Leading International Marathi News Daily

सोमवार, ३ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

राज्य गुप्तवार्ता खात्याचे उपायुक्त मनोहर वाढवेंची पदोन्नतीवर बदली
नागपूर, २ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्य गुप्तवार्ता खात्याच्या नागपूर कार्यालयाचे उपायुक्त म्हणून मनोहर वाढवे यांची शासनाने

 

पदोन्नतीवर बदली केली आहे. राज्यातील १९ उपअधीक्षक व सहायक पोलीस आयुक्तांना अनुक्रमे अधीक्षक व उपायुक्त म्हणून शासनाने पदोन्नती दिली आहे.
मनोहर वाढवे नागपुरात सहायक पोलीस आयुक्त होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची चंद्रपूर जिल्ह्य़ातील वरोरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली झाली होती. शासनाने त्यांना पदोन्नती दिली. पुणे शहरातील सहायक पोलीस आयुक्त ए. बी. पोटे नागपूर शहरातील इमिग्रेशन विभागाचे उपायुक्त म्हणून येत आहेत. रोह्य़ाचे उपविभागीय पोलीस अधिकारी एस. के. निकम लोहमार्ग पोलिसांच्या नागपूर कार्यालयात अतिरिक्त पोलीस अधीक्षक तर अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी एच. बी. जाधव नक्षलवादविरोधी अभियानमध्ये अधीक्षक म्हणून येत आहेत. नागपूरच्या नागरी हक्क संरक्षण विभागाचे उपअधीक्षक पी. एन. पवार यांची औरंगाबाद येथे सीआयडीचे अधीक्षक तर, मेहकरचे उपविभागीय अधिकारी आर.व्ही. जाधव यांची िहगोली येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी बदली झाली.