Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

‘राष्ट्रवादी’ कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न निष्फळ
राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान जीर्णोध्दाराकडे दुर्लक्ष
कोल्हापूर, ३० जुलै / प्रतिनिधी
कोल्हापुरात आल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांचे नांव घेणाऱ्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या जीर्णोध्दाराकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जयकुमार शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरच अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्मदहन करण्याचा केलेला प्रयत्न बंदोबस्तावरील पोलिसांनी हाणून पाडला.

कोल्हापूर, हातकणंगलेच्या सर्व मतदारसंघांत डावी आघाडी समर्थपणे उतरेल- एन. डी. पाटील
कोल्हापूर, ३० जुलै / विशेष प्रतिनिधी
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप या दोन्ही आघाडय़ांनी राज्यात भांडवलदार धार्जिणी धोरणे राबवून महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे वाटोळे केले आहे. त्यांच्या भांडवलधार धार्जिण्या धोरणामुळेच टाटांसारखे भांडवलदार ५१ हजार कोटी रुपयांची परदेशी कंपनी विकत घेण्याइतपत सामथ्र्यवान होताना राज्यात ४० हजार शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या.

शेतकरी जगायचा असेल तर काँग्रेसचे पतन आवश्यक- पाशा पटेल
सांगली, ३० जुलै / प्रतिनिधी
शेतकऱ्यांना जगवायचे असेल, तर काँग्रेसचे पतन करावे लागेल. कारण, काँग्रेसचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरणच आहे. देशातील जनता गरीब व लाचार ठेवण्याचे कारस्थान काँग्रेस करत असून जनतेचा विकास झाला, तर खुर्ची धोक्यात येईल, अशी काँग्रेसची धारणा असल्याची टीका आमदार पाशा पटेल यांनी केली. भारतीय जनता पार्टीच्या सांगली येथील शेतकरी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. येथील भावे नाटय़मंदिरात झालेल्या मेळाव्यास आमदार मधु चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष संभाजी पवार, दीपक शिंदे- म्हैसाळकर, जिल्हाध्यक्ष बाबा कदम, राजाराम गरूड, नगरसेवक पृथ्वीराज पवार, मकरंद देशपांडे, प्रदीप वाले, श्रीकांत शिंदे, उपमहापौर शेखर इनामदार, युवराज बावडेकर उपस्थित होते.

शिवसैनिकांचा कोल्हापुरात रास्ता रोको
कोल्हापूर, ३० जुलै / प्रतिनिधी

ताराराणी चौक ते तावडे हॉटेल या दरम्यानच्या रस्त्यावर बुधवारी एकाच दिवशी झालेल्या दोन अपघातात दोन युवक वाहनाच्या चाकाखाली येवून ठार झाल्यानंतर रस्ते विकास महामंडळाच्या कामामुळे मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी आज संतप्त शिवसैनिकांनी ताराराणी चौकात रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांच्यासमोर आलेल्या रस्ते विकास महामंडळाच्या एका अभियंत्याकडून बुधवारच्या अपघाताबद्दल थंड प्रतिक्रिया आली म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे या अभियंत्याच्या अंगावर बूट घेवून धावून गेले. फिरोज चांदसाब कवठेकर आणि विनायक दिलीप वाघमारे या दोन युवकांचा बुधवारी के.एम.टी. आणि मालट्रकखाली सापडून मृत्यू झाला.

आणखी एका तोतया तहसीलदाराच्या अटकेने महसूल यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा पंचनामा
माजी वार्ताहरालाही अटक

राधानगरी, ३० जुलै / वार्ताहर

तहसीलदारांचे शिक्के चोरून बनावट ओळखपत्रे देणाऱ्या अनिल महीपती पाटील (रा.चंद्रे) या एका दैनिकाच्या माजी वार्ताहराला राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे. तहसील कचेरीतील अनागोंदीचा फायदा घेऊन पैसे उकळणारा दुसरा तोतया तहसीलदार पोलिसांच्या जाळय़ात सापडला आहे. राधानगरी तहसील कचेरीतील अनागोंदी कारभार टीकेचे लक्ष्य बनला आहे.

महापालिकेचा प्रश्नरूप विकास आराखडा फेरबदलासह प्रसिद्ध करणार
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे उपमहापौरांकडून स्वागत
सांगली, ३० जुलै / प्रतिनिधी
महापालिकेच्या प्रश्नरूप विकास आराखडय़ातील फेरबदलासह आराखडा नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे उपमहापौर शेखर इनामदार यांनी स्वागत केले असून या आराखडय़ावर नागरिकांना हरकती घेता याव्यात. तसेच ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, तो दूर करण्यात यावा, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे इनामदार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

फवारणीचे औषध पोटात गेल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू
गडिहग्लज, ३० जुलै/वार्ताहर
उसावर फवारणी करताना विषारी औषध पोटात गेल्याने बेळगुंदी (ता.गडिहग्लज) येथील शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रकाश बाबुराव पाडले (वय १६) असे त्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, प्रकाश हा गडिहग्लज शहरातील जागृती प्रशालेमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता. काल सायंकाळी शाळा सुटल्यानंतर तो आपल्या शेतातील उसावर माव्याचे औषध फवारणी करण्यासाठी गेला होता. शेताकडून सायंकाळी सात वाजता आल्यानंतर घाईगडबडीने हात स्वच्छ न धुता त्याने जेवण केले. गावातील गणेशोत्सव मंडळाची हनुमान मंदिरामध्ये बैठक होती. त्या ठिकाणी प्रकाश गेला असता त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तेथेच त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास हे.कॉ. प्रकाश देसाई करीत आहेत.

सांगलीतही स्वाइन-फ्लू चा रुग्ण
सांगली, ३० जुलै / प्रतिनिधी

सांगलीत स्वाईन फ्ल्यूचा संशयास्पद रूग्ण आढळल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ माजली आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वाईन फ्ल्यू नसल्याचे सांगितले असून नागरिकांना घाबरून न जाता दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. सांगली येथील एक प्रश्नध्यापक महिला केरळ एका शिबिरासाठी गेल्या होत्या. त्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यापिका असल्यामुळे त्यांना स्वाईन फ्ल्यूची लक्षणे जाणवताच त्या शासकीय रूग्णालयात दाखल झाल्या.

बार्शीत उद्यापासून मोफत तांत्रिक प्रशिक्षण
सोलापूर, ३० जुलै/प्रतिनिधी
जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या वतीने येत्या १ ऑगस्टपासून बार्शी येथे अनुसूचित जातींसाठी आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी मोफत तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात सर्वसाधारण प्रवर्गासाठी डी.टी.पी., टॅली, बिल्डिंग मेन्टेनन्स हे प्रशिक्षण व अनुसूचित प्रवर्गासाठी ऑटो रिपेअरिंग व सव्‍‌र्हिसिंग या तांत्रिक विषयाचे प्रश्नत्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध कर्जयोजना, उद्योगाच्या संधी, बाजारपेठ, विक्रीकौशल्य, ग्राहक सेवा, व्यवस्थापन, बँकेची भूमिका आदी विषयांची माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी उमेदवाराचे शिक्षण किमान आठवी उत्तीर्ण व वय १८ ते २५ असणे आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिका, रहिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे, एम्प्लॉयमेंट प्रमाणपत्र, दोन छायाचित्रे आवश्यक आहेत. प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण करणाऱ्यास प्रमाणपत्र व विद्यावेतन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी संतोष दळवे (मोबाईल-९७६६१७९४१७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक विनायक कांबळे यांनी केले आहे.

कोल्हापूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अध्यक्षपदी प्रश्नचार्य अमरसिंह राणे यांची बिनविरोध फेरनिवड
कोल्हापूर, ३० जुलै / विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षपदी प्रश्नचार्य अमरसिंह राणे यांची बिनविरोध फेरनिवड झाली. उपाध्यक्षपदी साजिद हुदली यांची, तर सचिवपदी सुनील कुलकर्णी यांचीही बिनविरोध फेरनिवड झाली. कोल्हापूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विश्वस्त मंडळाची बैठक नुकतीच झाली. या वेळी ही निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांची नावे ज्येष्ठ विश्वस्त, शिक्षणतज्ज्ञ सी. डी. जोशी यांनी सुचविली, तर अनुमोदन माजी अध्यक्ष उद्योगपती दादासाहेब चौगुले यांनी दिले. बैठक खेळीमेळीच्या वातावरणात झाली. बैठकीला विश्वस्त सचिन मेनन, भरत पाटील, शिल्पजा पुंगावकर-कनगुडकर उपस्थित होत्या.केआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ. व्ही. ए. रायकर आणि इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रीसर्चचे संचालक डॉ. सुहास सहस्रबुद्धे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

किसन वीर कारखाना कार्यस्थळावर आज शेतकरी कार्यशाळा
सातारा, ३० जुलै / प्रतिनिधी
उद्या (शुक्रवार ३१ जुलै) रोजी सकाळी ९.३० वा. किसन वीर साखर कारखाना कार्यस्थळावर र्सवकष ऊसउत्पादकता वाढ योजनेंतर्गत कारखाना व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ठिबक सिंचन संच व एकरी १०० मे. टन ऊसउत्पादन शेतकरी कार्यशाळेचे आयोजन केले असून, या कार्यशाळेत योजनेत समाविष्ट असलेले शेतकरी उपस्थित राहणार असून, या कार्यशाळेस वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट, पुणे यांचे शास्त्रज्ञ व मध्यवर्ती ऊससंशोधन केंद्र पाडेगाव येथील ऊसविशेषतज्ज्ञ हजर राहणार असून कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अधीक्षक कृषी अधिकारीपदी नुकतेच हजर झालेले विकास पाटील यांचा सत्कार व महावीर जंगटे अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा यांची पुणे विभागात बदली झाल्याने निरोप समारंभ आयोजित केला आहे. या कार्यशाळेस कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे.

प्रश्नथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा १३ ऑगस्टला
सांगली, ३० जुलै / प्रतिनिधी
प्रश्नथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा दि. १३ ऑगस्ट रोजी होत आहे. गेले काही दिवस शिक्षक बँकेत सहय़ांच्या अधिकारावरून बराच गोंधळ निर्माण झाला होता. प्रश्नथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा ही कायमच चर्चेत राहिली आहे. अवघ्या पाच ते दहा मिनिटांत सत्ताधारी व विरोधकांत हमरातुमरी होऊन ही सभा गुंडाळली जाते, असा प्रघात आहे. प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा डाव विरोधकांनी टाकला होता. सत्ताधारी गटातील फुटीर संचालकांना हाताशी धरून संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्षक बँकेचे अध्यक्ष राजकुमार पाटील व उपाध्यक्ष तानाजी जेडगे यांचे सहय़ांचे अधिकार काढून घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात सर्वसाधारण सभा घेणे अनिवार्य असल्याने राजकुमार पाटील यांनी या सर्वसाधारण सभेची नोटीस प्रसिद्ध केली आहे. सांगली येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता ही सर्वसाधारण सभा होणार आहे.

सांगोल्यातील कॉम्पुटर इन्स्टिटय़ूटचे आज उदघाटन
सांगोला, ३० जुलै / वार्ताहर
जमिया सिद्दीकीया फैनानुल उलुम या संस्थेच्या वतीने कॉम्प्युटर इन्स्टिटय़ुट या शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन कामगार मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते शुक्रवार ३१ जुलै रोजी सांगोला येथे सायंकाळी ७ वाजता करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष रफिक नदाफ हे भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून धर्मगुरु सय्यद मोहम्मद मुख्तार अहमद रजा, अलवी मौलाना असीबुद्दीन, मौवानै सिराज अहमद राही बस्तवी आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मौलाना खान यांनी दिली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार रशिदभाई इनामदार, दाजी सल्लावदीन नदाफ , रहमान बागवान, शौकत खतीब, सय्यद महंमद इनुस आदी पदाधिकारी व मुस्लिम कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

इस्लामपूर तालुका वाचनालयाच्या अध्यक्षपदी दीनानाथ लाड
इस्लामपूर, ३० जुलै / वार्ताहर
इस्लामपूर शहरातील सार्वजनिक तालुका वाचनालयाच्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीनानाथ मंगेश लाड यांची निवड करण्यात आली आहे.आगामी दोन वर्षासाठी निवडण्यात आलेल्या या कार्यकारिणीचे उपाध्यक्ष म्हणून विलासराव सखाराम खांबे, कार्यवाह म्हणून संजय जयंत भागवत, तर सहकार्यवाह म्हणून रमेश परिसनाथ शेटे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. श्रीमती भारती सुरेंद्र उमराणी, डॉ. दिगंबर गोपाळ वैद्य, अरविंद रामचंद्र कुलकर्णी, संजय तुकाराम ढोबळे, शंकर वसंत नाबर व प्रश्न. श्रीमती सीमा तुषार भूतकर यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणी सदस्यांचे संस्थेचे विश्वस्त नरेंद्र राघवेंद्र मंद्रुपकर यांनी अभिनंदन केले.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज
वाडा, ३० जुलै / वार्ताहर
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षकि सर्वसाधारण सभा उद्या (शुक्रवार ३१ जुलै) रोजी राजगुरुनगर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सचिव सतीश चांभारे यांनी दिली.
विद्यमान सभापती रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली संत सावतामाळी मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी तालुक्यातील शेतकरी, आडतेदार, व्यापारीवर्गाने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सहकारी सेवा सोसायटीवर ज्योतिìलग पॅनेल विजयी
फलटण, ३० जुलै / वार्ताहर
वाठार िनबाळकर (ता. फलटण) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राजेपुरस्कृत ज्योतिìलग पॅनेलने सर्वच्या सर्व १३ जागाजिंकून आपले निíववाद वर्चस्व सिद्ध केले आहे. विरोधी शेतकरी पॅनेलने लढविलेल्या सहा जागांवरील उमेदवार पराभूत झाले आहेत.ज्योतिìलग पॅनेलचे आनंदा गोसावी, दशरथ वाडकर, निवृत्ती तरटे, महादेव बिचुकले, रवींद्र िनबाळकर, विनायक िनबाळकर, विश्वासराव िनबाळकर, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून श्रीकृष्ण पलसे, महिला राखीव मतदारसंघातून विमल िशदे, ब वर्ग बिगर कर्जदार मतदारसंघातून संजय भंडलकर विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी सी. आर. भुजबळ यांनी काम पाहिले.

दोन बसशी धडक होऊन मोटारसायकलस्वार जागीच ठार
सांगली, ३० जुलै / प्रतिनिधी
एसटीला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरच्या व पाठीमागच्या दोन्ही एसटी बसला धडकून अर्जुन अनंत बोराडे (वय ४५, रा. पाचवा मैल, ता. तासगाव) हा मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. ही घटना आष्टा- सांगली रोडवर सांगलीवाडी टोलनाक्याजवळ बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अर्जुन बोराडे हे आपल्या हिरो होंडा कंपनीच्या पॅशन मोटारसायकलवरून सांगलीकडे येत होता. सांगलीकडेच येणाऱ्या नाशिक- सांगली या गाडीला ओव्हरटेक करून तो पुढे जात असताना समोरून येणाऱ्या मिरज- नाशिक या गाडीला चालकाच्या बाजूला जोरात धडकला व पाठीमागून येणाऱ्या नाशिक- सांगली गाडीवर आदळला व त्याच गाडीच्या चाकाखाली गेल्याने चिरडून जागीच ठार झाला. घटनास्थळावर अतिशय हृदयदावक दृश्य होते. या अपघातात समोरून येणारी गाडी मिरज- नाशिक, तर पाठीमागून येणारी गाडी नाशिक- सांगली होती.

नाभिकांचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी
कोल्हापूर, ३० जुलै / प्रतिनिधी
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात दुर्लक्षित आणि उपेक्षित असलेल्या नाभिक समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, या समाजाला दोन टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे, नाभिक समाजाला अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टखाली संरक्षण मिळावे, लोखंडी टपरी योजना सलून व्यावसायिकांसाठी लागू करावी, शासकीय, निमशासकीय तसेच सहकारी व्यापारी संकुलामध्ये नाभिक समाजासाठी राखीव गाळे असावेत. शिवा काशिद समाधीचा तसेच त्या परिसराचा विकास करण्यात यावा, अशा मागण्या नाभिक समाजाच्या असून त्यासाठी आत्तापर्यंत धरणे, मोर्चे, मेळावे अधिवेशने असे आंदोलनात्मक टप्पे झाले आहेत. पण तरीही या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होते आहे. नाभिक समाजाच्या या रास्त मागण्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

संजय घोरपडे यशवंत दूध संघाच्या संचालकपदी अविरोध
इस्लामपूर, ३० जुलै / वार्ताहर
वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथील संजय भाऊसाहेब घोरपडे यांची शिराळा येथील आमदार शिवाजीराव नाईक संस्थापक असलेल्या यशवंत दूधप्रक्रिया संघाच्या संचालकपदी अविरोध निवड करण्यात आली. शिराळा येथे आमदार शिवाजीराव नाईक, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, यशवंत दूधप्रक्रिया संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष नामदेव पाटील व संस्थेचे संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संजय घोरपडे यांची निवड करण्यात आली.

‘रिपाइं’च्या फलटण तालुका उपाध्यक्षपदी अहिवळे
फलटण, ३० जुलै / वार्ताहर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या फलटण तालुका उपाध्यक्षपदी सचिन अहिवळे व रवींद्र मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिपाइंच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी रिपाइंचे जिल्हा सचिव विजय येवले, पश्चिम महाराष्ट्र संघटक मधुकर काकडे, तालुकाध्यक्ष मुन्ना शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रश्नची कुलकर्णी सातवी
कोल्हापूर, ३० जुलै/प्रतिनिधी

चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूरच्या श्रीमंत माईसाहेब बावडेकर प्रश्नथमिक विद्यालयाच्या प्रश्नची प्रशांत कुलकर्णी हिने ३०० पैकी २८४ गुण मिळवून जिल्हय़ामध्ये सातवा क्रमांक पटकावला. शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांसाठी शाळेतर्फे नुकताच कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला.