Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

ज्यू ऑलिम्पिकमध्ये ठाणेकरांनी फडकविला तिरंगा
संजय बापट

इस्रायलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या १२ व्या मक्काबिया गेम्स अर्थात जागतिक ज्यू ऑलिम्पिक स्पर्धेत जगातील नामवंत क्रिकेट संघांना पराभवाची धूळ चाखायला लावत भारतीय क्रिकेट संघाने प्रथमच इस्रायलच्या मैदानावर तिरंगा फडकवला. एका ठाणेकराने गेली काही वर्षे इस्रायलमध्ये तिरंगा फडकविण्याचे आपले स्वप्न अखेर जिद्दीच्या जोरावर पूर्ण केले. मात्र त्यांच्या या पराक्रमाची साधी दखलही भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला घ्यावीशी वाटली नाही.

शिष्यवृत्ती परीक्षेत सरस्वती सेकंडरी स्कूलचे सुयश
ठाणे/ प्रतिनिधी

माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सरस्वती सेकंडरी स्कूलच्या नऊ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. अश्विन संजय लेले शाळेतून पहिला, तर जिल्ह्य़ात चौथा आला. शर्व विनायक गोडबोले शाळेतून दुसरी, तर जिल्ह्य़ातून सहावी आली. स्नेहा वैभव पंडित शाळेतून तिसरी, तर जिल्ह्य़ातून अकरावी आली. मुग्धा दिनेश केतकर शाळेतून चौथी, तर जिल्ह्य़ात १६ वी आली. ओंकार माधव भोळे शाळेत पाचवा, तर जिल्ह्य़ातून २१वा आला. तन्मय हेमंत देशमुख, सौरभ महेश कार्लेकर, समीर सदाशिव पाटील आणि अभिषेक सुनील पाटील यांनीही शिष्यवृत्ती मिळविली. हेमलता बोटे, शीला बर्वे, वीणा आंबेकर या शिक्षिकांनी त्यांना मार्गदर्शन केले.

मुकुट सोनेरी; सिंहासन काटेरी
राजीव कुळकर्णी

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमदार एकनाथ शिंदे यांना त्यांच्या निष्ठेचे बक्षीस म्हणून जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपद दिले, पण हा मुकुट सोनेरी असला, तरी सिंहासन काटेरी आहे, हेआमदार शिंदे यांना ध्यानात ठेवावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी हट्टाने विजय चौगुले यांच्यासारख्या वादग्रस्त नेत्यास उमेदवारी मिळवून दिली. ‘मातोश्री’चा आग्रह माजी महापौर राजन विचारे यांच्यासाठी असतानाही आपला विरोधक खासदार होऊ नये म्हणूनच जिल्हाप्रमुख या नात्याने शिंदे यांनी ही खेळी खेळल्याचा आरोप झाला.

सानेकर, नाखवा आदींना स.पां. जोशी पुरस्कार
ठाणे/प्रतिनिधी - प्रसिद्ध कवी चंद्रशेखर सानेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद नाखवा, नाटककार आनंद म्हसवेकर आदी आठ जणांना यंदाचे ‘सन्मित्र’कार स.पां. जोशी पुरस्कार जाहीर झाले आहेत.
स.पां. जोशी यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी त्यांच्या जीवनात ज्या आठ क्षेत्रांमध्ये भूमिका बजाविल्या, त्या आठ क्षेत्रांतील मान्यवरांना हे पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांचे हे पाचवे वर्ष असल्याचे सन्मित्रचे संपादक विजय जोशी यांनी सांगितले. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अन्य पुरस्कार विजेत्यांची नावे अशी : मधुसूदन जोशी (मुद्रक), प्रश्न. दीपक घारे (मुद्रण शिक्षक), मोहन पाठक (साहित्य रसिक), स्मिता जोशी (समाजसेविका) व प्रश्न. दीपक पवार (मराठी भाषा प्रचारक).शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता सन्मित्रकार कै.स.पां. जोशी रंगमंच, ठाणे महापालिका शाळा क्र. १, नेताजी सुभाषचंद्र बोस पथ, ठाणे येथे समारंभपूर्वक हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरुण साधू उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी महापौर स्मिता इंदुलकर असतील.

स्कॉलरशिपमध्ये शहापुरातील मुलांचे स्पृहणीय यश
शहापूर/वार्ताहर

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील १७ विद्यार्थ्यांना विशेष प्रश्नवीण्य मिळवून शिष्यवृत्ती पटकाविली आहे. पूर्व माध्यमिक (इयत्ता चौथी) शिष्यवृत्ती परीक्षेत कसारा शाळा नं. १ मधील हर्षल नवसू गायकवाड या मागासवर्गीय विद्यार्थ्यांने ३०० पैकी २८४ गुण मिळवून ठाणे जिल्ह्यात तिसरा, तर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. गीतेश बाळकृष्ण ठाकरे (किन्हवली शाळा), वैशाली हरी शिर्के (महिला मंडळ शहापूर), लोकेश अशोक लहासे (आदर्श विद्यामंदिर किन्हवली), गणेश लक्ष्मण बेंडकुळे (जिल्हा परिषद शाळा उंबरमाळी) हेही विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.माध्यमिक (इयत्ता सातवी) शिष्यवृत्ती परीक्षेत शहापूरच्या खाडे विद्यालयाची साक्षी विजय म्हात्रे ही ३०० पैकी २३४ गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. अक्षय राजपूत, तेजश्री सावळे, शिवानी पांडव, जितेंद्र सोनारे हे खाडे विद्यालयाचे विद्यार्थी परीक्षेत चमकले आहेत. कळगाव शाळेची माधुरी मंगल घरत, कानवे शाळेची सुजाता पडवळ, वेहळोली शाळेची माया जाधव, शिदपाडा शाळेची गुलाब खोडकर, शेणवे आश्रमशाळेची वत्सला कवटे, सरस्वती विद्यालय वासिंदची शीतल सोष्टे, कुणाल बाळू राहुत आदी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रश्नवीण्य मिळविले आहे.

पारनाक्यावरील रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणमधील पारनाका ते रेल्वे स्टेशन रिक्षाचे भाडे पाच रुपये असताना रिक्षाचालक प्रवाशांना दादागिरी करून सहा रुपयांची आकारणी करत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक प्रवाशांनी यासंदर्भात आरटीओ, वाहतूक शाखेकडे तक्रारी करून रिक्षाचालकांना योग्य समज देण्याची मागणी केली आहे. प्रवाशांचा असंतोषाचा स्फोट झाला तर मात्र रिक्षाचालकांना येथे रिक्षा व्यवसाय करणे अवघड होईल, असेही अनेक प्रवाशांनी वाहतूक विभागाला कळविले आहे. रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही चालकाने पाच रुपयेच प्रवाशाकडून आकारावे म्हणून सांगितले आहे. त्यामुळे या उद्दाम रिक्षाचालकांची मुजोरी वाहतूक विभाग, आरटीओने एकत्रित मोडून काढावी व प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. कल्याण परिवहन सेवेची कल्याण रेल्वे स्टेशन ते पारनाका, दूधनाका ही नवीन बससेवा सुरू झाली आहे. रिक्षाचालकांना धडा शिकविण्यासाठी प्रवाशांनी अधिकाधिक या बससेवेचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

माहिती अधिकार कट्टा- अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन
ठाणे/प्रतिनिधी

दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी ठाण्यात माहिती अधिकार कट्टा ‘सहसंवेदना ग्रुप’च्या आयोजिका शोभा सुभेदार यांनी सुरू केला. त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पावसाळ्यात कट्टय़ाचे ठिकाण येत्या शनिवार, २ ऑगस्ट रोजी एम. एम. हायस्कूल, तलावपाळीजवळ, ठाणे (प) येथे संध्याकाळी सहा वाजता ठरविण्यात आले आहे.माहिती अधिकाराबाबत मार्गदर्शन, वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा, ज्यांनी माहिती अधिकार राबवून प्रश्न सोडवून घेतले आहेत, अशा नागरिकांशी संवाद या शनिवारी साधण्याचा प्रयत्न राहील. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. सर्वानी आपले प्रश्न माहिती अधिकारात मांडण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी कडुनिंबाच्या बियांचेही वाटप करण्यात येईल.

राजा शिवाजी विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे १०० टक्के यश
ठाणे/प्रतिनिधी

फेब्रुवारी २००९ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मध्यमवर्गीय भागातील लोकमान्यनगरातील राजा शिवाजी विद्यामंदिर विद्यार्थ्यांनी १०० टक्के यश प्रश्नप्त केले.
चौथीतील शिष्यवृत्तीप्रश्नप्त विद्यार्थी सिद्धेश कदम (२७६), नेहा कदम (२७२), रश्मी गावकर (२७०), प्रज्ञा शेवाळ (२७०), राहुल रोमन (२६८), अक्षय म्हस्के (२६६) व सातवीतील शिष्यवृत्तीप्रश्नप्त विद्यार्थिनी सायली भोईर (२६३) हे विद्यार्थी आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळेचे संचालक स.रा. देवकर, मुख्याध्यापिका र.स. देवकर, नंदा पाटील व शिक्षक जे.पी. घाडगे, सायली साळवी, शोभा लोखंडे, शीला खोसे, किरण भोसले, दिनेश रावणंग, सरिता जाधव, किरण निकम यांनी कष्ट घेतले.