Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

ओपन फोरम
दोन ऑगस्टला फ्रेंडशीप डे आहे. आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मित्र मिळत जातात. मैत्रीचं महत्त्व सगळ्यानाच असतं. रक्ताच्या नात्यापेक्षाही ही जु़ळून आलेला नाती जवळजवळ सगळ्यांनाच आपलीशी, हवीहवीशी वाटतात. यात ताण नसतो. कुरबुरी नसतात. असल्या तरी त्या क्षणिकच. फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने तरुणांनी व्यक्त केलेल्या मैत्रीबद्दलच्या आपल्या भावना..

हर्षल महानूर (इंजिनिअरिंग)
मैत्री म्हणजे नक्की काय हे कोणीच नाही सांगू शकणार. पण दोन मनांची वेव्हलेंग्थ जुळली की मग सगळे निकष गळून पडतात. कधी कधी खूप वर्ष एकमेकांना ओळखत असूनही आपण अनोळखीच राहतो तर कधी कधी काही क्षणांतच मैत्री गाढ होऊन जाते. तसं बघायला गेलं तर प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा व बंधनं असतात पण मैत्रीत असतो तो फक्त विश्वास आणि त्या विश्वासामुळेच आपण अगदी कुठलीही गोष्ट मित्रांबरोबर शेअर करतो.

वैभव मेकडे (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह)
जीवनातील प्रवासात मैत्री ही अशी एक नाव आहे जिथे आपल्याला अनेक मित्र भेटतात. काही थोडय़ा काळाने उतरुन जातात तर काही शेवटपर्यंत सोबत असतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोबत कितीही काळाची असली तरी मित्रांचं आपल्या जीवनातील महत्त्व कमी होत नाही. वेळप्रसंगी आपला कान पकडून आपल्या चुका दाखवणारे तर कधी आपल्या आनंदात सामील होऊन तो द्विगुणीत करणारे मित्रंच आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठं गिफ्ट असतात. तेच आपल्याला योग्य प्रकारे समजू शकतात आणि तोच मैत्रीचा खरा निकष ठरु शकतो.

यज्ञेश देवधर (बीएससी)
मैत्री हे एक असं नातं आहे की जिथे एकमेकांना गुणदोषांसकट स्वीकारलं जातं. एकमेकांवरचा गाढ विश्वास आणि प्रेम समजून घेण्याची वृत्ती आणि तेही कोणत्याही अपेक्षांविना मैत्रीचं नातं आणखी दृढ करतात. माझ्यामते मैत्रीमध्येच सगळ्या दु:खांचा शेवट आणि आनंदाची सुरुवात होते. माझ्यासाठी मैत्रीचा निकष म्हणजे अपेक्षांविना एकमेकांना सहज समजून घेणे.. जशी दुधात साखर विरघळते.

श्रुती विचारे (एमबीए)
जीवनातली इतर नाती आपण निवडू शकत नाही. पण आपले मित्र कसे असावेत हे ठरवू शकतो. आपल्याला मनापासून आवडलेल्या पटलेल्या लोकांशी आपण मैत्री वाढवू शकतो. आणि म्हणूनच मैत्रीचं नातं मला खूप तरल आणि खास वाटतं. आपल्याला जरी चार-पाचच जवळचे मित्र असले तरी चालतील पण ते जवळचे असावेत. एकमेकांना नीट समजून घेता आलं तर मग कोणत्याच स्पष्टीकरणाची अथवा निकषांची गरज भासत नाही.

पूजा सेजपाल
(पोस्ट ग्रॅज्युएशन अ‍ॅडव्हर्टायझिंग)

माझ्यासाठी मैत्री म्हणजे शेअरिंग, ज्या क्षणी मी एखादया व्यक्तीबरोबर जीवनातली सुख-दु:खं शेअर करायला लागते तेव्हाच आमच्यातील मैत्रीची वीण घट्ट होत जाते. बाकीच्यांचं माहीत नाही पण माझा असा विश्वास आहे की मैत्री हे तुमच्या वाईट किंवा बदलत्या मूडवरचं औषध आहे. निरपेक्षपणाचं निखळ उदाहरण म्हणजे मैत्री.