Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
मैत्रीचा अनुभव प्रत्येकाला काहीतरी बोध देणारा असतोच. माझ्या मैत्रीचा अनुभव हा स्वत:ला सिद्ध करणारा आहे. माझी मैत्रीण स्नेहा ही अगदी अदनान सामी (सिंगर) सारखी आहे. आवाजाने आणि शरीरानेही. पहिल्यांदा मी तिला पाहिले आणि हसू आले. मला काही कळेना की, ही मुलगी की मुलगा. ती सतत क्रिकेटच्या टीमसोबत असायची. मला तिच्याशी मैत्री करायची होती पण ती मला थोडी घमेंडी वाटत होती. ती माझ्याशी मैत्री करेल का नाही, अशी भीती वाटत होती. मला तिच्याशी बोलायला धीर व्हायचा नाही. त्यामुळे मी तिच्याविषयी सर्वाना विचारायची- ती कोण आहे, कुठे राहते? काही दिवसांनी आला ‘फ्रेंडशिप डे!’ मनात आदल्या दिवसापासून ठरवले होते, पहिला बॅन्ड हिलाच बांधायचा पण तिच्या मैत्रिणीमध्ये ती इतकी रमली होती की, मला तिचा चेहराही दिसत नव्हता. सगळ्यात शेवटी मी बॅन्ड बांधला आणि तिला विचारलं, तुला माझ्याशी मैत्री करायला आवडेल? तर ती अगदी सहजपणे आणि हसतमुखाने म्हणाली, ६ँ८ ल्ल३? आम्ही खूप छान गप्पा मारल्या. तिच्याबद्दल मला काय वाटत होतं हे सांगितल्यावर तर तिला गंमतच वाटली. त्यानंतर मात्र मी स्वत:ला खूप झापलं, काय वनिता, तू किती वाईट विचार केलास तिच्याबद्दल आणि ती बघ किती चांगली आहे. त्यानंतर मात्र ‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशीचा तो क्षण आजही आठवतो.
एफ.वाय.बी.ए.ला तिने पुन्हा त्याच कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतली आणि मीही. मग पहिल्या दिवशी मी पाहते तर काय ती माझ्याच वर्गात होती. आम्हा दोघींचा स्पेशल विषय मराठी आणि दोघींचा आवडता. माझ्या बाजूला बसू का, असं तिनं विचारलं. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. हळूहळू एकमेकींना स्वत:विषयी, घरातल्यांविषयी सांगता सांगता आम्ही खूप जवळ आलो. एक दिवस नाही आलो तरी आम्हाला करमायचे नाही. कॉलेजच्या वेळेत मजा, मस्ती करायचो.
अशातच एकदा कॉलेजच्या दिवसात दुसऱ्या एका मैत्रिणीवरून आमच्यात गैरसमज झाला आणि ती माझ्याशी बोलायची बंद झाली. मी तिला खूप समजावले. तिला खूप फोन केले पण ती बोलायलाही तयार नव्हती. नंतर कधी तरी तिचं तिलाच जाणवलं. ती खूप रडली आणि मीही. खरं तर ती मुलगी आमची मैत्री तोडायला बघत असावी पण आम्ही एखाद्या क्षुल्लक गोष्टींवरून वाद घातला. ही खूप हास्यास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट होती, हे त्यानंतर कळलं. एखाद्याच्या सांगण्यावरून न ऐकता स्वत:च्या डोळ्याने पाहून, ऐकून वागावे आणि ही गोष्ट आजही आमच्या दोघींच्या लक्षात आहे.
आता मात्र दोघींची क्षेत्रं वेगळी त्यामुळे भेटणं होत नाही याचं दु:ख मात्र आहेच. आज वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच आहोत. आजही फोनवर बोलणं. एखाद्या दिवशी गार्डन किंवा मॉलमध्ये भेटतो आणि जुन्या आठवणींना उजाळा देतो.
वनिता सोनावणे