Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

व्यापार - उद्योग

मुंबईत परवडण्याजोगी घरे बांधण्यासाठी विकासकांना शासनाकडून शक्य ते सर्व सहकार्य - मुख्यमंत्री
व्यापार प्रतिनिधी: बांधकाम व्यावसायिकांनी सध्याच्या खडतर परिस्थितीत यशस्वीपणे तग धरला. महाराष्ट्र शासनानेही या उद्योगाला स्थिरता प्रदान करण्यासाठी भरघोस प्रयत्न केले. मात्र विकसकांनी मुंबईकरांना परवडण्याजोगी घरे प्रदान करण्यावर अधिकाधिक गुंतवणूक करावी, सरकारकडून शक्य ते सर्व सहकार्य देण्याची हमी दिली जाईल, असे आश्वासक उद्गार राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईतील बहुतांश बडय़ा बांधकाम व्यावसायिकांची उपस्थिती लाभलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या एका कार्यक्रमात बोलताना काढले.

‘यशस्वी उद्योजकाकडे व्यावसायिक कौशल्य हवे’
पुणे, ३० जुलै/ प्रतिनिधी

तांत्रिक कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्य या यशस्वी उद्योगाच्या दोन समांतर बाजू आहेत. यशस्वी उद्योजक होण्याकरिता यांची कास धरणे अतिशय गरजेचे आहे. त्याचबरोबर शिस्त, विशिष्ट पद्धतीचा अवलंब, ज्ञानाची भूक यांचा अवलंब हेही यशस्वी उद्योजकाचे गुण आहेत. यांचे पालन उद्योजकाने केले तर ‘ते उद्योगात निश्चित यशस्वी होतील’ असे उद्गार निर्लेप उद्योगसमूहाचे अध्यक्ष राम भोगले यांनी काढले.

रक्षाबंधनानिमित्त ‘एक्स्प्रेस सेवा’
व्यापार प्रतिनिधी: रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ब्ल्यू डार्ट आणि डीएचएलने ‘राखी एक्स्प्रेस’ सेवा आणली असून यामुळे आता बहीण आणि भाऊ यांच्यातील अंतर कितीही असले तरी सामान्यत: पावसाळ्यात दळणवळणात येणाऱ्या समस्यांवर वेळेवर घरपोच डिलिव्हरी देण्याची हमी उभय कंपन्यांनी दिली आहे. राखी एक्स्प्रेस ही ब्ल्यू डार्ट आणि डीएचएलतर्फे करण्यात आलेली एक विशेष सुविधा असून ज्यामध्ये या अनोख्या सणाच्या निमित्ताने ग्राहकांकरता विशेष सूटही देण्यात आली आहे. राखी एक्स्प्रेसच्या माध्यमातून आता बहिणी आपल्या भावांना ब्ल्यू डार्टच्या विशेष नेटवर्कचा लाभ घेत देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात वेळेत आणि सुरक्षित डिलिव्हरी पाठवू शकतील. राखी पाठवण्यासाठी ब्ल्यू डार्टने दोन पर्याय उपलब्ध केले आहेत. आता बहिणी आपल्या भावांना राखी आणि मंगलतिलक एका विशेष रूपाने तयार केलेल्या सुशोभित ‘राखी बॉक्स’मध्ये घालून पाठवू शकतात. या बॉक्समध्ये राखीचे महत्त्व विषद करणारे एक कार्ड असेल ज्यावर बहिणी आपले संदेशही लिहून पाठवू शकतील. याची किंमत रु. २००/- आहे.

‘अ‍ॅडफॅक्टर्स पीआर’ची ‘आयपीओ नर्चर’ सेवा
व्यापार प्रतिनिधी: अ‍ॅडफॅक्टर्स पीआर कंपनीने ‘आयपीओ नर्चर’ नावाची एक खास सेवा सुरू केली आहे. ज्या कंपन्या आगामी काळात खुल्या समभाग विक्रीच्या माध्यमातून (आयपीओ) भांडवल उभारू इच्छित आहेत अशा कंपन्यांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.आयपीओ नर्चर हा आयपीओ प्रक्रियेतून अधिकाधिक भांडवल उभारण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला एक कार्यक्रम आहे. कंपनीची प्रतिष्ठा आणि प्रतिमा यात वाढ करून वित्तीयसेवा कंपन्यांवर सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी ‘आयपीओ नर्चर’ सेवा सुरू करण्यात आली आहे. कंपनी व्यवस्थापनास आयपीओ प्रक्रियेतील आव्हाने पेलण्याचे कौशल्य प्रदान करण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा आणि ओळख कार्यक्रम आयोजित करणे याचा आयपीओ नर्चरमध्ये समावेश आहे, ही माहिती अ‍ॅडफॅक्टर्स पीआरचे व्यवस्थापकीय संचालक मदन बहाल यांनी दिली. आयपीओ नर्चर ही सेवा जे प्रवर्तक व व्यवस्थापक भांडवलबाजारातून प्रथमच कोणत्याही आकाराचे भांडवल उभारण्यासाठी आयपीओ आखत असतात त्यांच्यासाठी फारच उपयुक्त आहे. अनेक कंपन्या पूर्ण तयारीविना बाजारात जाऊन आपले मूल्य कमी करून घेत असतात. त्याचप्रमाणे ज्या कंपन्या खासगी गुंतवणूक, विलिनीकरण व संपादन, पुनर्रचना असे आयपीओसदृश कार्यक्रम आखत असतात त्यांच्यासाठीसुद्धा ही सेवा उपयुक्त आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिर्डीतील साईबाबा संस्थानमध्ये सर्वात मोठी सौर ऊर्जाप्रणाली
व्यापार प्रतिनिधी: सौर औष्णिक ऊर्जाप्रणाली बाजारपेठेत आघाडीवर असलेल्या ‘गढिया सोलर एनर्जी सिस्टिम्स या कंपनीने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टसाठी जगातील सर्वात मोठी सोलर पॅराबोलिक कॉन्संट्रेटेड टेक्नॉलॉजी सिस्टिम उत्पादित आणि कार्यान्वित करून दिली आहे. साईबाबा संस्थानमध्ये नव्याने अद्ययावत केलेल्या या प्रणालीमुळे दिवसाला ५० हजार भाविकांसाठी भोजन तयार होऊ शकते. कंपनीला ही प्रणाली स्थापित व कार्यान्वित करण्यासाठी सात महिने लागले. या प्रणालीचे आयुष्य २५ वर्षे आहे, ही माहिती ‘गढिया सोलर’चे व्यवस्थापकीय संचालक बादल शहा यांनी दिली. जगातील सर्वात मोठय़ा या सौर स्वयंपाक प्रणालीचे उद्घाटन केंद्रीय नूतन व पुनर्वापरक्षम ऊर्जामंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या हस्ते शिर्डीत होणार आहे.

मास्टेकला १४१ कोटींचा नफा
व्यापार प्रतिनिधी: मास्टेक लिमिटेडच्या जून २००९ अखेर संपलेल्या तिमाहीत उत्पन्न २३३ कोटी रुपयांवरून २१४ कोटी रुपयांवर आले आहे. याच तिमाहीत कंपनीच्या करोत्तर निव्वळ नफ्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली असून, तो ३३.४ कोटी रुपयांवरून ३५.३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.जूनअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न पाच टक्क्यांनी वाढून ९६५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीच्या नफ्यात १२ टक्के वाढ नोंदली गेली असून, १४१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. संचालक मंडळाने प्रति शेअर ७.५० रुपये अंतिम लाभांश जाहीर केला असून, संपूर्ण वर्षासाठी लाभांश प्रति शेअर दहा रुपयांवर पोहोचला आहे. तसेच सलग सतरा वर्षे कंपनी लाभांश देत आहे. जूनअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीने विमा क्षेत्रातील दोन नवे ग्राहक जोडले आहेत. कंपनीकडे २४० कोटी रुपयांची रोकड आहे, असे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुधाकर राम यांनी सांगितले.

एसबीआय म्युच्युअल फंडाचा लाभांश
व्यापार प्रतिनिधी: एस.बी.आय. म्युच्युअल फंडातर्फे मॅग्नम इमर्जिग बिझनेस फंडावर २५ टक्के लाभांशाची घोषणा करण्यात आली आहे. लाभांशाची रेकॉर्ड तारीख ३० जुलै २००९ असणार आहे व दहा रुपयांच्या एका युनिटमागे रु. २.५० पैसे लाभांश मिळणार असून, तो संपूर्णपणे करमुक्त असेल. २४ जुलै २००९ रोजी योजनेच्या ‘लाभांश’ पर्यायाचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एन.ए.व्ही) १३.९१ रुपये होते. लाभांश वाटपानंतर हे मूल्य २.५० पैशांनी कमी होईल.

शेल हेलिक्स अल्ट्राची योजना
व्यापार प्रतिनिधी: फेरारी रेस कारमध्ये बसून फेरफटका मारण्याचा अनुभव घेण्याची आयुष्यात एकदाच येणारी संधी शेल हेलिक्स अल्ट्रातर्फे त्यांच्या चाहत्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. फेरारीच्या विश्वात नेमके काय असेल, ‘मॉडर्न फॉम्र्युला वन कार’ कशी आहे, याची उत्सुकता प्रत्येक चाहत्यांना असणे अगदी स्वाभाविक आहे. जगभरात सुमारे ६० कोटींपेक्षा अधिक ‘फॉम्र्युला वन’चे चाहते आहेत. प्रत्येक ग्रॅण्ड-प्रिक्समध्ये ‘फेरारी फॉम्र्युला वन कार’वर फक्त ६० जण काम करू शकतात. २००९ साली फेरारीचे तांत्रिक भागीदार व शेल हेलिक्स अल्ट्राचे उत्पादक असलेले शेल कंपनीने ‘जेन्युएन फेरारी फॉम्र्युला वन कार’वर फेरारी मेकॅनिकसमवेत काम करण्याची ही असाधारण संधी उपलब्ध करून दिली आहे.

नोकियातर्फे ६७०० क्लासिक व ६३०३ क्लासिक बाजारात
व्यापार प्रतिनिधी: नोकियातर्फे नोकिया ६७०० क्लासिक व नोकिया ६३०३ क्लासिक हे स्टायलिश हँडसेट्स बाजारात सादर करण्यात आले आहेत. नोकिया ६७०० क्लासिकमध्ये ५ मेगापिक्सल कॅमेरा, हायस्पीड डेटा अ‍ॅक्सेस, जीपीएस नेव्हिगेशन, एफएम रेडिओ, एमपी ३ प्लेअर अशा सुविधांचा समावेश आहे. याची किंमत रु. १४,०००/- आहे. नोकिया ६३०३ क्लासिकमध्ये आकर्षक रचनेचा वापर केला गेला असून, ३.२ मेगापिक्सल कॅमेरा, ८ एक्स डिजिटल झूम ऑटो फोकस, प्रीलोडेड नोकिया मॅप्स, एफएम रेडिओ व एमपी ३ प्लेअर यांसारख्या सुविधा आहेत. याची किंमत रु. ८,०००/- आहे.

‘सॅमसंग’ची महायोजना
व्यापार प्रतिनिधी: सॅमसंग इंडियाने जुलै महिन्यासाठी आपल्या फ्लॅट पॅनेल टीव्हीवर विक्रीवृद्धीची महायोजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत जे ग्राहक सॅमसंगचा कोणताही नवा एलईडी टीव्ही खरेदी करतील, त्यांना त्यासोबत सॅमसंगचा २२ इंची एलसीडी टीव्ही (एलए२२ बी ४५०) मोफत मिळणार आहे. सॅमसंगचे प्रगत ६००० व ७००० या मालिकांतील हाय डेफिनिशन एलईडी टीव्ही ४० इंची व ४६ इंची या स्क्रीन आकारात उपलब्ध आहेत. याखेरीज सॅमसंगने एअरटेल कंपनीशी व्यूहात्मक सहयोग केला असून, त्यानुसार सॅमसंगचे एलईडी, एलसीडी अथवा प्लाझ्मा टीव्ही खरेदी करणाऱ्यांना एअरटेलचे १७५० रुपये किमतीचे डिजिटल टीव्ही कनेक्शन मोफत दिले जाणार आहे. त्यात ८२ वाहिन्यांच्या सुपर व्हॅल्यू पॅकची तीन महिन्यांची वर्गणीही मोफत आहे. ही विक्रीवृद्धी महायोजना भारतभर येत्या ३१ जुलैपर्यंत सुरू आहे.

सिल्व्हर लाईनचे अनोखे टी-शर्ट
व्यापार प्रतिनिधी: संत ज्ञानेश्वरांपासून गझलकार सुरेश भट यांच्यापर्यंत विविध कवींचे समृद्ध काव्य आता टी-शर्टवरही वाचायला मिळणार आहे. कवितेची अस्सल मराठमोळी अक्षरलेणी लेऊन सजलेले टी-शर्ट्स ‘सिल्व्हर लाईन’तर्फे बाजारात आले आहेत. संत ज्ञानेश्वरांपासून सुरेश भट यांच्यापर्यंत आणि अलीकडच्या अशोक बागवे यांच्यापासून अभिजित पानसे या कवींपर्यंत अनेक कवींच्या उत्तमोत्तम काव्यरचना या टी-शर्टवरून झळकणार आहेत, अशी माहिती सिल्व्हर लाईनचे संचालक दिलीप सोमवंशी, नूतन सोमवंशी यांनी दिली.

‘सुवर्णस्पर्श’चे पुण्यात दालन
व्यापार प्रतिनिधी: सुवर्णस्पर्शच्या पुण्यातील दालनाचे उद्घाटन अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या हस्ते झाले. सुवर्णस्पर्शच्या एकूण पाच शाखा असून ३ शाखा मुंबईत, ४ थी शाखा जळगाव व ५ वी शाखा पुण्यात सुरू करण्यात आली आहे.सर्वसामान्य जनतेला सोने घेणे परवडत नसल्यामुळे कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त सोन्यासारखे, कमी वजनाचे सोन्याचे दागिने उपलब्ध व्हावेत, यासाठी पुण्यात ‘सुवर्णस्पर्श’ सुरू करण्यात आले असल्याची माहिती सुवर्णस्पर्श जेम्स अँड ज्वेलरी प्रश्न. लि.चे संचालक राजेश आचार्य व राजू पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बिर्लाच्या फ्रंटलाईन इक्विटी फंडाची भरीव कामगिरी
व्यापार प्रतिनिधी: बिर्ला सन लाईफ फ्रंटलाईन इक्विटी फंडाने आपल्या वैविध्यपूर्ण गुंतवणुकीच्या आधारे १८ टक्के परतावा मिळवून दिला आहे. फंड सुरू झाल्यापासून एकूण २४० टक्के लाभांश देण्यात आला आहे. सात वर्षात या फंडाद्वारे सहा लाभांश जाहीर करण्यात आले आहेत. बिर्ला सन लाईफ फ्रंट लाईन इक्विटी फंडाच्या या कामगिरीचे श्रेय त्यातील पोर्टफोलिओचे वितरण, समभाग निवड आणि बाजारात योग्य वेळी करण्यात आलेल्या व्यवहारास जाते. गेल्या काही काळात फंड हाऊसने समभागातील गुंतवणूक वाढवून आपल्या हातातील रोखीचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांवरून ६ ते ७ टक्क्यांपर्यंत आणले आहे, असे बीएसएलएमएफच्या इक्विटी विभागाचे सहप्रमुख महेश पाटील यांनी सांगितले.

इजिडिल्स व ‘मिलेनियर बेबी’मध्ये करार
व्यापार प्रतिनिधी: इजिडिल्स सेल्स अँड सव्‍‌र्हिसेस प्रश्न. लि. व मिलिनियर बेबी फायनान्शिअल अ‍ॅडव्हायजर प्रश्न. लि. या दोन कंपन्यांमध्ये नुकताच करार झाला. इजिडिल्स ही कंपनी ऑनलाईन मार्केटिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. कंपनी आपल्या इतर प्रश्नॅडक्टसोबत आता मिलिनिअर बेबी या कंपनीद्वारे चालविण्यात येणारा ‘मिलिनिअर बेबी कल्ब’ पॉलिसी हे एक प्रश्नॅडक्ट विक्री करणार आहे.

रिलायन्स मोबाईलचा ‘मान्सून ग्राहक मेळा’
व्यापार प्रतिनिधी:रिलायन्स मोबाईलने महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांसाठी मान्सूननिमित्त योजना जाहीर केली आहे. रिलायन्स मोबाईल ग्राहक सेवा मेळय़ात ग्राहकांसाठी स्टोअरमध्ये (नवीन कनेक्शन / हॅण्डसेट अपग्रेडेशन) खरेदी केल्या जाणाऱ्या प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. या सेवा मेळय़ामध्ये हायस्पीड डाटा कार्ड जीएसएम आण ब्लॅक बेरी यासारखी सर्व नवीन उत्पादने सादर केली जाणार आहेत. कोणत्याही ग्राहकांच्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी तसेच नवीन उत्पादने आणि सेवा यांची ग्राहकांना सविस्तर माहिती देणे यासाठी रिलायन्स मोबाईल सव्‍‌र्हिस कॅम्पचे खास आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र बँकेला जूनअखेर १०१ कोटींचा निव्वळ नफा
पुणे, ३० जुलै/ प्रतिनिधी

महाराष्ट्र बँकेला या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जून २००९ अखेर १०१.७९ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत बँकेला ४६.६३ कोटींचा निव्वळ नफा झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बँकेच्या निव्वळ नफ्यात ११८.३० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. ही माहिती बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अ‍ॅलन सी ए परेरा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. परेरा म्हणाले की, एप्रिल ते जून या तिमाहीत बँकेने सर्वच आघाडीवर चांगली कामगिरी केली आहे. या तिमाहीत बँकेने एकूण ८५ हजार कोटींची उलाढाल केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये १९.२४ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. ठेवींमध्ये २२ टक्क्य़ांनी वाढ होऊन त्या ५१ हजार ३८५ कोटी रुपयांवर गेल्या असून या काळात बँकेने ३४ हजार ५७८ कोटींचा कर्जव्यवहार केला आहे. सध्या बँकेच्या देशभरात १४२८ शाखा कार्यरत असून मार्च २०१० अखेर ही संख्या १५०० पर्यंत नेण्याची बँकेची योजना आहे असे सांगून परेरा म्हणाले की, कर्मचाऱ्यांची संख्या या आर्थिक वर्षात सुमारे तीनशेने वाढविण्यात येणार आहे. आगामी काळात बँकेला २० ते २२ टक्के विकास दराने वाढ अपेक्षित आहे.

‘अ‍ॅडफॅक्टर्स’ची ‘आयपीओ नर्चर’ सेवा
पुणे, ३० जुलै/ प्रतिनिधी
अ‍ॅडफॅक्टर्स पीआर कंपनीने ‘आयपीओ नर्चर’ नावाची एक खास सेवा सुरू केली आहे. ज्या कंपन्या आगामी काळात खुल्या समभाग विक्रीच्या माध्यमातून (आयपीओ) भांडवल उभारू इच्छित आहेत अशा कंपन्यांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. आयपीओ नर्चर हा आयपीओ प्रक्रियेतून अधिकाधिक भांडवल उभारण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला एक कार्यक्रम आहे. कंपनीची प्रतिष्ठा आणि प्रतिमा यात वाढ करून वित्तीयसेवा कंपन्यांवर सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी ‘आयपीओ नर्चर’ सेवा सुरु करण्यात आली आहे. कंपनी व्यवस्थापनास आयपीओ प्रक्रियेतील आव्हाने पेलण्याचे कौशल्य प्रदान करण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा आणि ओळख कार्यक्रम आयोजित करणे याचा आयपीओ नर्चरमध्ये समावेश आहे, ही माहिती अ‍ॅडफॅक्टर्स पीआरचे व्यवस्थापकीय संचालक मदन बहाल यांनी दिली. आयपीओ नर्चर ही सेवा जे प्रवर्तक व व्यवस्थापक भांडवलबाजारातून प्रथमच कोणत्याही आकाराचे भांडवल उभारण्यासाठी आयपीओ आखत असतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे.

‘पीसीईआरएफ’ तर्फे चर्चासत्राचे आयोजन
पुणे, ३० जुलै/ प्रतिनिधी
पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रीसर्च फाऊंडेशन (पीसीईआरएफ) तर्फे वेस्ट बस्टर्स या माहितीपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २ ऑगस्ट रोजी डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कर्वेनगर येथे आयोजित सदर कार्यक्रमामध्ये बांधकाम क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या घन व इतर कचऱ्याची विल्हेवाट व पुनर्वापर करण्याविषयी विशेषत्वाने माहिती देण्यात येणार आहे. ही माहिती मानद नरेन कोठारी व कार्यकारी समितीचे सभासद आणि श्रीकांत निवसरकर यांनी दिली.