Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
शाळेत, कॉलेज वा क्लासेसमध्ये प्रत्येकाचेच मित्र-मैत्रिणी असतात, पण त्यामध्येही कोणीतरी आपली खास वा जवळची व्यक्ती असतेच. ती इतरांपेक्षा थोडी वेगळी असल्यामुळे आपली खास व्यक्ती असते. त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात खास स्थान देणं म्हणजेच आपल्या सुख-दु:खात सामावून घेण्यासारखं असतं.
आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावरती आपल्याला खूप व्यक्ती भेटतात. काही लक्षात राहतात, तर काही वेळेनुसार विसरूनही जातात. एखादी व्यक्ती आपल्याला मानसिक आधार देते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांना वा प्रश्नांना कसं सामोरं जावं याचं आपल्याला मार्गदर्शन करते. आयुष्य म्हणजे नक्की काय असतं हे त्या व्यक्तीकडून कळतं. हीच व्यक्ती आपला खरा मित्र असते.
माझा एक मित्र खरं तर जिवलग मित्र म्हटलं तरी चालेल. या मित्राने मला आयुष्य कसं जगायचं शिकवलं. आयुष्य म्हटलं तर संघर्ष तर येणारच! जॉब करून कॉलेज पूर्ण करणं खरं तर माझ्यासाठी थोडं कठीणच होतं आणि त्यातून कॉलेजसाठी घरातूनही परवानगी नव्हती. अशा वेळी आपल्या स्वतंत्र जीवनावर सर्वजण बंधनं तर आणत नाही ना? याची भीती वाटत होती. ही गोष्ट कोणाला सांगू कळत नव्हतं. रात्रभर रडणं, दिवसा न जेवणं, कामात खूप चुका होणं आणि यातून घरातल्यांच्या बोलण्यामुळे होणारा मानसिक त्रास नकोसा झाला होता. ‘काय करू?’ हा तर प्रश्नच सुटत नव्हता. ही गोष्ट माझ्या एका मित्राला कळली. मी तर त्याला काही सांगितलं नव्हतं. मग त्याला ही गोष्ट कळली कशी? हे मी त्याला जेव्हा विचारलं तेव्हा तो म्हणाला, ‘मी तुझा मित्र’ आहे. मला इतकंही कळू नये का, की तुला काही त्रास होतो आहे.’ त्याच्या त्या सहानुभूतीपूर्ण वाक्यानं माझ्या मनाचा बांध फुटला आणि मी खूप रडले. त्यानं मला रडण्यापासून नाही अडवलं, ‘खूप रडून घे आता, नंतर मात्र अश्रू येता कामा नये..’ तो हसत म्हणाला. त्या वेळेस घडत असलेल्या गोष्टींमुळे मी खूप डिप्रेशनमध्ये होते. घर सोडून जाण्याचा विचारही मनात येऊन गेला. पण या सर्व प्रश्नांवर घर सोडणं किंवा आत्महत्या करणं किती चुकीचं होतं हे मला त्यानं पटवून दिलं.
माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला आणि माझे प्रश्न हे किती साधे प्रश्न आहेत हे दाखवून दिलं. तो नेहमी म्हणतो, ‘आपल्यापेक्षा मोठं दु:ख असलेल्या व्यक्ती बघ. त्यांच्यापुढे आपलं दु:ख क्षुल्लक होऊन जातं’ आणि घरातल्यांना पटवून दे की, तू जॉब करून कॉलेजही करू शकतेस आणि यशस्वी होऊन दाखवू शकतेस. आणि त्यामुळेच मी कॉलेज पूर्ण करू शकले.
‘मित्राचा खांदा फक्त रडण्यासाठी नसतो, तो आधारासाठी आणि मानसिक बळ देण्यासाठीही असतो.’
मंदाकिनी अडसूळ