Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

ये रिश्ता क्या कहलाता है..
स्टार प्लसवरून प्रसारित होणाऱ्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत पहिल्यापासून अक्षरा आणि वर्षांच्या मैत्रीवर भर दिलेला दिसतो. वर्षांचं लग्न अक्षराच्या भावाशी होतं आणि त्यांच्यात आणखी एक नातंदेखील निर्माण होतं, तरी त्या दोघींमधल्या मैत्रीला कुठे धक्का लागत नाही. समजदार, प्रगल्भ वर्षां आणि प्रत्येक गोष्टीत दुसऱ्यावर अवलंबून राहणारी, साधी-सरळ, लाडाकोडात वाढलेली अक्षरा या दोघी अगदी परस्पर पूरक आहेत. त्यांच्यातल्या मैत्रीचे, एकमेकींना समजून घेण्याचे अनेक लहान-मोठे प्रसंग मालिकेत आले आहेत.
वर्षां आणि तिचा भाऊ शौर्य यांच्या लग्नाला अक्षरा तिच्या वडिलांकडून परवानगी मिळते तर अक्षराचं लग्न मोडतं म्हणून

 

तिच्यावर तिचे आई-वडील नाराज होतात त्यांची नाराजी वर्षां दूर करते. अक्षराचा भाऊ लग्नानंतर वर्षांनं शिकू नये या मताचा असतो त्याचं मतपरिवर्तन करून दोघांत समेट घडवून आणण्याचे काम अक्षरा करते, रात्र-रात्र जागून वर्षां अक्षराकडून परीक्षेची तयारी करून घेते.. मैत्रीचं नातं काही फक्त चार क्षण एकत्र येऊन मजा-मस्ती करण्यासाठी नसतं तर एकमेकांची सुख-दु:ख वाटून घेऊन प्रत्येक क्षणी एकमेकांना साथ देण्यासाठी असतं हे मैत्रीचं नातं. जे या मालिकेत खूप छान फुलवलं आहे.
अक्षरा आणि वर्षां पडद्यावर तर एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी आहेत, पण पडद्यामागे त्यांचे नातं कसं आहे? विचारता हिना खान (अक्षरा) म्हणते..
‘खरं सांगायचं तर आम्हाला ऑफ स्क्रिन एकमेकींना समजून घ्यायला वेळच मिळत नाही. आमचं रात्रंदिवस शूटिंग सुरू असतं, त्यात गप्पा मारायला, धमाल करायला वेळ कुठून मिळणार!’
तर पूजा जोशी (वर्षां) म्हणते, ‘आमची जरी मैत्री नसली तरी हिना मला पहिल्या भेटीतच आवडली होती. तिचं जसं कॅरॅक्टर आहे, तशीच ती प्रत्यक्षात आहे, खूप शांत, जास्त कोणाच्या अध्यात ना मध्यात!’
‘हे तर मीही सांगेन..’ हिना म्हणते, ‘वर्षांचा स्वभावही काहीसा तिच्या कॅरॅक्टरसारखाच आहे. चुळबुळा. तिच्याबरोबर काम करायला मजा येते. कदाचित आम्ही एका वयाच्या पडतो म्हणून असेल, पण आमची कंफर्ट लेव्हल खूप छान आहे. एक मात्र आहे, आम्ही एकमेकींना पूजा आणि हिनापेक्षा वर्षां आणि अक्षरा म्हणून जास्त ओळखतो.’
त्यांची पहिली भेट कुठे झाली? सांगताना हिना म्हणते, ‘पहिल्या एपिसोडपासूनच आमची खूप दाट मैत्री दाखविल्यामुळे शूटिंगच्या पहिल्या दिवशी उदयपूरलाच आमची भेट झाली. तेव्हा तर एकमेकांशी बोलायला देखील वेळ नव्हता. अडीच दिवस सतत शूटिंग सुरू होतं. मंदिराच्या पायऱ्यावरचा शॉट होता तो, खोटं वाटेल, पण त्या अडीच दिवसांत इतक्यांदा पायऱ्या चढा-उतराव्या लागल्या होत्या की कोणाशी बोलायला, ओळखी करून घ्यायला अंगात त्राणच नव्हतं!
जेव्हा प्रत्यक्षातली ओळख नसते तेव्हा पडद्यावर अनेक वर्षांपासूनची मैत्री दाखवणं किती अवघड जातं? सांगताना पूजा म्हणते, ‘अवघड नाही जात, पण कंफर्ट लेव्हल कमी असते. पडद्यावर तर तुम्हाला असं दाखवायचं असतं की दोघी एकमेकींना खूप वर्षांपासून ओळखतायत. इतक्या ओळखीनंतर आपल्याला एकमेकांच्या प्रतिक्रिया माहिती असतात, पण इथे असं होत नाही. यालाच तर अ‍ॅक्टिंग म्हणायचं. आता शूटिंग सुरू होऊन इतके दिवस झाल्यावर आम्हाला वर्षां आणि अक्षरा म्हणून एकमेकींची ओळख झाली आहे. तेव्हा आता मुद्दाम अभिनय करावा लागत नाही, तर आपोआप प्रतिक्रिया उमटून जाते.’
मालिकेमध्ये वर्षां ही सर्वसाधारण घरातली, वडिलांचं छत्र नसलेली मुलगी असते तर अक्षरा श्रीमंत घरातली अतिशय लाडाकोडात वाढलेली. प्रत्यक्षात मात्र हिना आणि पूजा दोघींची कौटुंबिक पाश्र्वभूमी साधारण मध्यम वर्गातच मोडणारी आहे.
दिल्लीला राहणारी हिना मॅनेजमेंट ग्रॅज्युएशन करते आहे, एम. बी. ए. करून पुढे करिअर करण्याचा विचार करणाऱ्या हिनानं आपण कधी अभिनेत्री होऊ हा विचारही केला नव्हता. दिल्लीत ‘ये रिश्ता’च्या ऑडिशन्स सुरू होत्या. मैत्रिणींबरोबर गंमत म्हणून ती ऑडिशन द्यायला आली आणि तिला लीड रोलच मिळाला. इतकी चांगली संधी मिळतेय तर का सोडा म्हणून तिने मालिका स्वीकारली. अजूनही तिने याच क्षेत्रात कायम राहायचं की नाही याबद्दलचा ठाम निर्णय घेतलेला नाही.
तर उत्तरांचल येथील पूजाने युनिव्हर्सिटी लेव्हलवर नाटकातून वगैरे कामं केली होती. संस्कृतमध्ये एम. ए. पूर्ण केल्यावर ती अभिनेत्री म्हणून करिअर करण्यासाठी मुंबईत आली. इथे येऊन दोन वर्षे स्ट्रगल केल्यावर तिला पहिली मालिका मिळाली ती पृथ्वीवराज चौहान. यात तिने संयोगिताची भूमिका केली होती. त्यानंतर मेरा ससुराल, सुजातासारख्या दोन-चार मालिकाही तिने केल्या. रिश्तानं तिच्या करियरला एक निश्चित दिशा दिली आहे.
या दोघी पडद्यावर जशी मैत्री अनुभवतायत तशी प्रत्यक्षातली त्यांची कोणी मैत्रीण आहे विचारता दोघीही म्हणतात, ‘नाही..!’ हिना म्हणते, ‘आतापर्यंत माझं कॉलेज-अभ्यास सुरू होता आणि आता करियर, इतकी मैत्री करण्याइतका वेळच नाही मिळाला!’ हे उत्तर काही फारसं पटण्यासारखं नाही कारण मैत्रीसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही! पण हे ज्याचं त्याचं मत झालं.
तर पूजा म्हणते, ‘वर्षांला जसं अक्षराच्या आयुष्याविषयी खडान्खडा माहिती आहे तशी मला माझ्या कोणत्याही मैत्रिणीविषयी नाही. मुख्य म्हणजे इतकं कोणाच्या आयुष्यात डोकावून बघायचा माझा स्वभावच नाही.’
म्हणूनच या दोघींनाही या जीवाला जीव देणाऱ्या अक्षरा- वर्षांच्या नात्याचं अग्रूप वाटतं. पूजा म्हणते, ‘अशी मैत्री असणं ही खरोखरी भाग्याचीच गोष्ट. आपण कोणत्याही अडचणीत असलो तरी आपली मैत्रीण आपल्या पाठीशी आहे ही भावनाच किती दिलासा देणारी असते. आता अक्षराचं लग्न झाल्यावर वर्षां आपल्या मनातल्या गोष्टी कोणाला बोलून दाखवणार? या विचारानं अगदी रडवेली झालेली दाखवली आहे.’
एकमेकींची मैत्री स्पष्ट करणारं आतापर्यंतचं कोणतं दृश्य त्या दोघींना आवडलं आहे? सांगताना हिना म्हणते, ‘मला असं एखादं दृश्य नाही सांगता येणार. अगदी बारीक-सारीक गोष्टीतून त्या दोघींची मैत्री फुलते ते सगळंच मला खूप आवडतं. मग ते दोघींनी एकमेकींची काळजी घेणं असो की दोघींना एकत्र झोपायला मिळाल्यावर आता मनसोक्त गप्पा मारता येतील म्हणून होणारा आनंद असो!’ तर पूजा सांगते, ‘अक्षराच्या लग्नाच्या वेळी वर्षां नैतिकचे जूते लपवते ते ती नैतिकच्या मित्राला परत देताना नेक मागताना म्हणून आपल्या मैत्रिणीला कधी त्रास दु:ख सहन करावं लागणार नाही याची जबाबदारी घेण्याचं वचन मागते. हे दृश्य मला खूप आवडलं होतं. मैत्रीत स्वत:ला विसरून जाणं काय असतं हे मला या दृश्यानं शिकवलं!’
मनीषा सोमण
maneesha24april@rediffmail.com