Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
शाळा-कॉलेजात असताना मैत्रीचे जे आपसूक बंध तयार होतात, ते बऱ्याच चांगल्या-वाईट प्रसंगातून तावूनसुलाखून निघतात नि क्वचितच भेटू शकतात. म्हणजेच पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत हा प्रवास सुरू असताना आपण अनेक मित्र-मैत्रिणी बनवतो. पण तीच खरी ‘मैत्री’ आहे का? याची उजळणी आजपर्यंत आपण करत असतो. पण त्यातही असेही काहीजण असतात जे काही न बोलताच आपले मार्गदर्शक ठरतात.

 

असंच काहीसं घडलं ते माझ्यासोबत, मला हवे तेवढे मिळालेले मार्क्‍स मिळाले होते, पण हव्या त्या कॉलेजात अ‍ॅडमिशन मिळाली नव्हती. माझ्या मित्र-मैत्रिणींना दुसऱ्या ठिकाणी अ‍ॅडमिशन मिळाल्यामुळे माझा आधीच मूम्ड ऑफ होता. मी निराश झाले होत. या सर्व गोष्टी मनात घेऊन मी कॉलेजला गेले. त्या दिवशी फ्रेंडशिप डे होता. मी कोणाला ओळखत नव्हते आणि स्वत:हून बोलायची माझी सवय नव्हती. म्हणून संपूर्ण कॉलेज न्याहाळून झाल्यावर कॉलेजला लागून असणाऱ्या कट्टय़ावर मी मुक्काम ठोकला.
तिथलं वातावरण माझ्याशिवाय सगळ्यांनाच आनंद देणारं होतं. रंगीत बँड, मार्करने रंगवलेली टी-शर्ट.. सगळीकडे रंग पसरल्यासारखे. मी तिथंच बसून माझ्याजवळ असणाऱ्या मार्करने त्या कट्टय़ावर गिरबटत बसले. जणू त्या कट्टय़ाला मी माझा मित्रच बनवला. मी एकटी असताना माझ्या मनात चालणाऱ्या अनेक गोष्टी, प्रश्न कदाचित त्या कट्टय़ाला जाणवत असावेत. आणि तो मला त्यातून बाहेर काढण्यासाठी धडपडतोय हे असं सारखं वाटू लागलं. जेव्हा त्या कट्टय़ाकडे पाहू लागले तेव्हा तो हसत उतरतो/ उत्तर देतोय असा भास होऊ लागला.
कोणताही डे असला की सेलिब्रेशन कट्टय़ावर, कधी ग्रुपमध्ये झालेले भांडण, तर कधी मूड असला की काढलेले फोटो तेही त्या कट्टय़ावरच. अशा प्रत्येक वेळी कट्टा असायचाच. त्याच क्षणी माझ्या डोक्यात टय़ूब पेटावी असा प्रकाश पडला आणि जाणीव झाली की बऱ्याचदा काही नाती अशी असतात की जी जवळ असूनही खूप लांब असतात, पण तो निर्जीव कट्टा तिथे येणाऱ्या प्रत्येकाच्या चांगल्या-वाईट अनुभवांचा साक्षीदार ठरला होता. तो कोणाकडूनही कसलीही अपेक्षा न करता त्याच्या सतत बरोबर होता.
त्याच वेळी मी एक गोष्ट शिकले की कदाचित हीच खरी मैत्री असावी. कुठल्याही नात्याच्या पलीकडची, कोणत्याही आणा-भाका, आशा-अपेक्षांच्या ओझ्यां पल्याड झेपावणारी! गीव्ह अँड टेक्स नसतं. त्यानंतर मला मैत्रीचा खरा अर्थ कळाला. तो बंध अजून मी जगतेय. आज माझे खूप मित्र-मैत्रिणी आहेत. पण कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे.
कधी-कधी त्या कट्टय़ाकडे पाहिलं की त्याचा हेवा वाटतो. कारण प्रत्येक वर्षी तो कट्टा तिथंच उभा राहून जुन्या मित्रांचा निरोप घेतो व नव्या मित्रांचे आनंदाने स्वागत करण्यास सज्ज होतो.
स्वप्नाली देसाई