Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

प्रादेशिक

जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे पवारांचे लक्ष्य !
मुंबई, २ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील अपयशाच्या पाश्र्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यूहरचना आखली आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांशी पवारांनी संवाद साधला. काँग्रेसबरोबर जागावाटपात कोणत्या जागांवर दावा करता येईल याचा अंदाज घेतानाच वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारीही राष्ट्रवादीने केली आहे.

साडेसहा लाख शिक्षकांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष
तीनपैकी एकाही बैठकीला संघटनांना निमंत्रण नाही
मुंबई, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या नेत्यांबरोबर तीन बैठका घेऊन मंगळवारपासून सुरू होणाऱ्या संपातून तोडगा काढण्याकरिता प्रयत्नशील असलेल्या राज्य सरकारला राज्यातील साडेसहा लाख शिक्षकांच्या मागण्यांबाबत काडीमात्र संवेदनशीलता नसल्याचे शिक्षक संघटनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. गुरुजनांना ‘शिक्षण सेवक’ करून काँग्रेसप्रणीत सरकारने शिक्षकांबाबत आपल्याला तिळमात्र आदर नाही हे यापूर्वीच दाखवून दिले आहे. आता त्यांच्या मागण्यांबाबत कमालीची उदासीनता दाखवून सरकारने शिक्षकांना अपमानित केले आहे.

‘एसटी’चा नियोजित संप ११ ऑगस्टपर्यंत लांबणीवर
शरद पवारांच्या आश्वासनानंतर
मुंबई, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

वेतन कराराच्या मुद्दय़ावरून उद्याच्या (३ ऑगस्ट) मध्यरात्रीपासून सुरु होणारा एसटीतील नियोजित संप येत्या ११ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय एसटी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने घेतला आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ‘ग्रेड पे’च्या मुद्दय़ावर १० तारखेपर्यंत समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर कृती समितीने हे पाऊल उचलले.

राखी झाली इलेशची.
मुंबई, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

‘माझे स्वयंवर होणार अगदी वेगळ्या व अनोख्या पध्दतीने ज्याप्रमाणे सीतास्वयंवर झाले तसेच काहीसे’ असे सांगणाऱ्या राखीने कॅनडास्थित इलेशला आज वरले खरे पण ‘आज आपला साखरपुडा झाला असून इलेशच्या स्वभावाची खातरजमा केल्यानंतरच त्याच्याशी विवाह करणार’ असा बॉम्ब टाकल्यामुळे राखीच्या या स्वयंवराचा बारही फुसका तर ठरणार नाही ना, अशी शंका व्यक्त करीत राखीच्या लाखो चाहत्यांनी आपले टीव्ही सेट बंद केले.

गिरगाव चौपाटीवरील विचित्र अपघातात ७ जखमी
मुंबई, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

मरिन लाइन्स येथून बाबुलनाथच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ‘मारुती स्विफ्ट’ गाडीने आज सायंकाळी गिरगाव चौपाटी येथे तीन टॅक्सी आणि एका मारूती सुझुकी गाडीला धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात सातजण जखमी झाले. मारुती स्विफ्टचा चालक अभय शहा हा या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी चारच्या सुमारास शहा हा दोन कुटुंबियांसह मारुती स्विफ्टने मरिन लाइन्सवरून बाबुलनाथच्या दिशेने जात होता.

.. आता फोडणीही महाग
विकास महाडिक, मुंबई २ ऑगस्ट

तूरडाळ आणि तांदळाच्या किमंतीत चांगलीच वाढ झाल्याने आम आदमीच्या ‘खिचडी’ चा घास पोटात जाण्याच्या आशा मावळल्या आहेत. सर्वसामान्यांच्या खिचडीचा घास हिरावून घेणाऱ्या सरकारने मध्यमवर्गीयांना परमानंद देणारी ‘फोडणी’ देखील महाग करण्याचे संकेत दिले आहेत. श्रावण, सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी यासारख्या सणासुदीच्या काळात फोडणीसाठी लागणारे जिरे, मोहरी, हिंग, हळद यासारखे पदार्थ देखील हळूहळू महाग होऊ लागले असून हळदीचा आजचा भाव आठ रुपयांनी अधिक आहे. त्यामुळे भाज्या, डाळी, तांदूळ, साखर, कांदा यानंतर जिभेची चव भागवणारे मसाल्याचे पदार्थ, सणासुदीला लागणारा गूळ, मुंबईकरांच्या आवडत्या वडापावमधील महत्वपूर्ण घटक बटाटा,आदी वस्तूंचे दर आकाशाला भिडत असल्याचे दिसून येते.

न्यू एरा स्कूलचे वर्ग आजपासून मूळ इमारतीतमध्येच सुरू होणार
मुंबई, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

कफ परेड येथील ‘न्यू एरा स्कूल’चे स्थलांतर करण्यास शिक्षण विभागाने मनाई केल्यानंतर आता सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निणय शाळेच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. शाळा सुरू करण्यात येत असली तरी इमारतीमध्ये कोणताही अपघात घडून दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल, असा इशारा व्यवस्थापनाने दिला आहे. एसएससी बोर्डाची ही शाळा कफ परेड येथून फोर्ट येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होता. परंतु, पालकांनी केलेल्या विरोधामुळे शिक्षण विभागाने शाळेचे स्थलांतर करण्यास मान्यता दिली नाही. शिक्षण विभागाने केलेल्या सूचनेनुसार आता मूळ इमारतीमध्येच शाळेचे वर्ग सुरू होणार असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने दिले आहे.

नियोजित कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडला स्थानिक नागरिक व ‘मनसे’चाविरोध
मुंबई, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

कांजूरमार्ग डम्िंपग ग्राऊंडच्या विरोधात स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आले असून या डम्पिंग ग्राऊंडला विरोध करण्यासाठी कन्नमवार विक्रोळी येथे एका निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक मंगेश सांगळे यांनी ही सभा आयोजित केली होती. विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भांडूप येथील नागरिकांवर हा प्रकल्प लादण्यात आला असून त्यामुळे या परिसरातील सुमारे अडीच लाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या निषेध सभेस ‘मनसे’चे नेते शिशिर शिंदे, मंगेश सांगळे, अॅड. वसंत प्रभू, अॅड. आजगावकर आदी उपस्थित होते. या प्रकल्पाच्या विरोधात कायदेशीर लढाई सुरु करणार असल्याचे अॅड. प्रभू यांनी सांगितले. तर या नियोजित डम्पिंग ग्राऊंडच्या जवळ असलेल्या सुमारे अडीच लाख नागरी वस्ती असून या प्रकल्पामुळे त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. तसे या प्रकल्पात करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी झाली असल्याची टिका नगरसेवक सांगळ्े यांनी केली.