Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

क्रीडा

मेरी कोम, विजेंद्र, सुशीलकुमार यांना खेलरत्न
नवी दिल्ली, २९ जुलै/पीटीआय

पुलेला गोपिचंद, सतपाल सिंग यांना द्रोणाचार्य पुरस्कार
इशारसिंग देओल आणि सतबीरसिंग दाह्य़ा यांना ध्यानचंद पुरस्कार
गौतम गंभीर, सायना नेहवाल, पंकज शिरसाट यांना अर्जुन पुरस्कार
महिला मुष्टियोध्दा मेरी कोम आणि विजेंद्रसिंग तसेच कुस्तीगीर सुशीलकुमार यांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सामान्यत: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार एकाच खेळाडूला दिला जातो. यंदा पहिल्यांदाच तिघा खेळाडूंना एकाचवेळी हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. मेरी कोम ही महिलांच्या जागतिक मुष्टियुध्द स्पर्धेमध्ये चारवेळा विश्वविजेती ठरली आहे. तसेच बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक विजेता विजेंद्रसिंग याने बॉक्सिंगमध्ये पहिल्यांदाच भारताला पदक मिळवून दिले होते. या दोघांनाही पुरस्कार म्हणून प्रत्येकी ७.५ लाख रूपये आणि प्रशस्तिपत्र दिले जाणार आहेत. सुशीलकुमार यानेही बीजिंग ऑलिंपिकमध्ये भारताला कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवून दिले होते.

धोनी - युवराजचा आयसीसी क्रमवारीतही दोस्ताना
माही पहिल्या तर युवी दुसऱ्या क्रमांकावर
दुबई, २९ जुलै/ पीटीआय

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सिक्सर किंग’ युवराज सिंग यांचा दोस्ताना जगजाहीर आहे. त्यांचा या दोस्तानाचा प्रत्ययही आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पाहायला मिळू शकतो. धोनीने या क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले असून युवराजने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेऊन दोस्ती निभावली आहे. धोनीने ८२८ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. तर युवराजने ७८४ गुणांसह कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच दुसरे स्थान पटकाविले आहे. तर ऑस्ट्रेलियाचा मायकेल हसी ७६७ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पुरस्कार बुवा साळवींना अर्पण - शिरसाट
पुणे २९ जुलै/प्रतिनिधी

राज्याचे क्रीडा महर्षी व कबड्डीचे सर्वेसर्वा कै.शंकरराव साळवी यांच्यामुळेच माझी कबड्डी कारकीर्द घडली, त्यामुळे मला मिळालेला अर्जुन पुरस्कार मी त्यांनाच अर्पण करीत आहे, असे भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार पंकज शिरसाट याने ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीला सांगितले. अहमदनगरचा रहिवासी असलेल्या पंकजला आज क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. कबड्डी खेळाचाच हा गौरव आहे, असे सांगून शिरसाट म्हणाला, पंधरा वर्षांनी महाराष्ट्रास हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला विशेष आनंद झाला आहे.

आजपासून रंगणार तिसरे महायुद्ध
अंतिम अॅशेस मालिका खेळणाऱ्या अॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफवर इंग्लंडची मदार
लॉर्ड्सच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज

एजबस्टन, २९ जुलै/ पीटीआय

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील यांच्यातील अॅशेस मालिकेतील कसोटी सामना म्हणजे साऱ्या क्रिकेट विश्वासाठी महायुद्धच. उद्यापासून यंदाच्या अॅशेस मालिकेतील तिसरा सामना उद्यापासून एजबस्टनमध्ये रंगणार असून या सामन्यात विजय मिळविण्यासाठी दोन्हीही संघ प्रयत्नशील असतील. इंग्लंडच्या संघात केव्हिन पीटरसन नसल्याने संघाचे लक्ष आपली शेवटची कसोटी मालिका खेळणाऱ्या अॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफवर असेल.

एकदिवसीय मालिकेतही बांगलादेश विजयी
डॉमिनिका, २९ जुलै/ ए.एफ.पी.

शाकिब अल हसन (६५) आणि महम्मद अश्रफूल (६४) यांच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे बांगलादेशने वेस्ट इंडिजवर तीन विकेट्स राखून विजय मिळविला आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडीसह मालिकाही खिशात टाकली. येथील विंडसर पार्क मैदानावर यजमान वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद २७४ धावा केल्या होत्या. बांगलादेशने मात्र सात विकेट्स गमावून एक षटक राखून हे लक्ष्य पार करून कसोटी पाठोपाठ एकदिवसीय क्रिकेट मालिकाही जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

ऑलिम्पिक सुवर्णपदक हे ध्येय - मेरी कोम
नवी दिल्ली, २९ जुलै / पीटीआय

२०१२च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत जर महिला बॉक्सिंगचा समावेश करण्यात आला तर भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याची आपली इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मेरी कोमने व्यक्त केली. मेरी कोमने सांगितले की, मला हा पुरस्कार मिळाल्यानंतर जो आनंद झाला आहे, तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. खरे तर तो मला उशिरा मिळाला पण अखेरीस मला तो बहुमान मिळालाच.

भारत आशियाई कॅडेट कुस्तीत विजेतेपद कायम राखणार - लांडगे
पुणे, २९ जुलै/प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या कुस्तीची सध्याची पंढरी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात येत्या शुक्रवार, दि. ३१ जुलैपासून आशियाई कॅडेट कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा तीन गटामध्ये सुरू होत आहे. त्यामध्ये भारतीय खेळाडू ताश्कंद येथील गत स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपदाची परंपरा कायम राखतील असा विश्वास संयोजन समितीचे संघटन सचिव व आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक प्रा. बाळासाहेब लांडगे यांनी व्यक्त केला.

एकदिवसीय मालिकेतही बांगलादेश विजयी
डॉमिनिका, २९ जुलै/ ए.एफ.पी.

शाकिब अल हसन (६५) आणि महम्मद अश्रफूल (६४) यांच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे बांगलादेशने वेस्ट इंडिजवर तीन विकेट्स राखून विजय मिळविला आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडीसह मालिकाही खिशात टाकली. येथील विंडसर पार्क मैदानावर यजमान वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद २७४ धावा केल्या होत्या. बांगलादेशने मात्र सात विकेट्स गमावून एक षटक राखून हे लक्ष्य पार करून कसोटी पाठोपाठ एकदिवसीय क्रिकेट मालिकाही जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

जागतिक व्हॉलीबॉल स्पर्धेची तयारी पूर्ण; सर्वोत्तम यशाची भारताला आशा
पुणे २९ जुलै/ प्रतिनिधी

जागतिक युवा व्हॉलीबॉल स्पर्धेस ३१ जुलैपासून येथे प्रारंभ होत असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सर्वोत्तम यश मिळवील अशी आशा भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे सरचिटणीस के.मुरुगन यांनी आज येथे सांगितली. शिवछत्रपती क्रीडानगरीत शुक्रवारपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेसाठी अव्वल दर्जाचे सोळा संघ पात्र ठरले आहेत.

बॉक्सिंगला लोकमान्यता मिळाली - मेरी कोम
महेश विचारे, मुंबई, २९ जुलै

‘दोन बॉक्सर्सना ‘खेलरत्न’सारखा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्यामुळे बॉक्सिंगला ऱ्या अर्थाने लोकमान्यता मिळाली,’ अशा शब्दांत चारवेळा विश्वविजेतेपदोटकाविणारी बॉक्सर मेरी कोम हिने आपल्या भावना ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केल्या.गेली काही वर्षे मी पुरस्कारासाठी अर्ज करीत होते, अखेर त्या प्रयत्नांना यश आले. माझ्या कामगिरीची दखल घेतली गेली.

तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेचे टेन स्पोर्ट्सवर प्रसारण
कोलंबो, २९ जुलै/ पीटीआय

भारत, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या ८ ते १४ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेचे प्रसारण टेन स्पोर्ट्स या वाहिनीवरून करण्यात येणार आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळ आणि टेन स्पोर्ट्स यांच्या दरम्यान गेल्या जानेवारीमध्ये यासंबंधीचा करार झाला होता.

अग्निश्वरच्या कामगिरीत सुधारणा
बेंगळुरू, २९ जुलै/पीटीआय

रोममध्ये सुरू असलेल्या फिना जागतिक स्वीमिंग स्पर्धेत आज २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात जे. अग्निश्वर याने २.०९.११ सेकंदाची वेळ नोंदवित आपली कामगिरी काहीशी उंचावली. विरधवल खाडे याने १०० मी. फ्रिस्टाईल प्रकारात ५०.०९ सेकंदाची वेळ नोंदविली. त्याद्वारे तो त्याच्या गटात दुसऱ्या, तर आशियाई स्पर्धकांमध्ये पाचव्या क्रमांकावर आला आहे. संदीप सेजवाल याने ब्रेस्टस्ट्रोक प्रकारातील ५० मीटरमध्ये ६१ आणि १०० मीटरमध्ये ६६ वे स्थान मिळविले आहे. त्याने ही कामगिरी करताना दोन्ही प्रकारांमध्ये नवे राष्ट्रीय विक्रम नोंदविले आहेत.

आनंद पवारचे आव्हान कायम
नवी दिल्ली, २९ जुलै/पीटीआय

न्यूझीलंडमध्ये ऑकलंड येथे सुरू असलेल्या न्यूझीलंड ओपन ग्रां प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीच्या सामन्यांमध्ये आनंद पवार या एकमेव भारतीय बॅडमिंटनपटूचे आव्हान शिल्लक आहे. तो या स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. मात्र, पुरूष, महिला आणि मिश्र दुहेरीच्या फेऱ्यांमध्ये भारतीयांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. या सर्व गटातील भारतीय संघांनी उपउपान्त्य सामन्यात प्रवेश केला आहे. सातव्या मानांकित प्रशांत पवार याने इंडोनेशियाच्या आंड्रेआस आदित्यवर्मन याचा २१-१६, १८-२१, २१-७ असा पराभव केला. उपान्त्यपूर्व फेरीत त्याचा सामना जपानच्या काझुशी यामादा याच्याशी होणार आहे.