Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
‘माणूस’ हा सर्व नात्यांमध्ये गुंतलेला प्राणी. या सर्व नात्यांमध्ये मैत्रीचं नातं पूर्णत: वेगळं असतं. बाकी सर्व नाती काही वेळा तुटतात, त्यांच्यात दुरावा निर्माण होतो, केवळ मैत्रीखेरीज.
आपल्यावर खरे तर चांगले संस्कार करतात, आपलं आयुष्य घडवीत असतात ते आपलं ‘कुटुंब’ आणि आपली ‘मैत्री’. आपल्याला खूप मित्र-मैत्रिणी असतात पण आपलं मन जाणणारी, सुख-दु:खात साथ देणारी, चुकत असल्यास योग्य वळण दाखविणारी, कठोर शब्दात समजावणारी पण त्या शब्दांतदेखील प्रेमाचा

 

गोडवा असणारी, काळजी असणारी मैत्रीण लाभायला नशीबच लागतं. आणि मला अशी मैत्रीण मिळाली ती ‘मीना राणे’च्या रूपाने. माझी जिवाभावाची मैत्रीण.
कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून आम्ही एकत्र आहोत. कॉलेजमध्ये असताना आमचं एकदाही भांडण झालं नाही. अजूनही आमच्या मैत्रीतील ओलावा तसाच टिकवून आहे आणि दिवसागणिक आमची मैत्री बहरतच चालली आहे. ‘मीना’ खूप हुशार, मनमिळाऊ, नि:स्वार्थी, माझ्या प्रत्येक अडचणीत मला आधार देणारी. खरं तर आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला तिनेच मला शिकवलं. माझी लहान बहीण आम्हाला सर्वाना अचानक सोडून गेली हा माझ्या कुटुंबासाठी सर्वात मोठा धक्का होता. या धक्क्याने माझं तर पूर्ण अवसानच गळून पडलं. हा अनपेक्षित धक्का न पचवता आल्यानं मी निराशावादी झाले होते. खरं तर जगण्याचाच कंटाळा आला होता. पण यातून मला बाहेर काढण्याचं फार मोठं श्रेय मीनाला जातं. सांत्वन करायला सगळेच आले, पण कर्तव्याची जाणीव, समजूतदारपणा माझ्यात मीनाने निर्माण केला, कारण ती अशा प्रसंगातून गेलेली होती, त्यामुळे आपलं माणूस गमावल्याचं दु:ख ती जाणून होती. तिच्याकडे बघून मला जगण्याची नवीन उमेद आली. तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे खूप मोठी दु:खं दडलेली आहेत, पण ती जिद्दीने, हसत-आनंदात आपलं आयुष्य आनंदमयी करण्याचा प्रयत्न करतेय आणि तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो. आज मला जे काही यश मिळालं आहे, त्यात तिचा वाटा फार मोलाचा आहे आणि तिच्या चेहऱ्यावर माझ्या यशाचं समाधान, आनंद दिसून येतो.
मीनाने मला एकदा माझ्या वाढदिवसानिमित्त ग्रीटिंग कार्ड दिलं, तिने ते स्वत: बनवलं होतं. त्या कार्डावर आमच्या दोघींचं हुबेहूब चित्र काढलं होतं. ते पाहून माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. मीना चित्रकार नक्कीच नाहीए पण आमच्या मैत्रीचं, प्रेमाचं प्रतिबिंब तिच्या मनात खोलवर रुतलंय आणि त्याचाच तो आविष्कार होता. आणि म्हणूनच मी म्हटलं की चांगली मैत्रीण लाभायला नशीब असावं लागतं आणि नशिबाने ते मला भरभरून दिलं आहे.
स्मिता दळवी