Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
प्रशांत आज चांगलाच वैतागलेला दिसत होता. सोसायटीची बैठक आटोपून तो घरी आला, तेव्हापासूनच त्याची चिडचिड चालू झाली होती. दरवाजा उघडायला आलेल्या आरतीवर खेकसण्यापासून त्याच्या चिडचिडीला सुरुवात झाली होती.
‘किती वेळ लावतेस दरवाजा उघडायला.’
‘अरे, कोबी चिरत होते. हातातलं काम बाजूला ठेवून दरवाजापर्यंत यायला वेळ लागतोच ना. मी काय दरवान आहे का २४ तास दरवाजाशेजारी बसायला.
‘बरं बरं, कळली तुमची अक्कल’
दरवाजा उघडून प्रशांतची स्वारी थेट बेडरूममध्ये गेली आणि आरशासमोर उभे राहून स्वत:ची छबी न्याहाळू लागली.

 

आरतीला जरा नवलच वाटले. ती आडोशाला उभे राहून तो काय करतोय ते पाहू लागली. प्रशांत आपले पांढरे केस मोजत होता. ‘दोनचार केसच पांढरे झालेत, आणि ही पोरं मला काका म्हणताहेत’ प्रशांत पुटपुटला आणि आरतीला त्याच्या चिडचिडीचं रहस्य उलगडलं.
प्रशांत स्वत:कडे अगदी बारकाईने लक्ष द्यायचा. टापटीप राहण्याची त्याची आवड काहीशा दुराग्रहातच मोडणारी होती. अलीकडं थोडं पोट दिसू लागल्यावर स्वारीनं जिम लावली होती. दररोज दाढी, शॉर्ट शर्ट, बारीक फ्रेमचा चष्मा.. आपण पाचसहा वर्षांच्या मुलाचा बाप झालेलो नाही, पर्यायाने वय चोरण्याचे त्याचे युद्धपातळीवर प्रयत्न चालू असत. एवढे करूनही त्याला आज इमारतीत अकरावी- बारावीतील मुलींनी काका म्हणून हाक मारल्यावर विलक्षण संताप आला. ‘काका होगा तेरा बाप’ अस मनातल्या मनात म्हणत त्याने आपल्या संतापाला वाट करून दिली. स्वारी आरशासमोरून उठली ती तडक बाहेर गेली आणि दहा मिनिटांत घरी परतली ती गोदरेज हेअर डाय घेऊनच. बराच वेळ तो पांढऱ्या केसांना रंग लावण्याचा प्रयत्न करीत होता. ते नीट जमत नव्हते. शेवटी तो आरतीला शरण गेला. ‘आरती- जरा हेअर डाय लावून दे गं.’
‘अरे हेअर डाय लावण्याएवढे पांढरे कुठे आहेत तुझे केस?’
‘फालतू प्रश्न विचारत बसू नकोस. लाव म्हटलं की लावायचं."
आरतीनं त्याला डाय लावायला सुरुवात केली. अक्षरश: दहा बारा केसच पांढरे दिसत होते. खूप बारकाईने बघितल्यावर ते दिसत होते. तरीही प्रशांत अस्वस्थ होता. आरतीनं त्याला डाय लावल्यावर स्वारी खूष झाली.
प्रशांत सारख्या अनेकजणांना ‘काका’ होण्याचा प्रसव वेदना जाणवू लागल्या आहेत. तरुण पोरीबाळींनी ‘काका’ म्हणून हाक मारल्यावर त्यांच्या अंगाचा तिळपापड होतो आहे. अशा मंडळींनी निकोलस सार्कोझी, सैफ अली, संजय दत्त यांच्याकडे पाहावे. आपण अजूनही ‘टाकाऊ’ झालेलो नाही हे त्यांच्या लक्षात येईल. तेव्हा काका मंडळींनो धीर सोडू नका!
तात्पर्य- ‘मामा’ करा पण काका करू नका.
चंद्रहास मिरासदार
cm.dedhakka@gmail.com