Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
फ्रेंडशिप डे म्हटला की मन कसं नाचायला लागतं. वर्षभर कोणाला तरी न्याहाळलेलं असतं, पण त्या व्यक्तीशी, (म्हणजे त्या मुलीशी) बोलण्याचं धारिष्टय़ झालं असतंच असं नाही. हां! तसा आपण दुसऱ्या मैत्रिणी ३ँ१४ॠँ जॅक लावलेला असतोच म्हणा, पण त्याचा काही विशेष परिणाम झालेला नसतो. त्यामुळे आपलं मन खट्टूच असतं. पण ऑगस्ट महिन्याची चाहूल

 

लागल्यावर कसं मन मोरासारखं किंबहुना मोरालाही लाजवेल इतकं थुईथुई नाचू लागतं. अर्थात या वेळी तुम्ही का? कशाला? काय? असले प्रश्न विचारणार नाहीत. कारण तुमचंही मन नाचत असेलच. ऑगस्टचा पहिला रविवार म्हणजे फ्रेंडशिप डे! हक्कानं आवडत्या व्यक्तीशी मैत्री करण्याचा डे! यलो किंवा पिंक बॅण्ड बांधून आपल्या मनातल्या प्रेमाचा रस्ता क्लिअर करण्याचा डे.
खरंतर कॉलेज सुरू झाल्या झाल्या येतो तो हा दिवस. पण यंदा नव्याने कॉलेजात प्रवेश घेणाऱ्या मुलांना काही ती संधी मिळणार नाहीये. पण म्हणून तरुणाईचा उत्साह काही कमी झालेला नाहीये हं. आत्तापासूनच दुकानांमध्ये गर्दी जमत आहे. ब्रॅण्डस्, रिबिन्स, गिफ्टस्, ग्रीटिंग्ज, चॉकलेटस्, काय घेऊ नि काय नको असं झालं आहे.
आता काय काय आणि कशा क्रमाने द्यावं याचेही हेतुपुरस्सर पॅटर्न ठरलेले.
फक्त शुद्ध मैत्रीच करायची असेल तर फक्त बॅण्ड (आपण ती करतच नाही म्हणा!)
मैत्री घनिष्ट करायची असेल तर बॅण्ड आणि चॉकलेट (हे मुलगी किती सुंदर आहे यावर डिपेन्ड आहे म्हणा!)
ऑलरेडी घनिष्ट मैत्री असून ती पुढे सस्टेन करायची असल्यास बॅण्ड- चॉकलेट- ग्रीटिंग (मुलगी सुंदर आहे म्हटल्यावर कोणीही इतकं करणारच म्हणा!)
आता फायनली अनेक दिवसांच्या घनिष्ट मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर करायचंय म्हटल्यावर वरच्या लिस्टमध्ये रेड रोझ आणि हार्ट पिलो अ‍ॅड. (इतक्या सुंदर मुलीशी इतकी घनिष्ट मैत्री आहे म्हटल्यावर फ्रेंडशिप डेलाच व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट होणारच म्हणा!)
फक्त मुलंच इतका घाट घालतात असं नाही हं. मुलीही जय्यत तयारी करताच. त्यांच्याही मनात लांडोर नाचत असतेच. मुली तर जुलैपासूनच तयारीला लागतात. नवा ड्रेस, नवे मॅचिंग, मेकओव्हर असं सगळं जोरदार असतं. मुलीही मुलांच्या आवडीनिवडीचा विचार करतात. आपल्या लाडक्या मित्राला काय आवडते? हे त्या हेरून ठेवतात आणि तसंच स्पेशल गिफ्ट त्या मित्राला इंप्रेस करण्यासाठी घेतात.
जर फ्रेंड सर्कल मोठं असेल तर हमखास आऊटिंगचा प्लॅन असतो. अगदी आऊटिंग शक्य नसलं (काय करणार? सगळ्याच मुलींचे पालक कसे मॉडर्न खयालातचे असणार?) तर निदान एका मूव्हीला तरी नक्कीच जाणं होतं.
हे सगळं सोडाच आजकाल फ्रेंडशिप डे लाील्लीे८२ँ्रस्र् ही योग्यरीत्या निभावली जाते. झाला ना गैरसमज? शत्रू मित्र होत असणार असं वाटलं ना तुम्हाला? तसं होण्याचा काळ गेला. आता फ्रेंडशिप डेला शत्रूची जिरवण्याची फॅशन आलीये. त्याचंही वर्षभर प्लॅनिंग चालतं. मग त्या ग्रुपमधल्या मेंबर्सना फोडणं, गनिमी कावे करणं, सगळं चालतं. मेन मजा तेव्हा येते जेव्हा या गटातला हीरो त्या गटातल्या हिरोच्या हिरोइनशी मैत्री करतो आणि ते ती ूंूीस्र्३ करते.
तसं प्रत्येकालाच कोण कोणाला बॅण्ड बांधणार आहे हे चांगलंच ठाऊक असतं. वर्षभर जिची प्रतीक्षा केली त्या मुलीला खरं तर माहीत असतं की हा मुलगा फ्रेंडशिप डेला नक्कीच काही तरी स्पेशल करणारे. पण तरीही उत्सुकता आणि कुतूहल कुठेही कमी होत नाही. या दिवसाचे महत्त्व काही मनातून कमी होत नाही. मैत्री करायला कोणताही दिवस खरं तर चालत असला तरी या दिवसाचे सेलिब्रेशन काही कमी होत नाही. आणि होणारही कसं? मैत्री ही गोष्ट अशी आहे की जी प्रत्येकाला हवीहवीशी वाटतेच.
प्रत्येकाचे मैत्री करण्यामागचे परपज वेगळे असते म्हणा. कोणाला मैत्रीचे रूपांतर प्रेमात करायचे असते, कोणाला मैत्री करून स्वत:चा फायदा करून घ्यायचा असतो. आपल्या नेत्यांना मैत्री करून राजकीय शक्तीप्रदर्शन करायचे असते. असो. हे सगळं जरी असलं तरी चांगल्यातल्या चांगल्या आणि अगदी वाईटतल्या वाईट माणसालाही एखादा तरी बेस्ट फ्रेंड असतोच. किंबहुना त्याला त्याची गरज असतेच. कितीही मित्र असले तरी मनातले आपण एखाद्यालाच सांगतो. संकटप्रसंगी पहिली हाळ त्यालाच मारतो. भांडणं प्रत्येक ग्रुपमध्ये होतात पण आपल्या खास फ्रेंडशी भांडण झाले की मात्र मन हळहळतं.
आता मैत्री फक्त मुला-मुलींचीच, समवयस्कांशीच असावी असेही नाही. तुमच्या पालकांशी तुमची छान मैत्री होऊ शकते, तुमचे शिक्षक तुमचे चांगले मित्रही बनू शकतात, तुमचे भाऊ-बहीण तुमचे चांगले मित्र असू शकतात. आताच्या ग्लोबल वॉर्मिगच्या तडाख्यात तर निसर्गाशीच घट्ट मैत्री करण्याची गरज आहे.
अनेकदा असं होतं की आपल्याला हव्या असणाऱ्या त्या आवडत्या व्यक्तीशी आपली मैत्री होतच नाही. आपण खूप आशेने पुढे सरसावतो पण समोरून काहीच १ी२स्र्ल्ल२ी येत नाही. मग काय सगळंच टाय टाय फिश! अख्याग्रुपमध्ये इज्जतीचा फालुदा होतो. सगळेजण भरघोस हसतात, तेव्हा किती वाईट वाटतं आपल्याला? पण खरं तर तेव्हा नाराज व्हायचं काहीच कारण नाही.
अहो, असा विचार करा की, आपण क्रिकेट खेळ एकटय़ानेच खेळू शकतो का? नाही ना? मग तसेच मैत्रीही वन साईडेड बॅटिंग करून कशी काय साध्य होईल? दोन्ही टिमना इच्छा असली पाहिजे ना.
तेव्हा या फ्रेंडशिप डेला फक्त वरवरची मैत्री करण्यापेक्षा खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधण्याचा एकदा तरी प्रयत्न करा!
मैत्रेय रिसबूड

friendship does not occur with special people.
people become special after becoming friends.

friendship is not about whom you have known the longest, who came first, or who cares the best.
it's all about who came and never left.