Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

‘फ्रेंडशिप डे’ला तरुणाईचे उधाण
नागपूर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

रंगीबेरंगी कपडे.. हातावर आकर्षक फ्रेंडशिप बँड.. रस्त्यात भेटणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीला ‘फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छा देत दरवर्षीप्रमाणे नागपुरातील तरुणाईने यंदाही ‘फ्रेंडशिप डे’ उत्साहात साजरा केला. कुठलाही ‘डे’ उत्साहात साजरा करण्यासाठी शहरात प्रसिद्ध असलेला तेलंगखेडी तलाव परिसर, वेस्ट चिल्ड्रेन्स ट्राफीक पार्क, हायकोर्ट रोड, लॉ कॉलेज चौक, पूनम चेंबर्स, वर्धमानगरातील पूनम मॉल्स, व्हरायटी चौकातील अलीकडेच सुरू झालेला सिनेमॅक्स मॉल्स याठिकाणी तर तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते.

सणासुदीच्या तोंडावर गहुही कडाडला
नागपूर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी

साखर, डाळी, भाज्या यानंतर गव्हाच्या किमतीत वाढ झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांवर पुन्हा महागाईचे संकट ओढवले आहे. एकीकडे सरकारकडून सतत वाढत असलेली महागाई आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे दावे करण्यात येत असले तरी दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट चांगलेच कोलमडले आहे.

दुर्मिळ माळढोकच्या संरक्षणसाठी पक्षीमित्र सरसावले
राज्यभरात आजपासून पक्षीगणना
देशात अवघे ५०० माळढोक
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी
वन्यजीव संरक्षण कायदा-१९७२ नुसार पट्टेदार वाघ आणि बिबट यांच्याप्रमाणेच शेडय़ूल-१ चा दर्जा असलेल्या दुर्मिळ माळढोक पक्ष्याची (ग्रेट इंडियन बस्टार्ड) गणना उद्या, सोमवारपासून सुरू होत आहे. मुख्य वन्यजीव वार्डन ए.के. जोशी यांनी माळढोक प्रगणनेचे आदेश जुलैच्या प्रश्नरंभी जारी केले.

समापनाच्या संगीत संध्येमधील गायन, वादन आणि नर्तन
डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह

डॉ. सुलभा पंडित

डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीतसभेची समापनाची तिसरी संगीत संध्या गायन, वादन, नर्तनाने संपन्न झाली. या संगीतसभेची सुरुवात सरोदवादनाने झाली. नव्या दमाचे सरोदवादक जयदीप घोष यांनी यापूर्वी १८ वर्षापूर्वी कृष्णराव शंकर पंडित संगीत सभेत हजेरी लावली होती. या आठवणीला उजाळा देऊन आजचे तयारीचे वादक म्हणून ते रसिकांसमोर हजर होते. ‘मियाँ की मल्हार’ या औचित्यपूर्ण रागाने त्यांनी ‘मल्हार’ रागाशी संलग्न अशा वर्षाऋतूचे वातावरण उभे केले.

रेल्वेच्या ‘इज्जत’ साठी दोन दिवसात एकही अर्ज नाही
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी
रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी असंघटित कामगारांसाठी मोठा गाजाबाजा करून सुरू केलेल्या ‘इज्जत’ मासिक पास योजनेकरिता दोन दिवस होऊनही एकही अर्ज आलेला नाही. रोजगारासाठी खेडय़ापाडय़ातून शहराकडे मोठय़ा प्रमाणात कामगार स्थलांतर करतात. असंघटित कामगार अत्यल्प उत्पन्नामुळे शहरात घर घेऊन राहू शकत नाही. अशा कामगारांना दररोज शहरात कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अगदी स्वस्तात रेल्वे मासिक पास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

झलक नागपूरची
बंधुत्व प्रेम

नाते जपण्यासाठी कौटुंबिक आणि सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी सामाजिक सण नेहमी एकत्र येऊन आपण साजरे करतो पण, आपले आणि आपल्या मातृभूमीचे रक्षण करणारे सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी काही करायचे म्हटले तर तिही सामाजिक बांधीलकीच. असेच काही घडले ते सी.पी.एन्ड बेरार शिक्षण संस्थेच्या विविध शाखेतील मुलींनी सीमेवर लढणाऱ्या बहाद्दर जवानांना पाठविण्यासाठी राख्या बनवून कामठी येथील कर्नल वेलूस्वामी यांच्याकडे सुपुर्द केल्या. कार्यक्रमाआधी कर्नलला राखी बांधली त्यावेळी त्यांचे डोळे भरून आले.

महागाईच्या विरोधात विदर्भात शिवसेनेचा रास्तारोको
* सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
* वाहतूक खोळंबली
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी / वार्ताहर
वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने विदर्भात ठिकठिकाणी निदर्शने व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. म्हाळगीनगर चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे काही काळ रिंगरोडवरील वाहतूक खोळंबली होती.

आज भरणार काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखतींचा बाजार
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी

जनसंपर्क मेळाव्याच्या निमित्ताने राज्यात विविध ठिकाणी आयोजित मेळाव्यांपैकी बहुतांश ठिकाणी झालेल्या वादावादी आणि तिकीट इच्छुकांची भाऊगर्दी या पाश्र्वभूमीवर उद्या सोमवारी विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्य़ात राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आलेल्या जागेसाठीही उद्या मुलाखती होणार आहेत.

हिऱ्याची अंगठी चोरल्याचा संशयावरून घरकामगार मुलीला बेदम मारहाण
* मुलगी व आईलाच केले आरोपी
* पोलिसांकडून सावरासावर
* सामाजिक संघटना सरसावल्या
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी
हिऱ्याची अंगठी चोरल्याचा आळ घेत एका अल्पवयीन घरकामगार मुलीला एका श्रीमंत घराणे व पोलिसांकरवी अमानुष मारहाण झाल्याचे प्रकरण समोर येत असून पोलिसांनी उलट, ती मुलगी व तिच्या आईलाच आरोपी केले आहे. दरम्यान या सर्व प्रकाराची चौकशी पोलीस उपायुक्तांकडे सोपवण्यात आली आहे.

दुचाकीस्वाराचा मृत्यू
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी
शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जरीपटक्यात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हिरालाल पुरुषोत्तम शाहू (रा़ गंगानगर, पारडी) हे जखमीचे नाव असून त्याल मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतान रविवारी सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या अनोळखी वाहन चालकाविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विठ्ठलराव गोमासे यांचे निधन
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी
मानेवाडात साईनाथ नगरातील विठ्ठलराव जागोबाजी गोमासे यांचे रविवारला हृदयविकाराने निधन झाले. ते ५८ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्यामूळ गावी देवळी सांवगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शासकीय दूध योजनेचे ग्राहकांना आवाहन
नागपूर, २ ऑगस्ट/प्रतिनिधी
शासकीय दूध योजनेमार्फत वितरित होणाऱ्या आरे गायीच्या दुधाच्या एक लिटरच्या पिशवीचे दर २१ रुपये तर, अध्र्या लिटर पिशवीचे दर १० रुपये ५० पैसे असणार आहेत. नव्या दराची नोंद असलेल्या पॉलिथीन पिशव्या उपलब्ध होईपर्यंत जुन्या दराची नोंद असलेल्या पिशव्यांमधूनच दुधाचा पुरवठा करण्यात येणार आहे. ग्राहकांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शासकीय दूध योजनेच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

चित्रकला महाविद्यालयात रिक्त जागांवर प्रवेश
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी
शासकीय चित्रकला (नागपूर) महाविद्यालयात बी.एफ.ए. प्रथम वर्ष उपयोजित कला व रंगकला विभागात प्रवेश पूर्ण झाले. अपवादात्मक परिस्थितीत काही जागा रिक्त झाल्यास या जागा नोंदणी पद्धतीने गुणानुक्रमे भरण्यात येणार आहेत. या संदर्भात प्रवेशास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळोवेळी महाविद्यालयात सूचना फलक पहावेत, असे आवाहन शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता अरुण दारोकर यांनी केले आहे.

जलसंधारणच्या ३६ गुणवंत अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार
नागपूर २ ऑगस्ट/ प्रतिनिधी
शासनाने २००८-०९ या वर्षासाठी ग्रामविकास आणि जलसंधारण विभागातील ३६ गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड जाहीर केली असून त्यात विदर्भातील १० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ८ ऑगस्टला मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. ग्रामविकास आणि जलसंधारण विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्कारासाठी अमरावती विभागातील एस. एस. ढेंगे (अचलपूर), सी. व्ही. एकघरे (अकोला), आर. एम. मेहरे (अकोला), एस. जी. देशमुख (बुलढाणा), जी. डी. गवळी (वाशिम) यांची तर, नागपूर विभागातील पी. के. बमनोटे (नागपूर), हेमंतकुमार चंद्रभान भोवर (वर्धा), अशोक हरिभाऊ बोबडे (वर्धा), पी. एन. मडावी (चंद्रपूर) आणि एस. बी. बोकाडे (गडचिरोली) यांचा समावेश आहे. राज्यातील एकूण ३६ अधिकारी-कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

वातानुकूलीन यंत्रणेत शार्ट सर्किट रेल्वे आरक्षण सेवा अर्धा तास बंद
नागपूर, २ ऑगस्ट/ प्रतिनिधी

नागपूर रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण केंद्रातील वातानुकुलीन यंत्रणेत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे सुमारे अर्धा तास तिकीट विक्री बंद ठेवावी लागली. पीआरएस नागपूर, वातानुकूलित आहे. तसेच येथे ‘टोकन’ पद्धत आहे. फार्मवरील क्रमांकानुसार संबंधित खिडकीवर तिकीट घ्यावी लागते. आज नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता पीआरएस सुरू झाले. साधारणत: दोन तास तिकिटांचे आरक्षण सुरळीत सुरू होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास बुकिंग क्लर्कच्या कक्षातील एसीमध्ये शार्ट सर्किट होवून धुर निघू लागला. हे बघून कर्मचारी घाबरले व कक्षाबाहे बाहेर निघाले. कार्यालयातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यानंतर लगेच आग प्रतिबंधक उपकरणाने आग विझवण्यात आली. धुर कमी झाल्यावर पूर्ववत आरक्षण केंद्र सुरू झाले. सेवा बाधित झाली नसल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

इंडियन ऑईलतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

इंडियन ऑईल कार्पोरेशनला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या कार्यक्रमांतर्गत नंदनवन भागातील जवाहर हायस्कूलमधील १२५ गरजू विद्यार्थ्यांंना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीचे प्रश्नदेशिक मुख्य व्यवस्थापक प्रमोद पाटील आणि शास्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार अशोक मानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कंपनीच्या या उपक्रमाचे आमदार मानकर यांनी कौतुक केले. यावेळी संस्थेचे कुलगुरू डॉ. बाबासाहेब नंदनपवार, कंपनीचे अधिकारी पौनिकर, जयंत पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष व कंपनीच्या एलपीजीचे वितरक बाळासाहेब उन्हाळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.