Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

कहां गए वो दिन?
कॉलेज संपून एक वर्ष झालं होतं. ग्रुपमधले सगळेजण नोकरी किंवा पुढच्या शिक्षणासाठी इतस्तत: विखुरलेले. पण काय वाट्टेल ते झालं तरी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी भेटायचं असा अलिखित नियम कोणीही कोणालाही न सांगता मनातल्या मनात तयार केलेला. या दिवशी भेटायचं हे गृहीतच धरलेलं.. त्याप्रमाणे भेटलो. रंगीबेरंगी मुला-मुलींनी ठाण्याचा राम मारुती रोड तुडूंब भरुन गेला होता. तो सगळा उत्साह फक्त न्याहाळत आम्ही चौघी फ्रेंडशिप डेचा एक वेगळाच अनुभव घेत होतो. त्या गर्दीचा भाग नसूनही त्यांच्यातलेच एक झालो होतो. सगळेजण एकमेकांना बॅण्ड बांधत होते. हातावर, टी-शर्टवर नावं लिहीत होते. आम्ही आपल्या नुसत्याच उभ्या. एकदा गर्दीकडे आणि एकदा एकमेकींकडे बघत.

 

आमच्यातल्या एकीने आमच्यासाठी बॅण्ड आणले होते. पण आम्ही चक्क तिची खिल्ली उडवली! तिने आणले म्हणून बांधले ते आम्ही एकमेकींना.. पण.. समहाऊ तशी मजा वाटलीच नाही. एक वर्षांतच एवढय़ा मोठय़ा झालो का आम्ही?.. की कॉलेजची मजा कॉलेजमध्येच करता येते याचा अनुभव घेत होतो. काय होतं नक्की याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं.. कॉलेज संपल्यानंतरचं पहिलंच वर्ष असल्यानं आपल्याला हा डे सेलिब्रेट करता येत नाहीय. हे खटकत होतं पण त्याचबरोबर ते सगळं मिस करण्याचही एक वेगळीच गंमत होती. उद्या ऑफिसला जायचय किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स करतोय तर तिथे काय अशा रंगलेल्या हातांनी जायचं. हा प्रॅक्टीकल विचार मनात येत होता.. आणि आठवत होतं. की कॉलेजात असताना हाताला बांधलेला बॅण्ड निघेपर्यंत स्वत: काढायचाच नाही!! जिचा बॅण्ड निघून जाईल तिला चिडवायचं काय हे.. तुझं प्रेम कमी म्हणून.. एवढंच कशाला एकदा तर मॅडमनासुद्धा फ्रेण्डशिप बॅण्ड बांधला होता!! मग काय नुसतंच विश केलं आणि थोडा टाईमपास करुन परतलो घरी. चित्र-विचित्र विचारांचं काहूर मनात ठेवून..
आता या वर्षी कॉलेजनंतरच्या पाचव्या वर्षांत पदार्पण करत आहोत!! पण फ्रेंडशिप डेची ओढ यत्कींचितही कमी झाली नाही. रंगरंगोटी करणार नाही म्हणून काय झालं.. एक मात्र आहे.. फ्रेंडशिप डे साजरा करण्याच्या दृष्टीने आम्ही ‘म्हाताऱ्या’ झालो हे राममारुती रोडवर गेल्यावर जाणवतं. आम्हीही असेच जायचो आवर्जून या रोडवर. हात रंगलेले, हातावरचे बॅंण्ड मोजणं हा एक वेगळा कार्यक्रम. कॉलेजमध्ये आणि रस्त्यावर असा दोनदा डे साजरा नाही केला तर विचित्रंच. आता मात्र त्याच रस्त्यावर त्याच दिवशी उभे राहून आम्ही फक्त बघ्याची भूमिका घेत असतो. दरवर्षी त्याच दिवशी तेच किस्से आठवतात. सगळ्यांच्याच खिशात पैसे खुळखुळायला लागलेत. जेव्हा केव्हा भेटतो हॉटेल ही परवणीची जागा झालीय. पण या दिवशी मात्र पाणी पुरी खाण्याचा शिरस्ता आम्ही आजतागायत मोडलेला नाही.. या रविवारी फ्रेंडशिप डे आहे, कुठे भेटायचं काय करायचं याचं प्लॅनिंग आधीच तयार आहे. चार हात लांब राहूनही गर्दीचाच एक भाग होण्याची वाट सगळ्याजणी पहात आहोत..
नमिता देशपांडे

SILENT and LISTEN
are two words made of same alphabets
but there is another speciality.
i can listen to you when you are silent.
that is friendship.

old friends are gold.
new friends are diamonds.
if you get diamonds, don't forget the gold.
to hold a diamond, you need base of gold.