Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघात बॉण्ड, टफी
ख्राइस्टचर्च, ३० जुलै / पीटीआय

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा ३० खेळाडूंचा संभाव्य संघ जाहीर झाला असून या संघात आयसीएलमधून पुन्हा एकदा न्यूझीलंड क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात सामील झालेले शेन बॉण्ड व डॅरिल टफी यांना स्थान देण्यात आले आहे.

 

आयसीएलशी काडीमोड घेतल्यानंतर बॉण्ड आणि टफी यांना पुन्हा एकदा न्यूझीलंड क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. श्रीलंकेविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट व ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या न्यूझीलंड संघात त्यांना स्थान देण्यात आले. गेल्या वर्षी डच्चू देण्यात आलेल्या ख्रिस मार्टिन व जेम्स मार्शल यांनाही या संभाव्य खेळाडूंत स्थान मिळाले आहे. इ डॅनियल व्हेटोरी, ब्रेन्ट अर्नेल, शेन बॉण्ड, नील ब्रूम, इयन बटलर, क्रेग क्युमिंग, ब्रेन्डन डियामॅन्टी, ग्रँट इलियट, जेम्स फ्रँकलिन, पीटर फुल्टन, मार्टिन गुप्तिल, गॅरेथ हॉपकिन्स, जॅमी हाऊ, पीटर इनग्राम, ब्रेन्डन मॅकक्युलम, नॅथन मॅकक्युलम, पीटर मॅकग्लाशन, जेम्स मार्शल, ख्रिस मार्टिन, कायले मिल्स, इयन ओब्रायन, जेकब ओराम, जीतन पटेल, अ‍ॅरन रेडमण्ड, जेसी रायडर, श्ॉनन स्टीवर्ट, टिम साऊदी, स्कॉट स्टायरिस, रॉस टेलर व डॅरिल टफी.