Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

गणेश महासंघातर्फे उद्या बक्षीस वितरण समारंभ
औरंगाबाद, २९ जुलै/खास प्रतिनिधी

 

श्रीगणेश महासंघ जिल्हा उत्सव समितीतर्फे गतवर्षी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम शुक्रवारी (दि.३१) निराला बाजारमधील तापडिया नाटय़मंदिरात होणार आहे.
२००८ मध्ये विविध स्पर्धाचे आयोजन श्रीगणेश महासंघ उत्सव समितीतर्फे करण्यात आले होते. गणेश स्थापनेपासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. सजीव व निर्जीव देखावे, सुंदर मूर्ती, विद्युत रोषणाई, विशेष उपक्रम, शिस्तबद्धता, इको फ्रेंडली, झांज व लेझिम पथक, पावली, मशाल पथक, पाककला, रांगोळी, सायकलिंग, स्केटिंग, मॅरेथॉन, बुद्धिबळ, कुस्ती आदी स्पर्धा घेण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली. या स्पर्धामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाला राज्यमंत्री अ‍ॅड्. प्रीतमकुमार शेगावकर, माजी मंत्री हरीभाऊ बागडे, आमदार राजेंद्र दर्डा, आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार विक्रम काळे, आमदार किशनचंद तनवाणी, आमदार सतीश चव्हाण, आमदार एम. एम. शेख, महापौर विजया रहाटकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त के. एल. बिष्णोई हे असणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, कार्याध्यक्ष प्रदीप जैस्वाल यांनी केले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता तापडिया नाटय़मंदिरात होईल.