Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

राखीचे ‘स्वयंवर’ गोत्यात?
जयपूर, २९ जुलै/पीटीआय

आयटमगर्ल राखी सावंतने स्वयंवराचा बेत आखून विवाहाचा घाट घातला, तेव्हाच सर्वाच्या भुवया उंचावल्या होत्या. आता स्वयंवरद्वारे राखीचा ‘पतीशोध’ अंतिम टप्प्यात आला आहे. २ ऑगस्टला राखीचा विवाह होणार आहे, तोही ‘लाइव्ह’. परंतु जयपूर कोर्टाने पोलिसांना राखी सावंत आणि

 

अन्य पाचजणांवर ‘एफआयआर’ दाखल करण्यास सांगितल्यामुळे तिचे स्वयंवर गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. राखी सावंत, अभिनेता रवी किशन आणि एका आघाडीच्या चॅनेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर विवाहावर आधारित रिअ‍ॅलिटी शोच्या संकल्पनेचे चौर्यकर्म केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. न्याय दंडाधिकारी शिल्पा समीर यांनी करनी नगर पोलीस ठाण्याला सावंतसह सहाजणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जयपूरस्थित लेखक गौरव तिवारीची स्वयंवरावर आधारित संकल्पना चोरून कॉपीराइट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.