Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
तुम्ही जेव्हा पडता, अपयशी होता, तेव्हा कोणीतरी येऊन तुम्हाला मदत करील अशी अपेक्षा करूच नका; कारण कोणीही येणार नाही. स्वत: उठून उभं राहण्याचे कष्ट तुम्हाला घ्यावेच लागतील आणि मग अभिमानाने, मान ताठ करून चालणंही शिकावं लागेल.
सायकल चालवताना जर तुम्ही पडलात तर उठा, अंगावरची धूळ झटका, परत सायकलवर बसा आणि रेस पूर्ण करा, हे मी लहानपणी शिकलो. बऱ्याच वर्षांपूर्वी एका क्षणिक उत्साहात मी गोव्याला बाईकवरून जाण्याचं ठरवलं. मी पनवेलपर्यंत पोहोचलो आणि एका वासराने अचानक रस्ता क्रॉस केला. मी आणि ते वासरू दोघंही गडबडलो आणि पडलो. वासरू जखमी झालं नव्हतं, ते उठलं आणि पळालं. बघ्यांची तोपर्यंत गर्दी जमली. हायवेच्या

 

बाजूला उभं राहून लोक बघत होते. मी उठलो, माझी बाईक उचलली, सॅक उचलली आणि त्यानंतर ती बाजूला उभी असलेली माणसं माझ्या मदतीला आली. मला फारसं लागलं नव्हतं आणि माझी बाईकपण व्यवस्थित होती. मी स्वत:ला सावरून परत गोव्याच्या रस्त्याला लागलो.
नंतर मी अपघाताबद्दल, मदत न मिळाल्याने ओढवणाऱ्या मृत्यूंबद्दल विचार केला. आजूबाजूचे लोक मदत करायला का धावतात याचा पण विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की मी स्वत: उठून उभं राहायला समर्थ होतो आणि जेव्हा हे लोकांना कळलं तेव्हा त्यांनी मला मदत केली. आधीसुद्धा एकदा असंच झालं होतं आणि लोकांनी मला हॉस्पिटलपर्यंत नेलं होतं.
आपण जेव्हा पडतो (अपयशी होतो) तेव्हा न उठता, लोकांच्या मदतीची वाट बघत बसलो, तर कोणीही पुढं येणार नाही. जास्तीत जास्त त्यांना आपली दया येईल, पण जर आपण स्वत: उठून उभे राहिलो तर लोक आपल्याला नक्कीच मदत करतील, पण कधी कधी आजूबाजूला मदत करणारं कोणीच नसेल तेव्हा मात्र तुम्हाला कणखरपणे आणि हुशारीने स्वत:च उठावं लागेल. हे मी माझ्या मित्राकडून- विक्रम राठीकडून शिकलो.
विक्रमला नेहमी काही ना काही तरी सुचत राहायचं. त्याच्या उमद्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि आकर्षक हसण्यामुळे कोणीही त्याच्या प्लॅनमध्ये पैसे आणि वेळ गुंतवायला तयार व्हायचं. आम्ही हॉटेल मॅनेजमेंट करून नुकतेच बाहेर पडलो होतो. तेव्हा त्याने त्याच्या एका प्लॅनमध्ये मला पार्टनर बनविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि व्हॅलेंटाइन डेला एका ‘यॉट’वर (बोटीवर) पार्टी आयोजित केली.
आम्ही गेटवेला एक ‘यॉट’ भाडय़ाने घेतली, ‘डीजे’ आणला. एका आइस्क्रीम आणि लिकर कंपनीला स्पॉन्सर्स म्हणून आणलं, पण व्हॅलेंटाइन डेला इतकी कॉम्पिटिशन होती की आम्ही कसेबसे फक्त तीन कपल पासेस विकू शकलो. पैसे आणि वेळ गमावण्याची मी मानसिक तयारी करून ठेवली होती. त्या तीन कपल्सबद्दल चिंता वाटत होती आणि स्पॉन्सर्सनीसुद्धा त्यांची पब्लिसिटी होतेय की नाही हे बघण्यासाठी माणसं पाठवली होती.
पण विक्रमला कसलीही भीती वाटत नव्हती. त्याने बेधडकपणे दुसरा प्लॅन बनवला. तो पार्टी आयोजित करणाऱ्या दुसऱ्या कंपनीकडे गेला. त्यांची पार्टी खूपच यशस्वी झाली होती. थोडय़ा चर्चेनंतर त्यांनी आमच्या तीन कपल्सना त्यांच्या पार्टीत घेतलं. स्पॉन्सर्सच्या माणसांनी त्यांचे बॅनर्स इथे दुसऱ्या पार्टीत लावले. त्या बदल्यात आम्हाला जे आइस्क्रीम आणि लिकर मिळाली त्याचा अर्धा भाग आम्ही या कंपनीला दिला आणि बाहेर जाऊन आइस्क्रीम आणि लिकर विक्रेत्यांना उरलेला ५० टक्के भाग विकला. त्या पैशातून आम्ही डीजेचा हिशेब पूर्ण केला आणि बोटीचे कॅन्सलेशन चार्जेसपण दिले. शेवटी सगळेचजण समाधानी झाले. मी आणि विक्रम तर सगळ्यात जास्त खूश होतो- आम्ही जे ठरवलं ते पूर्ण केलं आणि शिवाय नफाही मिळवला.
विक्रमने मला उठून, उभं राहून स्वत:ला सावरून परत बाईकवर बसून रेस पूर्ण करायला शिकवलं आणि ती रेस जिंकायलाही शिकवलं.
तुम्हाला बऱ्याच कठीण परिस्थितींना सामोरं जावं लागेल. परिस्थिती कशीही असू देत.. तुम्ही जिंकू शकता यावर विचार करा..
डॉमिनिक कोस्टाबीर
अनुवाद - यशोदा लाटकर
dominiccostabir@yahoo.com