Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

भाजी २० रुपये प्रतिकिलो, पण..
दलालांनीच पोसलाय महागाईचा भस्मासूर
प्रतिनिधी
उत्पादक शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचविणाऱ्या दलालांमुळे भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडत आहेत. दलालांनी उत्पादक शेतक ऱ्यांकडून अगदी किरकोळ भावात खरेदी केलेली भाजी मुंबईतील ग्राहकांच्या घरी पोहोचेपर्यंत प्रचंड महाग होते. दलालांनी पोसलेल्या महागाईच्या भस्मासुरामुळे मुंबईकरांना भाजी परवडेनाशी झाली आहे. मुंबईकरांच्या खिशाला विनाकारण चाट पडू नये, त्यांना स्वस्तात भाजी मिळावी यासाठी नाशिक ग्रीन अ‍ॅग्रो लिमि. या संस्थेतर्फे एक योजना सरकारकडे मांडण्यात आली होती. परंतु सरकार दरबारी असलेल्या दलालांच्या हितसंबंधांमुळे या योजनेला केराची टोपली दाखविण्यात आली. परिणामी मुंबईकरांना अवाजवी किंमतीत भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत.

अभिजात मराठी साहित्य आता ऑनलाइन!
शेखर जोशी

‘जरठ कुमारी विवाह’ या विषयावरील गोविंद बल्लाळ देवल यांचे ‘संगीत शारदा’ किंवा राम गणेश गडकरी यांचे ‘राजसंन्यास’ हे नाटक, आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत यांचे समग्र काव्य किंवा मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे तुकाराम किंवा नामदेवांचे अभंग हे सर्व अभिजात मराठी साहित्य आहे. अभ्यासक आणि साहित्यप्रेमींना आता हे साहित्य ऑनलाइन वाचायला मिळणार असून ते मोफत डाऊनलोडही करता येणार आहे.

सरबजीतच्या सुटकेसाठी सर्व देशवासीयांनी प्रयत्न करावेत-दलबीर कौर
प्रतिनिधी

माझा भाऊ सरबजीत हा निर्दोष असून त्याच्या सुटकेसाठी आता समस्त देशवासीयांनी प्रयत्न करावेत आणि यासाठी आम्हा कुटुंबीयांना मदत करावी, असे कळकळीचे आवाहन पाकिस्तानात कैदेत असलेल्या सरबजीत सिंगच्या भगिनी दलबीर कौर यांनी बुधवारी दादर येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले. दादर येथील गुरुद्वारात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी त्यांच्यासमवेत सरबजीत यांची मुलगी सपनदीप कौर व मेव्हणा बलदेव सिंह आदी कुटुंबीय उपस्थित होते.

महापालिका नाटय़गृहांवर राजकारण्यांचा दबाव
नाटय़-प्रतिनिधी

बोरीवलीचे प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, ठाण्याचे गडकरी रंगायतन, वाशीचे विष्णुदास भावे नाटय़गृह, कल्याणचे आचार्य अत्रे रंगमंदिर, पाल्र्याचे दीनानाथ नाटय़गृह आणि आणि डोंबिवलीचे सावित्रीबाई फुले नाटय़गृह या महापालिकांच्या नाटय़गृहांमध्ये नाटय़निर्मात्यांना तिमाही वाटप झालेल्या तारखा राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्या स्वत:च्या किंवा त्यांच्या हितसंबंधी संस्थांच्या कार्यक्रमांसाठी नाटय़गृह व्यवस्थापकांवर दबाव आणून आयत्या वेळी काढून घेण्याचे प्रकार अलीकडे सर्रास घडत आहेत. या प्रकारांमुळे केवळ नाटय़निर्मातेच नव्हेत, तर नाटय़गृहांचे व्यवस्थापकही हैराण झाले आहेत.

बचाव पथक
गेल्या पंधरवडय़ात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पण डोंगरात-घाटात झालेले अपघात. विशाळगडाच्या नजीक गजापूरच्या घाटात दरीत जीप कोसळून दहा व्यक्तींचा मृत्यू, तर माळशेज घाटात एका व्यक्तीचा दरीत पडून मृत्यू. पण दोन्ही ठिकाणी दरीमध्ये अवघड जागी अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले ते गिर्यारोहकांनी. किंबहुना गेल्या काही वर्षात घाटातल्या अपघातप्रसंगी त्वरित धावून जाण्याचे मोलाचे काम केले आहे ते गिर्यारोहकांनीच.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर
प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय आणि महाराष्ट्र प्रदेशच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शुक्रवार, ३१ जुलै रोजी चर्चगेट येथील पाटकर सभागृहामध्ये राज्यव्यापी महिला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरामध्ये राज्य मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, खासदार सुप्रिया सुळे आणि संजय पाटील, आर. आर. पाटील, सूर्यकांता पाटील, आमदार अरुण गुजराथी, आमदार गुरुनाथ कुलकर्णी, आमदार सचिन अहिर, आमदार हेमंत टकले आणि मुनाफ हकिम मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई महिला अध्यक्षा अल्पना पेंटर आणि महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी केले असल्याचे, सरचिटणीस अंजना नायर यांनी कळविले आहे.

आजपासून मुंबईत दोन ठिकाणी ‘बजेट प्रश्नॅपर्टी प्रदर्शन’
प्रतिनिधी
महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री (एमसीएचआय)चे दुसरे ‘बजेट प्रश्नॅपर्टी २००९’ हे प्रदर्शन आजपासून एकाच वेळी दोन ठिकाणी सुरू होत आहे. तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन घाटकोपर आणि कांदिवली अशा दोन ठिकाणी सुरू होत असून १० ते ५० लाख रुपयांच्या दरम्यान किमती असलेल्या घरांची माहिती या प्रदर्शनांतून मिळेल. कांदिवली पश्चिम येथील रघुलीला मॉल येथे तर घाटकोपर पश्चिम येथील आर सिटी येथे ही प्रदर्शने भरविण्यात येत असून २ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील. पश्चिम उपनगरांतील अंधेरी ते विरार आणि त्या पलिकडच्या परिसरातील प्रश्नॅपर्टीविषयक माहिती आणि घरांची उपलब्धता समजू शकेल. तसेच घाटकोपर येथील प्रदर्शनात घाटकोपर, चेंबूर ते मुलुंड तसेच ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल आणि त्यापलिकडच्या परिसरांतील मालमत्ता, गृहसंकुले याविषयीची माहिती मिळेल.

साहित्य पाठविण्याचे आवाहन
प्रतिनिधी : जोगेश्वरी येथून प्रकाशित होणाऱ्या ‘तारपा’ चा ९ वा वार्षिक अंक प्रसिद्ध होणार आहे. यंदाचा अंक हा आदिवासी या व्यक्तिरेखेवर आधारित असून साहित्यिकांनी आदिवासी आत्मकथनपर ग्रंथांचे परीक्षण, काल, आज, उद्याची अर्थव्यवस्था, तसेच इतर विषयांवर लेख, व्यंगचित्रे २५ ऑगस्टपर्यंत आपले साहित्य शंकर बळी १३/सी/११, कांचन, प्लॉट - ५, नागरी निवारा वसाहत, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ६५ वर पाठवावे अथवा मो.क्र.९८६९९११२०१ वर संपर्क साधावा.