Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

निळ्या रेषेच्या आतील बांधकामांचे सर्वेक्षण करणार
बिल्डर्सच्या संगनमतानेच नद्या-नाल्यांची लूट - खासदार गजानन बाबर
पिंपरी, २९ जुलै / प्रतिनिधी

पवना नदीच्या पूर नियंत्रण रेषेतील सर्व बांधकामांचे सर्वेक्षण करणार असल्याचे , पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता एकनाथ उगिले यांनी आज येथे सांगितले.निळ्या रेषेच्या आत बांधकामांना परवानगी देऊ नये अशी शिफारस पाटबंधारे विभागाने महापालिकेला केली; परंतु आजसुध्दा बांधकामे सर्रास सुरू असल्याचे फेरफटका मारला असता आढळून आले.दरम्यान , महापलिकेचे अधिकारी, काही बिल्डर्स यांनी मिळून शहरातील नद्या,नाले लुटून खाल्ल्याचा गंभीर आरोप खासदार गजानन बाबर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला आहे.

उच्चशिक्षणासाठी परदेशी जाताय..?
सावधान !
‘ऑसी’ धडय़ानंतर केंद्राची मार्गदर्शिका

आशिष पेंडसे, पुणे, २९ जुलै

लाखो रुपये खर्च करून उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणारे विद्यार्थी व पालकांची लुबाडणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, सावधानतेचा इशारा देणारी मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे. अमेरिका-सिंगापूरसह नऊ देशांचा सध्या त्यामध्ये समावेश करण्यात आला असून, ऑस्ट्रेलिया-कॅनडामधील शिक्षणाचे ‘धोके’ जाणून घेत विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कर्नाटकी पसार होण्याचे ‘श्रेय’सुद्धा गुन्हे अन्वेषण शाखेलाच!
सलील उरुणकर
पुणे, २९ जुलै

नातूवाडय़ाची जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी फरार झाले, मात्र त्यांना पसार होण्यास मदत झाली ती गुन्हे अन्वेषण शाखेतील अंतर्गत संघर्षांमुळेच! मोबाईल ‘लोकेशेन’ची माहिती मिळाल्यावरही, पोलिसांच्याच तांत्रिक विभागाकडून कर्नाटकी यांचा शोध घेणाऱ्या विशेष पोलीस पथकाला जाणीवपूर्वक अंधारातच ठेवले गेले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे याप्रकरणातील मुख्य आरोपी व लँड माफिया दीपक मानकर आणि त्याच्या साथीदारांसह कर्नाटकी यांचा शोध घेण्यास मोजके अधिकारी वगळता अन्य गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी किती प्रामाणिक प्रयत्न केले हेही आता उघड होत आहे.

जमीन तयार करण्याचा कारखाना
मुकुंद संगोराम

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी या तिन्ही नद्यांच्या पात्रामध्ये गेल्या पंधरा-वीस वर्षांत जी बांधकामे झाली आहेत, ती शहराच्या पर्यावरणाची प्रचंड हानी करणारी आहेत, हे न कळणारे अधिकारी कुणी नेमले आणि त्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणारे नगरसेवक कुणी निवडले, असा प्रश्न पडावा! नगरसेवकांना निवडून दिल्यावर ते नेमके काय करतात, ते बिचाऱ्या मतदारांना कळत नाही. त्यामुळे वाटोळे झालेल्या शहरात राहणे त्यांच्या नशिबी येते.

कोथरूडच्या आणखी एका शाळेतील विद्यार्थ्यांस ‘स्वाइन फ्लू’
पुण्यातील ७६ रुग्णांमध्ये ५७ विद्यार्थ्यांचा समावेश

पुणे, २९ जुलै / प्रतिनिधी

कोथरूडच्या आण्णासाहेब पाटील विद्यालयातील एका विद्यार्थ्यांस ‘स्वाइन फ्लू’ झाल्याचे स्पष्ट झाले असून शहरात आज चार रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील रुग्णांची संख्या ७६ पर्यंत पोहोचली असली तरी आतापर्यंत लागण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५७ झाली आहे. नव्याने रुग्ण सापडलेल्या शाळा बंदचा निर्णय शाळा समन्वय समितीच घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दूषित अन्न-पाण्यामुळे होणारे आजार
दूषित पाण्यामुळे होणारे आजार

मुंबईवासीयांचे जीवन घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे पळत असते. अर्थार्जनासाठी घराबाहेर पडताना शरीराचा, कपडय़ाचा नीटनीटकेपणा सांभाळणारे मुंबईकर आपल्या आहाराबद्दल किती जागरूक असतात? पोळी-भाजीचा डबा सोबत घेऊन जाण्याची संस्कृती आता बदलतच चालली आहे. ऑफिसच्या बाहेर टपरीवर मिळणारे वडापाव, भेळ, बर्गर आणि सँडविचेस आता बहुसंख्य तरुण-तरुणींचे ‘लंच’ होऊ लागलेत. आपल्या शरीराची, सौंदर्याची, कपडय़ांची इतकी काळजी घेणारी ही पिढी आपल्या खाण्यापिण्याबाबत इतकी उदासीन का?

---------------------------------------------------------------------------

‘गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’ एक सामाजिक उपहासनाटय़
एखाद्या हॉस्पिटलमधून नवजात बाळ चोरीला गेल्याची बातमी अधूनमधून वर्तमानपत्रांतून येत असते. अशावेळी या कृत्यामागे एखादी संघटित टोळी कार्यरत असण्याचीच शक्यता व्यक्त केली जाते. ती बऱ्याचदा खरीही ठरते. अशी मूलचोरीची प्रकरणे चिकाटीनं धसास लावल्यावर त्यात संबंधित हॉस्पिटलमधील डॉक्टरांपासून ते अगदी वॉर्डबॉय-नर्सेसपर्यंत सगळ्यांचेच हात गुंतलेले असल्याचं उघडकीस येतं. कधी कधी अपत्यासाठी भुकेली एखादी स्त्रीही कुणाच्याही नकळत बाळ चोरण्याचं असं कृत्य करते. अशा प्रकरणांत ज्यांचं बाळ चोरीला जातं त्यांची काय अवस्था होत असेल, याची खरंच कल्पनाही करवत नाही. सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल होणारी स्त्री ही सहसा गरीब वा कनिष्ठ मध्यमवर्गातलीच असते.

‘मन उधाण वाऱ्याचे’ येतंय..
लता नार्वेकर यांच्या श्रीचिंतामणी संस्थेची निर्मिती असलेल्या ‘सही रे सही’ आणि ‘लोच्या झाला रे’ या दोन विनोदी नाटकांच्या प्रचंड यशाची चव चाखल्यावर दीर्घ विश्रामानंतर आता ‘मन उधाण वाऱ्याचे’ हे अरविंद औंधे लिखित आणि राजन ताम्हाणे दिग्दर्शित नवं नाटक संस्थेतर्फे या आठवडय़ात रंगमंचावर येत आहे. मधल्या काळात निर्मात्या लता नार्वेकर अचानक चित्रपटनिर्मितीकडेही वळल्या होत्या. आणि याच कालखंडात वैविध्यपूर्ण मराठी चित्रपटांचं चांगलंच पेव फुटल्यानं लताबाईही आता त्यातच रमणार, असंच वाटत होतं. त्यामुळे त्या पुन्हा नाटय़निर्मितीकडे कितपत वळतील, अशी शंका नाटय़वर्तुळात व्यक्त केली जात होती. परंतु नाटक हे पहिलं प्रेम असलेल्या लता नार्वेकर या रंगभूमीपासून दूर जाणं तसं कठीणच होतं. या काळात त्या चांगल्या नाटय़संहितेच्या शोधात होत्या.

पुन्हा एकदा गारवा, पण आता एमपी थ्रीवर
गायक, संगीतकार आणि अभिनेता अशी ओळख असलेला ‘गारवा’फेम मिलिंद इंगळे याचा ‘गारवा’ हा आल्बम आता एमपी थ्री सोनी म्युझिक कंपनीने बाजारात आणला आहे. यासंदर्भात ‘लोकसत्ता’शी बातचीत करताना मिलिंद इंगळे म्हणाला की, आज १० वर्षांनंतरही आजच्या कॉलेज तरुण-तरुणींना ‘गारवा’ हा आल्बम ऐकायला नक्कीच आवडेल. म्हणूनच सोनी म्युझिकने हा आल्बम आता एमपी थ्रीवर आणला असून, त्याचबरोबर ‘सांज गारवा’ हा माझा आणखी एक आल्बम आणि आशा भोसले यांचा ‘नक्षत्राचे देणे’ हा आल्बम असा कॉम्बो पॅक रसिकांना एकत्रितपणे एमपी थ्रीवर ऐकायला मिळणार आहे, असे तो म्हणाला. ‘रिमझिम धून, आभाळ भरून, भारावले मन येणार आहे कोण..’ अशा शब्दांना मिलिंद इंगळेनेच संगीत आणि आवाज दिला.

‘झालं गेलं विसरून जाऊ’ एक ऑगस्टला रंगमंचावर
‘ए भाऊ, डोकं नको खाऊ’च्या यशानंतर राजन क्रिएशन आणि आशा वेलणकर प्रस्तुत ‘झालं गेलं विसरून जाऊ’ हे नवं नाटक रंगमंचावर येत आहे. नाटककार चं. प्र. देशपांडे यांचं ‘डावेदार’ हे समांतर रंगभूमीवरील नाटक या नव्या नावानिशी आता व्यावसायिक रंगमंचावर येत आहे. दिग्दर्शन गिरीश पतके यांचं असून, नेपथ्यरचना प्रकाश मयेकर यांची आहे. संगीताची धुरा राहुल रानडे सांभाळत आहेत. प्रकाशयोजना शीतळ तळपदे यांची, तर. वेशभूषा सुमुखी पेंडसे यांची आहे. या नाटकात प्रदीर्घ कालावधीनंतर प्रदीप वेलणकर रंगभूमीवर पुनरागमन करीत आहेत. शिवाय गिरीश साळवी, आभा वेलणकर, सीमा घोगळे हेही महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १ ऑगस्ट रोजी वाशीच्या विष्णुदास भावे नाटय़गृहात होणार आहे.

--------------------------------------------------------------------------

‘सभासद हे सहकारी संस्थेचे खरे मालक’
हडपसर, २९ जुलै/वार्ताहर

सहकारी संस्थेचे खरे मालक सभासद असून, संचालकांनी विश्वस्तांच्या भूमिकेतून कारभार चालवला पाहिजे. सहकाराशिवाय सर्वसामान्य सभासदांची आर्थिक प्रगती होऊ शकत नाही, त्यासाठी पतपेढय़ांचेही योगदान महत्त्वाचे आहे, असे मत सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. पुणे शहर शिक्षण खाते सेवक सहकारी पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी सभासद पाल्यांच्या गुणवंत गुणगौरव समारंभात ते बोलत होते. संचालक अनिल बेडगे, शिक्षण सहसंचालक दिगंबर देशमुख, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, पतसंस्थेचे अध्यक्ष भानुदास लाव्हर, उपाध्यक्ष संजय वाघमारे, सचिव मनोहर कुदळे, सहसचिव संदीप जाधव, सतीश बागवे, सुरेश शिंदे, विद्या साळुंके, माधुरी गुजर, सदाशिव निवंगुणे, किसन गटकळ, नरेंद्र देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविकात पतसंस्थेचे अध्यक्ष भानुदास लावर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन अनिल गुंजाळ यांनी तर आभार उपाध्यक्ष संजय वाघमारे मानले.

जिल्हाधिकारी दळवी यांना महात्मा गांधी शांतता पुरस्कार
पुणे, २९ जुलै / खास प्रतिनिधी

पुण्याचे जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा महात्मा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. शांतता व जातीय सलोखा कायम ठेवण्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेचे दळवी हे एक शिल्पकार आहेत. ही योजना, तिची अंमलबजावणी यामध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते येत्या ७ ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दळवी यांचा गौरव केला जाणार आहे.

परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तपदी फडतरे
पुणे, २९जुलै / प्रतिनिधी

शहर पोलीस दलाच्या परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तपदी सोलापूर जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लोहमार्ग अधीक्षकपदी कोल्हापूर जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक चंद्रकांत कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सी.एच. वाकडे यांची चार महिन्यांपूर्वी बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सतीश खंडारे यांनी या काळात परिमंडळ एकच्या उपायुक्तपदाचा अतिरिक्त पदभार संभाळला. गृहखात्याने नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार फडतरे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.