टीनिमित्त उद्या दि. ३० रोजी मातोश्री स्व. चंपाबाई कन्यारत्न विकास पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. होटगी रस्त्यावरील चतुरबाई श्राविका विद्यालय येथे उद्या गुरुवारी सकाळी ८ वाजता या पुरस्काराचे वितरण निनाद देसाई यांच्या हस्ते, रतनचंद शहा यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर, प्रश्न. पुरणचंद्र पुंजाल आणि केतन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. चतुरबाई श्राविका विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थिनींच्या आई किंवा वडिलांनी एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली. त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रशिक्षणार्थी शिक्षकांचा जेवणावर बहिष्कार
कागल, २९ जुलै / वार्ताहर
सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता आठवीच्या पुनर्रचीत अभ्यासक्रम प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकांनी संयोजकांतर्फे देण्यात येणाऱ्या दुपारच्या भोजनावर बहिष्कार टाकण्याची घटना घडली. डी.आर.माने महाविद्यालय कागल येथे प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. प्रशिक्षणासाठी तालुक्यातील दीडशे शिक्षक सहभागी झाले होते. प्रशिक्षणासाठी हजर असलेल्या शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यातून ३५ रुपये जेवण व एकवेळच्या चहासाठी घेतले जातात. मात्र दिले जाणारे जेवण चांगल्या प्रकारचे व पुरेसे नसल्याच्या तक्रारी आल्या. शिक्षकांकडून घेतलेल्या ३५ रुपयांपैकी केवळ २० रुपयाचे जेवण, दोन तीन रुपये एक वेळच्या चहावर खर्च पडतात. त्यामुळे प्रशिक्षणासाठी दिले जाणारे जेवण दर्जेदार नसल्यानेच आपण जेवणावर बहिष्कार टाकल्याचे अनेक शिक्षकांकडून सांगण्यात आले. तसेच रविवारी नागपंचमीचा दुसरा दिवस. या दिवशी घरात गोडधोड असल्याने व आनंदाचा दिवस असताना शिक्षकांना प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे लागल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना राज्यस्तरीय पुरस्कार
सोलापूर, २९ जुलै/प्रतिनिधी
येथील श्री साई महिला प्रतिष्ठानच्या वतीने राज्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या पाच महिलांना स्व. अलकनंदा जोशी राज्यस्तरीय महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रमुख प्रश्न. ए. डी. जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिक्षण, उद्योग, समाजकार्य, बँक आणि वैद्यकीय या पाच क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. प्रत्येकी पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या ३१ ऑगस्ट रोजी सोलापुरात समारंभपूर्वक हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तेव्हा वरील क्षेत्रात काम केलेल्या व सध्या कार्यरत असलेल्या महिलांनी आपल्या कार्याची सविस्तर माहिती दि. १७ ऑगस्टपर्यंत प्रश्न. ए.डी. जोशी, अध्यक्ष इंडियन मॉडेल स्कूल, जुळे सोलापूर-४१३००४ (मोबाईल-९४२२०६८३८६) या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस प्रतिष्ठानच्या महिला सचिव सायली जोशी, विजय जोशी, अपर्णा कुलकर्णी, ममता बसवंती, एम. एस. अंबुसे हे उपस्थित होते.

धरणे आंदोलनात पाच हजार शिक्षक सहभागी होणार
सोलापूर, २९ जुलै/प्रतिनिधी
राज्यातील प्रश्नथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १ ऑगस्ट रोजी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या धरणे आंदोलनात सुमारे पाच हजार शिक्षक सहभागी होणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्रश्नथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी दिली. शिक्षक संघाने पुकारलेल्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी राज्य संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकांची बैठक झाली. यावेळी शासनाने यापूर्वी वेतन आयोगासंबंधी केंद्राप्रमाणे राज्यातील शिक्षकांनाही वेतन देण्याचे मान्य करूनही दिले नाही. घरभाडे आणि वाहन भत्ता देण्याचे टाळले. त्यासाठी शिक्षक संघाने आंदोलनाचे हत्यार उपसल्याचे श्री. काळे यांनी सांगितले.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आज आयोजन
फलटण, २९ जुलै/वार्ताहर
आदर्की बुद्रूक येथील श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था आणि साधू वासवानी मिशन व के. के. आय (बुधरानी) हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने गुरुवारी (दि. ३०) सकाळी दहा वाजता मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आदर्की व परिसरातील नेत्ररुग्णांनी मोफत तपासणी करून आवश्यक असेल त्या रुग्णांची बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याशिवाय या शिबिरात दाखल झालेल्या नेत्र रुग्णांसाठी डोळे तपासून मोफत चष्म्यांचे नंबर काढून देण्यात येणार आहेत. आवश्यक असेल त्या नेत्र रुग्णांना अल्पदरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सतीश बागल यांच्या हस्ते गुरु. दि. ३० रोजी सकाळी १० वा. भैरवनाथ पतसंस्था सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.

सोलापुरात ऑगस्टमध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
सोलापूर, २९ जुलै/प्रतिनिधी

गेल्या ५४ वर्षापासून अव्याहतपणे चालू असलेली आचार्य शांतिसागर पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धा येत्या ऑगस्ट महिन्यात होणार असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक प्रश्नचार्य सुभाष शास्त्री यांनी दिली. ही स्पर्धाप्रणाली जात-पंथविरहित असून सुमारे अकरा गटांतून होणार आहे. वरच्या स्तरावरील सर्व गटांसाठी एक हजार रुपयांपेक्षा अधिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रश्नथमिक स्तरावरून महाविद्यालयीन स्तर, शिवाय खुल्या प्रश्नैढ गटासाठी असलेल्या या स्पर्धेत दरवर्षी राज्यातील हजारांहून अधिक स्पर्धक भाग घेतात. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून संस्थेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, अशी माहितीही प्रश्नचार्य शास्त्री यांनी दिली.