Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २ ० ० ९

लक्ष्मीची पावले : भागभांडारात बँका, सीमेंट कंपन्यांच्या शेअर्सनाही प्रश्नधान्य हवे!

बँकांविषयी सर्व काही : ‘क्रेडिट रिपोर्ट’ची माहिती कर्जदारास देणे बँकांवर बंधनकारक
।। मार्केट मंत्र ।।
सध्या नवीन खरेदी नाही
यशोगाथा : चला.. जग जिंकूया
वाटा स्वयंरोजगाराच्या
गृहीत उत्पन्न योजना
अंदाजपत्रकांचे ‘मृग’जळ..
सरकारी बँक कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक!

भागभांडारात बँका, सीमेंट कंपन्यांच्या शेअर्सनाही प्रश्नधान्य हवे!
अर्थसंकल्पानंतर बाजाराची हिरवळ दिवसेंदिवस जास्त टवटवीत होत आहे. निर्देशांक त्यामुळे १५४०० अंशापर्यंत चढलाही. गेल्या बुधवारी चीनमधल्या निर्देशांकातील घसरणीमुळे तो १५१०० पर्यंत उतरला असला तरी डिसेंबरपर्यंत तो १७५०० ते १८००० चढण्याची चिन्हे आता तरी दिसत आहेत. जून-०९ च्या तिमाहीचे बहुतेक कंपन्यांचे आकडे उत्तमच आहेत. विशेषत जास्त उत्पन्न व जास्त नफा, शेअरगणिक उपार्जन दाखविण्यात यांच्यात चढाओढ आहे.
कॉर्पोरेशन बँकेचे या तिमाहीचे एकूण उत्पन्न २१०१.५२ कोटी रुपये होते. जून-०८ च्या तिमाही १४४६.२८ कोटी रुपयांपेक्षा ४५ टक्क्य़ांनी जास्त. या तिमाहीचा नक्त नफा २६१.२४ कोटी रुपये आहे. गेल्या याच तिमाहीसाठी तो १८४.३० कोटी रुपये होता. ही वाढ ४२ टक्के आहे. या तिमाहीचे उपार्जन १८.२१ रुपये आहे. जून-०८ ला ते १२.८५ रुपये होते. बँकेचे भागभांडवल १४३.४४ कोटी रुपये इतके कमी असले तरी भांडवल पर्याप्तता बेसल दोनच्या नुसार १६.२९ टक्के आहे. सध्याचा शेअरचा भाव ३४५ रुपयांच्या आसपास आहे. मार्च-२०१० वर्षासाठी उपार्जन ७० ते ७५ रुपये अपेक्षिले तर किं/उ गुणोत्तर पाचपटीपेक्षा कमीच दिसेल.
इंडियन ओव्हरसीज बँकेने (आयओबी) जून तिमाहीसाठी एकूण उत्पन्न २८०८ कोटी रुपये दाखवले आहे. नक्त नफा ३०१.७७ कोटी रुपये आहे. शेअरगणिक उपार्जन या तिमाहीला ५.५४ रुपये आहे. तिचेही मार्च-२०१० या पूर्ण वर्षासाठीचे उपार्जन २० ते २२ रुपये अपेक्षिले तर सध्याच्या ८८ रुपये भावाला किं/उ गुणोत्तर चारपट पडेल. बँकेचे भागभांडवल ५४४.८० कोटी रुपये आहे. भांडवल पर्याप्तता १३.२४ टक्के आहे. सुवर्ण सहकारी बँकेचे या बँकेत या तिमाहीत विलिनीकरण झालेले आहे. त्यामुळे आयओबीची नक्त अनार्जित कर्जे १.५९ टक्के आहेत. कॉर्पोरेशन बँकेचे हे प्रमाण ०.३२ टक्के इतके कमी आहे.
पंजाब नॅशनल बँकेचा व्यवहारही जून-०८ तिमाहीपेक्षा २८ टक्क्य़ांनी वाढला आहे. तो आता ३७७००० कोटी रुपयांचा

 

आहे. त्यापैकी ठेवींचा आकडा २,१८,००० कोटी रुपयांचा आहे. नक्त नफा, उपार्जन यातही भरघोस वाढ आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुखर्जीनी काही सवलती जाहीर केल्या आहेत. व्यक्तिगत गृहकर्जावर २० लाख रुपयांपर्यंत असेल तर १० लक्ष रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजात एक टक्का अनुदान मिळेल. त्यासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. तसेच रिअ‍ॅल्टी क्षेत्रातल्या कंपन्या आपले निवासिकांचे प्रकल्प मार्च-२०१२ पर्यंत पुरे करतील त्यानाही करसवलत मिळेल.
अन्य बँकांमध्ये बँक ऑफ बरोडा, आंध्र बँक, देना बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे आकडे उत्तम आहेत. बँक ऑफ इंडियाच्या नफ्यातही वाढ आहे, पण ती वरील बँकांइतकी नाही. त्याचे तुलनात्मक आकडे पुढील लेखात बघता येतील. पण एकूण बँक क्षेत्रात कुठल्याही बँकेचे शेअर्स घेतले तरी ते नफा देणारेच ठरतील. त्यामुळे एकूण भागभांडारात बँकांचे शेअर्स निदान १५ टक्के तरी असायला हवेत. सिमेंट कंपन्यांच्या शेअर्सनाही प्रश्नधान्य हवे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या काही कंपन्यातही गुंतवणूक चांगला नफा देऊन जाईल.
रिझव्‍‌र्ह बँकेने आपले आगामी तीन महिन्यांचे आर्थिक धोरण गेल्या मंगळवारी जाहीर केले. कुठल्याच व्याजदरात बदल झालेला नाही. पण बँकांनी आपले व्याजावरील दर कमी करावेत, असे तिने सूचित केले आहे. मार्च-२०१० वर्षासाठी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग सहा टक्के राहावा, असे तिला वाटते. पण महागाई आपले डोके वर काढण्याची शक्यताही तिने वर्तविली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणात गतिमानताही नसते वा आक्रमकताही नसते. त्यामुळे असल्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेत व शेअरबाजारात काहीही फरक पडत नाही. अन्य कंपन्यांच्या तिमाही आकडय़ांत कॅस्ट्रोल, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, ग्रासिम, सेंचरी टेक्स्टाईल्स याचे आकडे निवेशकांना समाधान देणारे आहेत. तिचे वर्ष डिसेंबरअखेर संपते. त्यामुळे जूनला तिची दुसरी तिमाही संपते. या तिमाहीत तिचा नफा जून-०८ पेक्षा ५६ टक्क्य़ाने वाढून १२८.४ कोटी रुपये झाला आहे. या तिमाहीची विक्री ६४७ कोटी रुपये झाली. जून-०८ पेक्षा ती दोन टक्केच जास्त आहे. म्हणजे तिचे ऑपरेटिंग प्रश्नॅफिट मार्जिन वाढले आहे.
एमआरएफ या प्रख्यात टायर कंपनीचा जून-०९ चा नक्त नफा १२५ कोटी रुपये झाला. जून-०८ तिमाहीला तो फक्त ३१ कोटी रुपये होता. या तिमाहीची १४३३ कोटी रुपयांची विक्री जून-०८ च्या १२७३ कोटी रुपयांपेक्षा फक्त साडेबारा टक्क्य़ानी जास्त आहे. पण नफा मात्र चौपट झाला आहे. इतर टायर कंपन्यांच्या नफ्यातही भरघोस वाढ आहे. झायडस कॅडिलाचा नक्त नफा (संगठित) ३९ टक्क्य़ांनी वाढून १२४ कोटी रुपयांवर गेला आहे. एकूण विक्री व उत्पन्न जून-०८ तिमाहीसाठी ७१५.६२ कोटी रुपये आहे, पण यंदा या तिमाहीसाठी ते ९०७.७६ कोटी रुपये आहे.
रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनची या तिमाहीचे उत्पन्न १४६० कोटी रुपये होते. नक्त नफा ४७१.८ कोटी रुपये होता. कंपनीचे भागभांडवल ८५८.६६ कोटी रुपये आहे. यापैकी लोकांकडे फक्त १८.१८ टक्के शेअर्स आहेत. कंपनीने प्रश्नथमिक भागविक्री २००७ मध्ये केली होती. त्यामुळे तिचे आणखी काही शेअर्स विक्रीला निघतील. या तिमाहीचे शेअरगणिक उपार्जन ५.४९ रुपये आहे. सध्याचा भाव १७६ रुपये आहे, पण वर्षभरातला किमान भाव ५३ रुपये होता तेव्हा कंपनीचा भविष्यकाळ उत्तम असणार आहे, याची कल्पना असूनही निवेशक खरेदीसाठी उत्सुक नव्हते. मार्च-२०१० वर्षासाठी तिचे शेअरगणिक उपार्जन २२ ते २५ रुपये पडावे, म्हणजे सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर फक्त आठपट दिसते.
अदानी पॉवरची प्रश्नथमिक विक्री अपेक्षेप्रमाणेच दाद घेऊन गेली. ९९०० मेगावॉट्सचे ऊर्जाप्रकल्प तिच्या हातात आहेत. भारतात व इंडोनेशियात तिच्या कोळशाच्या खाणी आहेत. गुजराथमध्ये ती एका बंदराचा विकास करीत आहे. २०१२ नंतर ही कंपनी लार्सेन अ‍ॅण्ड टुब्रोप्रमाणे मोठी होईल. तिचा सेझचा प्रकल्प तेव्हा रूप धरेल. ९० ते १०० रुपये भावाने बुकबिल्डिंगने काढलेल्या या शेअर्सची नोंदणी ऑगस्ट तिसऱ्या आठवडय़ात होईल. त्यावेळेला भाव जरी १२० रुपयांपर्यंत दिसला तरी खरेदी इष्ट ठरावी. पण तो त्यापेक्षा जास्तच दराने उघडेल असे वाटते.
वसंत पटवर्धन
फोन : ०२० २५६७०२४०