Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

समतोल विकासावर यापुढेही भर - चव्हाण
नांदेड, ३० जुलै/वार्ताहर

ग्रामीण भागातील अपूर्ण प्रकल्प मार्गी लावीत जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करून राज्याच्या समतोल विकासावर यापुढेही भर देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज केले. अर्धापूर येथे २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा प्रश्नरंभ श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज झाला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार भास्करराव पाटील खतगावकर, महापौर प्रकाश मुथा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैशाली चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी, विशेष पोलीस महानिरीक्षक एस. पी. यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक सत्यनारायण चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डिकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आदी या वेळी उपस्थित होते.

भोकरला लवकरच नगरपालिका
मुख्यमंत्र्यांची घोषणा
भोकर, ३० जुलै/वार्ताहर
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन विकासाच्या दृष्टीने मराठवाडय़ातील सर्वात मोठय़ा समजल्या जाणाऱ्या भोकर ग्रामपंचायतीला लवकरच नगरपालिकेचा दर्जा मिळणार असल्याचे घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जाहीर केले. नूतन शाळेत आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात श्री. चव्हाण यांनी ही घोषणा केली. बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भास्करराव खतगावकर होते.

‘संयमाला दुबळेपणा समजू नका’
नांदेड, ३० जुलै/वार्ताहर

काँग्रेससोबत युती करू नये, असे आमच्याही कार्यकर्त्यांचे दडपण आहे. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही संयमाने घेत असलो तरी याला आमचा दुबळेपणा समजू नका, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी आज दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार बैठकीत श्री. पाटील यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले, ‘‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले तर त्याचा भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला फायदा होईलच असे नाही; परंतु त्यांना फायदा होऊ शकतो. स्वबळाची भाषा ते वापरत आहेत.

महापारेषणमध्ये भरती प्रक्रियेला आव्हान; प्रतिवादींना नोटिसा
औरंगाबाद, ३० जुलै/खास प्रतिनिधी

महापारेषणच्या सात विभागांतर्गत साहाय्यक यंत्रचालक आणि वाहिनी मदतनीस या २ हजार ८५० पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेत महापारेषणने १५ जुलैला जारी केलेल्या परिपत्रकाला आक्षेप घेत महावितरण कंपनीतील प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे.

संकुलाच्या चौकशीचा अहवाल धूळ खात
तुकाराम झाडे ,हिंगोली, ३० जुलै

िलबाळा मक्ता परिसरात ३ कोटी २९ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या निकृ ष्ट कामाची चौकशी झाली. एकापाठोपाठ एक चौकशा झाल्या आणि पालकमंत्र्यांच्या प्रत्येक बैठकीत हा विषय गाजला. अखेर १३ ऑक्टोबर २००८ रोजी चौकशी अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला अहवाल दिला. कोणतीही कारवाई न करता हा अहवाल बासनात पडून आहे. यात दोषी असलेले आठ जण अजूनही मुक्त आहेत.

निधी आहे;जागा तेवढी द्या!
गंगाखेडचे क्रीडा संकुल सहा वर्षापासून रखडले
प्रमोद साळवे , गंगाखेड, ३० जुलै
राज्य सरकारने २५ लाख रुपये निधी मंजूर करूनही जागेअभावी तालुका क्रीडा संकुल अद्यापि आकारास आले नाही. ही दफ्तरदिरंगाई थोडीथिडकी नव्हे, तर तब्बल सहा वर्षाची आहे.तालुका क्रीडा संकुलासाठी २००३मध्ये सरकारने २५ लाख रुपये मंजूर केले. परभणी जिल्ह्य़ामध्ये फक्त याच तालुक्याला हे संकुल मंजूर झाले.

गंगाखेडमध्ये अवैध कलाकेंद्र सुरू!
पोलीस-प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष
गंगाखेड, ३० जुलै/वार्ताहर
जयभवानी लोकनाटय़ कलाकेंद्राचा परवाना तहसील प्रशासनाने रद्द केल्यानंतरही संबंधित कला केंद्रात करमणुकीच्या नावाखाली अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. याकडे तहसील प्रशासनासह पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रश्नध्यापकाने घेतले २० विद्यार्थ्यांना दत्तक
एक अनोखा शैक्षणिक उपक्रम
औरंगाबाद, ३० जुलै/खास प्रतिनिधी
गरीब वस्तीतील दहावीच्या वर्गात शिकत असलेले २० विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रश्नध्यापक डॉ. डी. जी. धुळे यांनी दत्तक घेतले होते. हे सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाले आहेत. या गरीब विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शुक्रवारी नंदनवन कॉलनीत आयोजित करण्यात आला आहे.गरीब वस्त्यांमधील विद्यार्थी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेण्याची धडपड करीत असतात.

व्हिडीओकॉनची फसवणूक करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांना सक्तमजुरीची शिक्षा
जकातीच्या बनावट पावत्यांद्वारे दीड लाख रुपये उकळले
औरंगाबाद, ३० जुलै/खास प्रतिनिधी
हदगाव, सोनपेठ आणि पूर्णा या नगरपालिकेतील जकातीच्या बनावट पावत्या तयार करून जकात दिल्याचे भासवून व्हिडीओकॉन कंपनीची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल मूळचे औरंगाबादचे परंतु परभणीत व्यापार करणारे दिनेश घनश्याम आहुजा, कैलाश घनश्याम आहुजा आणि घनश्याम बाबुलाल आहुजा या तिघांना तीन वर्षे सक्तमजुरी, दोन गुन्ह्य़ांमध्ये प्रत्येकी दहा हजार दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जी. शेटे यांनी ठोठावली आहे.

पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलाची ५० टक्के रक्कम माफ
उर्वरित रक्कम सहा टप्प्यात भरण्याची मुभा
बीड, ३० जुलै/वार्ताहर
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलाच्या रकमेवरील व्याज पन्नास टक्के माफ करण्यात आला आहे. उर्वरित रक्कम सहा हप्त्यात भरावयाची आहे. त्यासाठी स्वत:च्या किंवा बाराव्या वित्त आयोगातून पैसे भरावेत असा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीअंतर्गत वीज बिलामुळे बंद पडलेल्या योजनांना संजीवनी मिळणार आहे.

केळीला विक्रमी ७५० रुपये क्विंटल भाव
संजय शहापूरकर ,सोयगाव, ३० जुलै
केळीला प्रथमच क्विंटलला ७५० रुपये भाव मिळाला! या उच्चांकी भावामुळे केळीउत्पादक आनंदात आहेत.केळी हे सर्वसामान्याला परवडणारे फळ असल्याने याला १२ महिने मागणी असते. मात्र बाजारात जेव्हा इतर फळांची आवक मोठय़ा प्रमाणावर होते, तेव्हा केळीच्या भावात घसरण होते. औरंगाबाद जिल्ह्य़ात सर्वाधिक केळीची लागवड सोयगाव तालुक्यात होते. पावसाअभावी केळीच्या लागवडीखालील क्षेत्रात घट आली असली तरी सोयगाव, जरंडी, बनोटी, गोरेगाव भागांत मोठय़ा प्रमाणावर केळी आहे. परप्रश्नंतातील तसेच विदेशी फळांची आवक केळी उद्योगाला नेहमीच त्रासदायक ठरली आहे. जेव्हा ही फळे बाजारात येतात तेव्हा केळीचे भाव एका क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांप्रयत्न घसरतात.पावसाळा सुरू आहे. सध्या बाजारात इतर फळांची आवक नसल्याने केळीला परराज्यात मागणी वाढली. एका क्विंटलमागे ४०० रुपयांपर्यंत भाव असलेली केळी दोन दिवसांत ७५० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचली.भाव केळी उद्योगातील विक्रमी भाव आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.श्रावण, भाद्रपद महिन्यात मोठय़ा प्रमाणावर सणवार असल्याने केळीची मागणी वाढणार आहे. त्यामुळे केळीच्या भावात अजूनही वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. केळी उद्योगाला वाढत्या भावाने चांगले दिवस आले असले तरी पाण्याअभावी केळीउत्पादकाला केळी वाचविण्यासाठी भर पावसाळ्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दोन तरुणांचे मृतदेह आढळले
नांदेड, ३० जुलै/वार्ताहर

जिल्ह्य़ातल्या देगलूर तालुक्यातील कावळगाव येथे दोन तरुणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. आज सायंकाळी साडेसात वाजता हा प्रकार उघड झाला असून या दोघांचा खून झाला असावा, असा पोलिसांचा प्रश्नथमिक अंदाज आहे.महेश पाटील (वय २२) व संग्राम मुखेडे (वय २०, दोघे राहणार कावळगाव) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, देगलूरपासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या कावळगाव येथे एक तळ्याच्या किनारी या दोघांचे मृतदेह एका गावकऱ्याला दिसले. त्यानंतर पोलीस पाटलांमार्फत ही माहिती देगलूर पोलिसांना देण्यात आली. मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडच्या दौऱ्यावर असल्याने देगलूर पोलीस ठाण्याचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी नांदेडला होते. हा प्रकार समजल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, उपअधीक्षक एम. बी. चाळक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. दोघांचाही खून झाला असावा, असा प्रश्नथमिक अंदाज आहे.

धारूरच्या टपाल कार्यालयात कर्मचारी तरुणीची आत्महत्या
धारूर, ३० जुलै/वार्ताहर
टपाल कार्यालयामध्ये कारकून म्हणून काम करणाऱ्या २३ वर्षाच्या तरुणीने आज सायंकाळी ४ वाजता कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. नीता नंदकुमार कुलकर्णी (बीड) असे तिचे नाव आहे. नीता मागील दोन वर्षापासून धारूर टपाल कार्यालयात कारकून म्हणून काम करीत होती. कार्यालय चालू असताना एका खोलीमध्ये जाऊन दरवाजा आतमधून बंद करून आत्महत्या केली. मुलीचे नातेवाईक आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. आत्महत्येचे कारण मात्र समजले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

बुडणाऱ्या मुलीला वाचविणाऱ्या महिलेचा खाणीत बुडून मृत्यू
बीड, ३० जुलै/वार्ताहर

पाण्यात बुडत असलेल्या मुलीला वाचविण्यासाठी खाणीत उतरलेली महिलाच बुडून मृत्युमुखी पडली. आज सकाळी ही दुर्घटना घडली. गांधीनगर भागात राहणाऱ्या सुनीता फसाटे नात्यातील एका मुलीला घेऊन धुणे धुण्यासाठी आज सकाळी अकराच्या सुमारास नाळवंडी नाक्याजवळील खाणीत गेल्या. ही मुलगी पाय घसरून पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी सुनीता यांनी पाण्यात झेप घेतली व तिला बाहेर काढले. त्यानंतर त्या खोल पाण्यात गेल्याने बुडाल्या. वाचविलेल्या मुलीने आरडाओरड करून नागरिकांना बोलावले. ते येईपर्यंत सुनीता मृत्युमुखी पडल्या होत्या.

‘तंटामुक्त गाव मोहिमेतून वादांचे समूळ उच्चाटन व्हावे’
जळकोट, ३० जुलै/वार्ताहर
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या माध्यमातून शांतता निर्माण होण्यास मदत झाली आहे. या तंटामुक्त गाव समित्यांच्या परिणामकारक कार्यातून गावागावातील तंटे-भांडणाचे समूळ उच्चाटन व्हावे. शांततेसाठी या मोहिमेची अंमलबजावणी करण्याची गरज भासू नये, यासाठी नागरिकांनी मिळून मिसळून आणि एकदिलाने वागावे. त्याचप्रमाणे प्रशासन व न्याय यंत्रणेवरचा भार कमी करावा, असे प्रतिपादन तहसीलदार आर. बी. कदम यांनी केले
तालुक्यातील होकरणा येथे तंटामुक्त गाव समितीतर्फे आयोजित गुणवंतांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात श्री. कदम बोलत होते. सहायक पोलीस निरीक्षक श्रीमंत तेरकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष माधव भुरे, बाबुराव देवकते, उपसरपंच मनोहर पाटील, व्यंकटी मोरे, नामदेव बोडखे, जिलानी शेख, प्रश्न. चंद्रकांत मोरे आदी प्रमुख पाहुणे होते.विविध परीक्षांतील गुणवंत विद्यार्थी, दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी, क्रीडा क्षेत्रातील गुणवान विद्यार्थी यांना तंटामुक्त गाव समितीतर्फे रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यशस्वी महिला बचत गटांच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या गावाच्या पण परगावी दिलेल्या विवाहित लेकींना साडी-चोळींचे वाटपही करण्यात आले.

जप्त केलेल्या मोटरसायकली पोलिसांनी विकल्याची तक्रार
गंगाखेड, ३० जुलै/वार्ताहर
विविध गुन्ह्य़ांमध्ये जप्त केलेल्या पाच मोटारसायकली पोलिसांनी बेकायदा विकल्याची तक्रार मोहसीन खान बाबू खान यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक सतीश देशमुख व सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. एन. कुलकर्णी यांनी संगनमत करीत येथील पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्य़ात जप्त करण्यात आलेल्या पाच मोटारसायकली विकल्या. त्यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही. मोटरसायकल विक्रीसाठी बोली न बोलताच आपल्या मर्जीतील लोकांना सायकलीच्या भावात मोटारसायकली विकण्याचा हा प्रकार आहे. मोहसीन खान यांनी माहितीच्या अधिकारातून संबंधित माहिती प्रश्नप्त केल्यानंतर ही तक्रार केली.

मुलांना नैसर्गिकरीत्या वाढू द्या - चव्हाण
परतूर, ३० जुलै/वार्ताहर
मुलांना मातृत्व व पितृत्वाचे कुंपण पाहिजे. परंतु आपण त्यांना नैसर्गिकरीत्या वाढू देण्यापेक्षा त्यांना खेचून ओढण्याचे काम करीत आहोत, असे प्रतिपादन सांगलीचे शिक्षणतज्ज्ञ राजेश चव्हाण यांनी केले. आनंद प्रश्नथमिक विद्यालयात आयोजित पालकसभेत श्री. चव्हाण बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ कदम उपस्थित होते.श्री. चव्हाण म्हणाले की, आपण मुलांचा विकास परीक्षेतील गुणांवरून मोजतो. नैसर्गिकरीत्या सर्व मुलांमध्ये भेद असतात, त्यामुळे कुणाचीही तुलना करू नये. तीन ते पाच वयात मुलांनी या भरपूर खेळणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या खेळण्यावर बंधने घालू नका. मुलांच्या साथ-संगतीबाबत चिंता करू नका. त्यांना हवे ते करू द्या. मूल चांगले माणूस कसे होईल याची काळजी घ्या.प्रश्नस्ताविक मुख्याध्यापिका सत्यशीला तौर यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा राऊत यांनी केले.

मनसे संपर्क कार्यालयाचे लोह्य़ात उद्घाटन
लोहा, ३० जुलै/वार्ताहर
शिवसेना म्हणजे तिसरी काँग्रेस आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांना आगामी काळात धडा शिकवा. नवनिर्माण करायचे असेल तर या मतदारसंघात राज ठाकरे यांच्या विचारातील महाराष्ट्र घडविण्यासाठी धडपड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाला साध द्या, असे आवाहन पक्षाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष शिवा नरंगले यांनी केले. कळंबर येथे म. न. से.चा कार्यकर्ता मेळावा आणि संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरू गयबी नागेंद्रमहाराज पानभोसी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात श्री. नरंगले बोलत होते. श्री. नरंगले यांनी या वेळी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाचा गौरव केला. कार्यक्रमास पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष विनोद पावडे, जिल्हा चिटणीस अब्दुल शकील, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, राजेश अन्नदाते आदी उपस्थित होते.

अपघातात दोन जखमी
गेवराई, ३० जुलै/वार्ताहर

जालन्याहून बीडकडे भरधाव निघालेल्या मालमोटारीची धडक बसून मोटरसायकलवरील दोन जण जखमी झाले. जैन पेट्रोलपंपाजवळ काल दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. शिवाजी एकनाथ राजगे (वय २८), भीमराव रंगनाथ गोरे (वय ४०, मालेगाव) अशी जखमींची नावे आहेत. दोघांचीही परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना बीड येथे हलवण्यात आले. दोघेही मालेगाव येथून गेवराईकडे निघाले होते.

अट्टल घरफोडय़ा काळ्या पोलिसांच्या ताब्यात
औरंगाबाद, ३० जुलै/प्रतिनिधी
मुकुंदवाडी, उस्मानपुरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडय़ा घालून धुमाकूळ घालणाऱ्या घरफोडय़ास अटक झाली आहे. त्याच्याकडून साडेपाच तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.
पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव अशोक ऊर्फ काळ्या चंद्रभान क्षीरसागर (राहणार छोटा मुरलीधर नगर) आहे. उस्मानपुरा हद्दीत सात ते आठ आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच ते सहा घरफोडय़ांची कबुली त्याने दिली. त्याला ४ ऑगस्टपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.काळ्याने ८२ हजार रुपये किमतीचे साडेपाच तोळे सोने पोलिसांच्या हवाली केले आहे. त्याच्या नावे आणखी २० पेक्षा अधिक गुन्हे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून घरफोडय़ातील आणखी ऐवज ताब्यात घ्यायचा असल्याचे् पोलिसांनी सांगितल्याने न्यायालयाने त्याला ४ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शामराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास करण्याची गरज - डॉ. कोत्तापल्ले
औरंगाबाद, ३० जुलै/खास प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना चार भिंतीत कोंडून न ठेवता त्यांच्या क्षमतांचा विकास करणे ही काळाची गरज आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. विद्यापीठाच्या प्रश्नैढ, निरंतर शिक्षण आणि विस्तार सेवा विभागातर्फे आयोजित प्रश्नचार्याच्या सहविचार सभेत कुलगुरु बोलत होते. या विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या विस्तार सेवा केंद्राच्या कृती आराखडय़ाच्या परिचयासाठी प्रश्नचार्याची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. विविध महाविद्यालयांच्या २२ प्रश्नचार्यानी सहभाग नोंदविला होता. विद्यार्थी हे दिवसेंदिवस समाजापासून दुरावत चालले आहेत. विविध उपक्रमाद्वारे त्यांना समाजाभिमूख करणे ही महाविद्यालयाची नैतिक जबाबदारी आहे, असे डॉ. कोत्तापल्ले म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ. के. एन. धाबे हे होते. प्रश्नरंभी डॉ. संजय मून यांनी प्रश्नस्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सरदारसिंग बैनाडे यांनी केले.

मद्यपी वाहनचालकांना अटक
औरंगाबाद, ३० जुलै/प्रतिनिधी

मद्य प्रश्नशन करून वाहन चालविऱ्यांविरुद्ध शहर व परिसरात मोहीम सुरू आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांना अटक केली. बजाजनगरमध्ये राहणारे अश्विनी कुमार व सुपनसिंग नरेंद्र परमार हे दोघे भाऊ आपल्या मोटारसायकल (क्र. एमएच-२०-एडब्ल्यू-७२९९) रस्त्याच्या मधोमध वाकडीतिकडी चालविताना आढळले. हा प्रकार पोलीस कॉन्स्टेबल भावसिंग चव्हाण यांच्या नजरेस पडताच त्यांनी दोघांना रोखले. त्या दोघांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता दोघेही मद्यपान केलेले आढळले. पोलिसांनी त्यांना अटक केली.

महागाईच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने
औरंगाबाद, ३० जुलै/खास प्रतिनिधी

डाळ, तेल, साखर आदी जीवनावश्यक वस्तुंच्या भाववाढीने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. ही भाववाढ रोखण्यास केंद्र व राज्य सरकारला अपयश आल्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तीव्र निदर्शने करण्यात आली.शिवसेनेच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रत्येक धान्य व वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते व या धान्य आणि वस्तुंवर त्याचे भाव दर्शविण्यात आले होते. ताटांवर लाटणे वाजवत महागाई कमी झालीच पाहिजे, सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा महिलांनी दिल्या. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जिल्हा संघटक सुनीता आऊलवार, वैजयंती खैरे, नगरसेविका लता दलाल, अनिता घोडेले, पार्वती वाघमारे, कला बोरामणीकर, अल्पा जैन, उपजिल्हा संघटक कला ओझा, सुनीता देव, माधुरी जोशी यांनी या निदर्शनामध्ये सहभाग नोंदविला होता. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल यांना निवेदन दिले.

जालना येथे आजपासून राज्य किक-बॉक्सिंग स्पर्धा
जालना, ३० जुलै/वार्ताहर
राज्यस्तरीय सबज्युनिअर किक-बॉक्सिंग स्पर्धा उद्या (शुक्रवार) पासून येथे सुरु होत आहे. ती २ ऑगस्टपर्यंत चालेल, अशी माहिती या स्पर्धेचे संयोजक तथा कीक-बॉक्सिंग असोसिएशनचे जालना जिल्हाध्यक्ष कैलास गोरंटय़ाल यांनी दिली. श्री. गोरंटय़ाल म्हणाले की, उद्या सायंकाळी ५ वाजता उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होईल. जिल्हाधिकारी विलास ठाकूर, जिल्हा पोलस अधीक्षक संदीप कर्णिक, महाराष्ट्र कीक -बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अनिल झोडगे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष विजय खंडाइक, सचिव राहुल वाघमारे या वेळी उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील २७ ते २८ जिल्ह्य़ांतून जवळपास ६०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यापैकी ३०० महिला खेळाडू असतील. १४ वर्षाच्या आतील खेळाडूंची ही स्पर्धा आहे. विविध १० वजन गटांत ही स्पर्धा होणार आहे.महाराष्ट्रात ही स्पर्धा प्रथमच होत आहे. या स्पर्धेतून येत्या ओरिसात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या खेळाडूची निवड होणार आहे. शगुन मंगल कार्यालयात या स्पर्धा होणार आहे.

खरेदी-विक्री व्यवहाराचे दस्तऐवज देण्यासाठी आर्थिक पिळवणूक
बोरी, ३० जुलै/वार्ताहर
शेतकऱ्यांच्या खरेदी-विक्री होत असलेल्या व्यवहाराचे सरकारने संगणकीकरण केले. मूळ दस्ताऐवज शेतकऱ्यांना ३० मिनिटांत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. जिंतूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात मात्र याची अंमलबजावणी होत नसून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
कार्यालयातील संगणक यंत्रणा बंद असली तरीही शेतकऱ्यांकडून संगणक शुल्क आकारण्यात येत आहे, याची माहिती अधिकाऱ्यास दिली असता बेजबाबदारपणे उत्तरे दिली जात आहेत. आजचे काम उद्या-परवा झाले तर काय फरक पडतो, अशी भाषा हे अधिकारी वापरत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रामकिशन भाबट, मुंजाराव देशमुख, रामेश्वर बारवरकर, शंकर देशमुख, प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

‘थांबताच येत नाही’ला उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार
जालना, ३० जुलै/वार्ताहर
यशवंतराव चव्हाण साहित्यिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानाने शनिवारी (दि. १ ऑगस्ट) यंदाच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा पुरस्कार कवी हेमंत दिवटे यांच्या ‘थांबताच येत नाही’ या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध कवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते तो देण्यात येईल. या पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे आहे. कृष्णराव फुलंब्रीकर नाटय़गृहात सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. परीक्षक समितीचे सदस्य डॉ. सुधीर रसाळ, प्रश्नचार्य लक्ष्मीकांत तांबोळी आणि डॉ. शरणकुमार लिंबाळे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुशराव टोपे यांनी केले आहे.

भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा; वाहतुकीचा अडथळा दूर
परळी वैजनाथ, ३० जुलै/वार्ताहर
शहरातील आर्य समाज मंदिर ते डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पूल या मार्गावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा येत होता. या विक्रेत्यांना नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी नगरपालिकेच्या व्यापारी संकुलासमोर जागा देऊन वाहतुकीची कोंडी सोडविली. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आर्य समाज मंदिर ते उड्डाणपूल या रस्त्यावर नेहमीच वाहनांची आणि पादचाऱ्यांची गर्दी असते. औष्णिक वीजनिर्मिती केंद्राकडून शहरात येणारी वाहने, वैद्यनाथ मंदिराकडे जाणारी वाहने यामुळे रस्त्यावर सतत गर्दी असे. भाजी विक्रेते व हातगाडय़ांवर फळ विकणाऱ्यांनी आपापली दुकाने थाटल्यामुळे अनेक वर्षापासून या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती. ही अडचण ओळखून श्री. लोहिया यांनी त्यावर मार्ग काढला.

औसा बाजार समितीच्या उपसभापतींवर अविश्वासाचा ठराव
सोमवारी विशेष सभा
औसा, ३० जुलै/वार्ताहर
औसा बाजार समितीचे सभापती चंद्रकांत कापसे व अन्य १० संचालकांनी उपसभापती तानाजी मोरे यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव काल दाखल केला. या ठरावावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. ३) विशेष सभा बोलाविली आहे.बाजार समितीत काँग्रेस ५, शिवसेना ४, भारतीय जनता पक्ष १, राष्ट्रवादी काँग्रेस ४ व अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. चंद्रशेखर राचट्टे व राहुल सोळंके या अपक्ष संचालकांनी मंत्री दिलीप देशमुख यांचे नेतृत्व मान्य करून काँग्रेसच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. सभापतीपदी काँग्रेसचे चंद्रकांत कापसे व उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तानाजी मोरे यांची बिनविरोध निवड झाली. अडीच वर्षानंतर उपसभापतीपद भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अडीच वर्षानंतर श्री.कापसे, नारायण लोखंडे, नंदकुमार हजारे, पाशामियाँ शेख, मल्लिकार्जुन वाडीकर, काकासाहेब मोरे, चंद्रभान जाधव, हरिपंत पाटील यांनी मोरे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला.

विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
जालना, ३० जुलै/वार्ताहर
जिल्ह्य़ातील २१२ व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विलास ठाकूर यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली असून त्यात विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त व्यक्तींची नावे व पत्ते नमूद करण्यात आलेली आहे.

पावसाची उघडीप
लोहा, ३० जुलै/वार्ताहर
गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाची उघडीप असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. दोन महिने संपले तरी अपेक्षित पाऊस पडला नाही; त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खेडेगावासह शहरी भागातही पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शेळके यांची पुण्यात बदली
बीड, ३० जुलै/वार्ताहर

निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांची पुणे येथे याच पदावर बदली झाली. त्यांच्या जागी अद्यापि कोणाचीही नियुक्ती झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. श्री.शेळके यांची पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात याच पदावर बदली झाली आहे. यापूर्वी बीडचे उपविभागीय अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांच्या जागी अद्यापि नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

चंद्रभान गायकवाड यांचे निधन
औरंगाबाद,३० जुलै/प्रतिनिधी
कन्नड तालुक्यातील बोरसर येथील रहिवासी चंद्रभान दादा गायकवाड यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले. ते ७०वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, बहीण, नातवंडे असा परिवार आहे. गायकवाड हे वारकरी संप्रदायातील होते. चिकलठाणा पोलीस ठाण्यातील कर्मचारी ज्ञानदेव गायकवाड यांचे ते वडील होत.